पुणे दि. १९ : महाराष्ट्र विधान परिषद व्दिवार्षीक निवडणुक 2016 च्या पुणे विधान परिषद मतदारसंघासाठी आज दि. 19 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान प्रक्रीया शांततेत पार पडली. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 9 मतदान केंद्रावर एकूण 698 मतदारांपैकी 658 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या
निवडणुकीसाठी 94.27 टक्के मतदान झाले.
पुणे विधान परिषद मतदार संघासाठी शनिवार दि. 19 रोजी सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील जुन्नर, खेड, मावळ, भोर, पुरंदर, बारामती येथील तहसिल कार्यालये तसेच कै. मधुकर पवळे सभागृह पिंपरी चिंचवड मनपा., जिल्हा परिषदेचे महात्मा गांधी सभागृह, पुणे महानगर
पालिकेचे कॅप्टन वडके सभागृह अशा एकूण 9 केंद्रांवर मतदान प्रक्रीया पार पडली. या निवडणुकीसाठी 94.27 टक्के मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवार दि. 22 नोव्हेंबर 2016 रोजी होणार आहे.