धानाचे भांडार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या चार जिल्ह्यात शंभर वर्षाची परंपरा असलेल्या झाडीपट्टी रंगभूमीचा आवाज जेव्हा मुंबईच्या रसिकांपर्यत पोहचतो,तेव्हा मात्र या ग्रामीण लोककलकरांचा आनंद गगनात मावेना असा झालेला असतो.
दिवाळी पासून झाडीपट्टी रंगभूमीचा हंगामा सुरू होतो,तो थेट रंगपंचमी/होळीपर्यत सुरू राहतो.या भागातील शेतकरी दिवसभर शेतात धान कापणी करतो ,अन रात्री झाडीपट्टीचे नाटक बघतो.
आज हेच नाटक जेव्हा शहरात येतो,तेव्हा मात्र या ग्रामीण लोक रंगभूमीच्या कलाकारांमध्ये एक नवीन उत्साह येतो. त्यांना नवीन ऊर्जा मिळते.दिनांक ११नोव्हेंबर २०२१ रोजी सांस्कृतिक कार्य विभागाने आयोजित केलेल्या पु ल कला महोत्सवानिमित्त रवींद्र नाट्य मंदिरमध्ये जगविख्यात नाटककार शेक्सपियर यांच्या आँथेल्लो या नाटकावर आधारित पहिले झाडीपट्टी भाषिक नाटक लोकजागृती संस्था प्रस्तुत “मरते रे मैना,झुरते रे राघू” हे राजकीय आधारित नाटक सादर झाले. याला मुंबईच्या रसिकांनी चांगला प्रतिसाद दिलाच,पण जरी भाषेतील अंतर जाणवत होते,तरी उत्तम सादरीकरण आणि वैदर्भीय विनोदाला टाळ्या आणि हसून दाद दिली.हीच खरी या ग्रामीण कलाकारांना मिळालेली पोहच पावती म्हणावी लागेल.
या नाटकाचे निर्माते , लेखक श्री,अनिरुद्ध वनकर यांनी स्वतः या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.
विशेषतः या नाटक निशा धोंगडे या महिला कलाकाराने उत्कृष्ट लावणी सादर करून रसिकांच्या टाळ्या मिळविल्या,
राज्यातील अत्यंत शेवटच्या टोकाला असलेल्या कलेला पाहण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य