अमनोरा-पीवायसी एचटीबीए बॅडमिंटन स्पर्धा ; हवेली तालुका बॅडमिंटन संघटना आणि पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पुणे : अनुराग साठे, पार्थ फिर्के, रुहान परब, कविन पटेल, व्यास खोंडे, अवधूत कदम यांनी हवेली तालुका बॅडमिंटन संघटना (एचटीबीए) आणि पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमनोरा-पीवायसी एचटीबीए बॅडमिंटन कप अजिंक्यपद स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून विजयी सलामी दिली. कॉर्पोरेट अॅथलीट आणि योनेक्स सनराईज हे या स्पर्धेचे सह प्रायोजक आहेत.
पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पीवायसी हिंदू जिमखाना क्लबचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, सचिव सारंग लागू, तन्मय आगाशे उपस्थित होते.
या स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या सलामीच्या लढतीत अनुराग साठेने यश पाटीलवर १५-५, १५-८ असा, पार्थ फिर्केने अथर्व अभांगवर १५-४, १५-२ असा, रुहान परबने आदित्य पार्वतीवर १३-१५, १७-१५, १५-१० असा विजय मिळवला. कविन पटेलने विनायक साहूला १५-१, १५-० असे, जोसेफ जितूने ईशान मुदगलला १५-११, १५-३ असे, रिशान शेम्बेकरने निनाद लेलेला १५-१०, १५-३ असे नमविले. व्यास खोंडेने तनीष दरपेवर १५-८, १५-११ अशी, श्रेयस पवारने अवनिश खरातवर १५-५, १५-१२ अशी, तर अवधूत कदमने साकेत वैद्यवर १५-४, १५-८ अशी मात केली.
कोणार्क तिसऱ्या फेरीत
स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलांच्या एकेरीतील दुसऱ्या फेरीत अग्रमानांकित कोणार्क इंचेकरने अर्णव देशपांडेला १५-२, १५-२ असे सहज नमविले. अवनीश बांगरने अर्णव शिंदेवर १५-१०, १५-९ असा विजय मिळवला. स्वरित सातपुतेने निशाद निजासुरेला १५-६, १५-१२ असे नमविले. वत्सल तिवारीने श्राव्य पाटणकरवर १५-१३, १५-१३ असा विजय मिळवला. रेयश चौधरीने निनाद बोरुडेला १५-३, १५-८ असे, तर ईशान लागूने विराज सराफला १५-१३, १५-८ असे नमविले.
पहिल्या फेरीचे निकाल : ११ वर्षांखालील मुले – अनिश आहेर वि. वि. आरोह गोगाटे १५-९, १५-११; अवधूत कुंभार वि. वि. रितेश वेंकट सवरला १५-२, १५-४; अदित कानेटकर वि. वि. अनय पाटील १५-५, १५-२; ईशान रॉय वि. वि. नवीन सिन्हा १५-५, १५-१२; विवान सरना वि. वि. अर्णव गद्रे १७-१५, १५-११; यश मोरे वि. वि. विस्मय म्हस्के १५-१०, १०-१५, १५-१२; अनुज भोसले वि. वि. लक्ष सिन्हा १५-५, १५-११; दियान पारेख वि. वि. श्रीयश सोनावणे १५-४, १५-६.
१३ वर्षांखालील मुले – ओजस खाडिलकर वि. वि. अर्चित धुल्ला २०-२१, १५-७, १५-१२; मिहीर कोकील वि. वि. नचिकेत गोखले १५-६, १५-१२; सहर्ष आंबेकर वि. वि. अंशुम गुप्ते ८-१५, १९-१७, १५-१३; अयांश यरगट्टी वि. वि. अथर्व वेदपाठक १५-७, १५-७; ध्रुव भोळे वि. वि. हृधान पुंगलिया १५-९, १५-२; अधिराज गांगुर्डे वि. वि. अक्षर झोपे १५-१२, १५-१२; वरुण हवालदार वि. वि. श्रेयांक कविमंदन १२-१५, १५-९, १५-९; रियान करंदीकर वि. वि. रणवीर तावरे १५-२, १५-१.
१३ वर्षांखालील मुली – शुभ्रा वैष्पांयन वि. वि. अनिशा रांजेकर १५-५, १५-८; ईशिता वडगावकर वि. वि. केतकी भिडे ६-१५, १५-१०, १५-७; शर्वरी सुरवसे वि. वि. हिरण्मयी परांजपे १५-५, १५-९; अनया माळुंजकर वि. वि. क्षीती चोरमाले १५-५, १५-६; ईशा कर्वे वि. वि. रिधिमा पवार १५-६, १५-१३; सई कदम वि. वि. ईशा सराफ १५-८, १५-६; संजना कुलकर्णी वि. वि. अन्वयी पाटील १५-१०, १५-७.
१५ वर्षांखालील मुली – सान्वी डाखणे वि. वि. अन्वी बेहेडे १५-५, १३-१५, १५-७; अद्विका जोशी वि. वि. अदिती परांजपे १५-२, १५-०; रिधिमा जोशी ववि. वि. सारा मेंगळे १५-४, १५-२; स्वामिनी तिकोणे वि. वि. निराली साहू १५-०, १५-०; आरोही जोगळेकर वि. वि. प्राची पटवर्धन १५-१३, १२-१५, १५-७; राधा गाडगीळ वि. वि. जनिशा असिजा १६-१४, १५-१३; पूर्वा वाडेकर वि. वि. सानिका देशपांडे १५-८, १५-१२.
अनुराग, पार्थ, अवधूतची विजयी सलामी
Date:

