पुणे, 30 जानेवारी 2021: नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमी यांच्या तर्फे व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 12 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पहिल्या पीएमडीटीए केपीआयटी लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2021 स्पर्धेत मुलांच्या गटात आरव मुळ्ये, जतीन भोरटाके, सर्वज्ञ सरोदे, पृथ्वीराज दुधाने या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
मेट्रोसिटी स्पोर्ट्स क्लब, कोथरूड येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात जतीन भोरटाके याने ऋत्विज देशपांडेचा टायब्रेकमध्ये 6-5(4) असा तर कियान आहुजाने आरव जैन टायब्रेकमध्ये 6-5(2) असा पराभव करून आगेकूच केली. आरव मुळ्ये व पृथ्वीराज दुधाने यांनी अनुक्रमे ईशान ओक व वेद कोटणीस यांचा 6-1अशा सारख्याच फरकाने पराभव करून दुसरी फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: मुले:
आरव मुळ्ये वि.वि.ईशान ओक 6-1;
पृथ्वीराज दुधाने वि.वि.वेद कोटणीस 6-1;
जतीन भोरटाके वि.वि.ऋत्विज देशपांडे 6-5(4);
कियान आहुजा वि.वि.आरव जैन 6-5(2);
सय्यम पाटील वि.वि.विश्वराज इंगवले 6-2;
वेदांत खानवलकर वि.वि.तनिष पाटील 6-2;
सनथ कडले वि.वि.अभिजीत बिस्वाल 6-0;
सर्वज्ञ सरोदे वि.वि.तनिष देवरे 6-1;
अथर्व येलभर वि.वि.राजवर्धन मानकर 6-0;
अथर्व बगाडे वि.वि.आरुष देशपांडे 6-4;

