मुंबई-
भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या नावे, एका अज्ञात व्यक्तीने बनावट दूरध्वनी क्रमांक नोंदवला असून, तो व्हॉट्सअॅप वरुन अनेक लोकांना आर्थिक किंवा इतर स्वरूपाची मदत मागत असल्याचे आढळले आहे. – ज्या मोबाईलवरुन हे मेसेज पाठवले जातात त्यांचा क्रमांक- 9439073183 असा आहे. इतर कुठल्या क्रमांकावरुनही असे मेसेज येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांनी अशा खोट्या मेसेजेसपासून सावध राहावे, असा सावधानतेचा इशारा उपराष्ट्रपती सचिवालयाने दिला आहे.
उपराष्ट्रपती सचिवालयाने गृह विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील यासंदर्भात माहिती दिली आहे.
या बनावट व्यक्तीने अनेक अतिमहत्वपूर्ण व्यक्तींना व्हॉट्सअॅपवरुन मेसेज पाठवल्याचंही समजतं.

