– नवोदित नाटक कलाकारांसाठी, लोकप्रिय वार्षिक राज्यस्तरीय सांगीतिक आणि एकपात्री नाटक स्पर्धेच्या आठव्या भागाला सुरुवात
– प्राथमिक फेरीला पुणे, नाशिक, अहमदनगर, गोवा, रत्नागिरी आणि कणकवली अशा सहा शहरांत 26 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2017 या कालावधीत सुरुवात
– 16 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात महाअंतिम फेरी होणार
पुणे : व्होडाफोन रंगसंगीत, ही आयकॉनिक वार्षिक राज्य स्तरीय सांगीतिक आणि नवोदित नाटक कलाकारांसाठीची एकपात्री नाट्य स्पर्धा महाराष्ट्र आणि गोव्यात आठव्या भागात पुन्हा अवतरली आहे. व्होडाफोन इंडिया, या भारतातील अग्रणीच्या टेलिकॉम सेवा पुरवठादार कंपनीने, थिएटर अकादमीबरोबर संलग्नितपणे व्होडाफोन रंगसंगीत 2017च्या प्राथमिक फेरीला सुरुवात झाल्याचे जाहीर केले आहे.
व्होडाफोन रंगसंगीतची संकल्पना ही प्रामुख्याने रंगभूमीवरील सर्वात बदलत्या आणि आव्हानात्मक पद्धतीच्या मराठी सांगीतिक नाटकांना प्रोत्साहन मिळावे, त्यात पुन्हा चैतन्य निर्माण व्हावे आणि प्रेरणा मिळावी यासाठी तयार करण्यात आली होती. 2010 सालापासून सुरु असलेली ही परंपरा या वर्षीही अखंडित राहिली आहे. यासाठीची प्राथमिक फेरी नाशिक, अहमदनगर, गोवा, कणकवली, रत्नागिरी आणि पुणे अशा सहा शहरांत 26 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2017 रोजी सुरू होणार आहे. प्रत्येक शहरातील विजेती टीम 16 डिसेंबर रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातील महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरेल आणि यावेळी नाट्य व सिने क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तींसमोर कला सादर करण्याची संधीही त्यांना प्राप्त होणार आहे. सांगीतिक नाट्य प्रकारातील विजेत्या टीमला 1 लाख रुपयांचे बक्षीस तर गद्य सादरीकरणासाठी 10,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय 5 लाख रुपयांची इतर बक्षीसेही यावेळी वितरीत करण्यात येतील.
व्होडाफोन रंगसंगीतविषयी व्होडाफोन इंडियाच्या महाराष्ट्र आणि गोव्याचे व्यावसायिक प्रमुख आशिष चंद्रा म्हणाले की, “व्होडाफोन रंगसंगीतचे यंदाचे आठवे वर्ष आहे, सर्वोत्तम, प्रतिभावान मराठी नाट्यक्षेत्रातील होतकरू व्यक्तींसाठी हे एक सर्वात विश्वासार्ह व्यासपीठ आहे. व्होडाफोन रंगसंगीतमध्ये केवळ छंद नाही, तर त्याहीपलिकडे जाऊन कलेचे सादरीकरण केले जाते, यामुळे प्रतिभावान कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी आवश्यक ते व्यासपीठ मिळते, यामुळे तरुणांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची आणि रंगभूमीवरील करीअर उभारण्याची संधी मिळते. दरवर्षीप्रमाणे, महाराष्ट्र आणि गोवा यंदाही अभूतपूर्वच असणार आहे. येथे प्राथमिक फेरी रंगणार असल्याचे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे आणि नाट्यभूमीवरील या क्षणांकडे आम्ही अगदी उत्सुकतेने पाहात आहोत.”
थिएटर अकादमीचे प्रसाद पुरंदरे म्हणाले की, “व्होडाफोन रंगसंगीतचे 2010 साली उद्घाटन झाले आणि तेव्हापासून आमचे नातेसंबंध जोडले गेले आहेत. आता इतक्या वर्षांनंतर व्होडाफोन रंगसंगीतला महाराष्ट्र आणि गोव्यात रंगभूमीवर त्याला भरघोस प्रशंसाही प्राप्त झाली आहे. गेल्या काही भागांतील स्पर्धकांनी आता मराठी फिल्म आणि टीव्ही उद्योगक्षेत्रातील यश प्राप्त केलेले आहे. व्होडाफोनकडून सातत्याने मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे, व्होडाफोन रंगसंगीत यापुढेही नाट्यभूमीवरील होतकरु व्यक्तींना उत्तम व्यासपीठ देत राहील, अशी मला खात्री वाटते.”
गेल्या अनेक वर्षांपासून महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, विजय थिएटर, सुबोध भावे, मुक्ता बर्वे, राकेश सारंग, अमोल पालकर, श्रीरंग गोडबोले आणि इतर अनेक ख्यातनाम कलाकार व्होडाफोन रंगसंगीताच्या परीक्षक मंडळात तज्ज्ञ म्हणून सहभागी आहेत.