जिओनी व्हीएच१ सुपरसॉनिक २०१७ पावर्ड बाय बडवायझर आता पुणे येथे आयोजित करण्यात आला असून यामुळे प्रेक्षकांना आता आंतरराष्ट्रीय संगीताचा अनुभव उपलब्ध झाल आहे. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज गायक जसे एरिक प्रिड्झ, मॅकलमोअर आणि झेड्ड हे यावर्षी चर्चेत आहेत. व्हीएच१ सुपरसॉनिक तर्फे संगीताच्या चाहत्यांसाठी अनोखा अनुभव उपलब्ध करून देण्यात येतआहे.
पुणे या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशा व्हीएच१ सुपरसॉनिक या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा याआधीच गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात करण्यात आली होती, कारण पुण्यात सातत्याने तरूणाईत वाढ होत आहे, तसेच पुण्यातील वाढत्या कॉस्मोपॉलिटन वातावरणामुळे संगीताचे विविध चाहते आहेत. शहरांत सातत्याने वाढत्या पायाभूत सुविधा असल्याने संपूर्ण भारतात प्रवास करणे अधिक सोपे आहे, परिणामी विविध शहरांतील लोकही सहज पुण्यात येऊ शकतात.
व्हीएच १ सुपरसॉनिकचे पुण्यात आयोजन करण्यामागची संकल्पना समजावून सांगतांना बिझनेस हेड, इंटिग्रेटेड नेटवर्क सोल्युशन्स आणि कन्झ्युमर प्रॉडक्ट्स सुगातो भौमिक यांनी सांगितले “यावर्षी आम्ही आमच्या श्रोत्यांना नवीन अशा रूपात हा संगीत महोत्सव उपलब्ध करून देत आहोत आणि हा प्रवास पुण्यात म्हणजेच भारताच्या तरूणांच्या राजधानीत आणतांना आंम्हाला आनंद होत आहे. संगीताच्या विविध विभागातील सर्वोत्कृ्ष्ट असे कलाकार आणत असून तरूण श्रोत्यांसाठी अनोखा अनुभव देण्यास सज्ज आहोत.आम्ही व्हीएच१ सुपरसॉनिकच्या या चौथ्या पर्वाचे यशस्वी आयोजन करण्यावर भर देत असून पुणे हे शहर त्यांच्या तारूण्याने भरलेल्या संस्कृतीसाठी प्रसिध्द आहे.”
एक मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहणारे नेटवर्क असलेल्या व्हायकॉम १८ ने आपला हा कार्यक्रम अधिक चांगला करण्यासाठी चकाचक सुपरसॉनिक मोहिम सुरू केली आहे.या मोहिमे अंतर्गत या महोत्सवाच्या आसपासचा विभाग स्वच्छ ठेवण्याचा प्रसार करण्यात येणार आहे.चकाचक सुपरसॉनिकबरोबरच व्हायाकॉम १८ तर्फे हा कार्यक्रम प्रथमच भारतातील पहिला संपूर्णत: पोहोच असलेला संगीत समारोह असेल ज्यामध्ये अन्यथा सक्षम लोकही सहजपणे इतरांप्रमाणे सहभागी होऊ शकतील.
आकर्षक अशा तीन कार्यक्रमांबरोबरच व्हीएच१ सुपरसॉनिक हे संगीत पुढे ठेऊन कार्यक्रम देणार आहे.या महोत्सवातून विविध विभागातील संगीताबरोबरच यावर्षीच्या चौथ्या हंगामात बिगरूम, हिपहॉप, इलेक्ट्रो, हाऊस, ट्रान्स, टेको आणि ड्रमएनबासचाही समावेश असणार आहे.परिणामी समारंभाला हजर राहणा-या लोकांना प्रायोगिक कार्यक्रमांबरोबरच अतिशय आकर्षक अशा कलाकारांची कला तीन दिवसांत पाहण्याची संधी मिळणार आहे. परिणामी ते विविध प्रकारच्या झोन्समध्ये जाऊन आनंदमयी अशा विविध प्रकारच्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतील ,याकरता कलाइनस्टॉलेशन्स , फ्ली मार्केट्समधून शॉपिंग करू शकतील आणि अशा अनेक गोष्टींचा आनंद मिळू शकेल.