ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं निधन ; संगीत रंगभूमीवर शोककळा

Date:

पुणे-ज्येष्ठ गायिका आणि संगीत नाट्यात मोलाची कामागिरी केलेल्या किर्ती शिलेदार यांचं आज निधन झालं पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. डायलिसिसचे उपचार सुरू असल्याने त्यांची तब्येत आणखी खालावली संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. नाट्य संगीतातील त्यांच्या घराण्याचा वारसा कायम स्मरणात राहिल अशी कामगिरी त्यांनी केलेली आहे. सकाळी त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण उपचाराला प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. रंगभूमीवरील जयराम आणि जयमाला शिलेदार या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या कीर्ती शिलेदार यांनी मराठी रंगभूमीसाठी बहुमूल्य योगदान दिलं आहे.  अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अभोगी (गगनगंधा),एकच प्याला (सिंधू),कान्होपात्रा (कान्होपात्रा),द्रौपदी (द्रौपदी),भेटता प्रिया,(महाश्वेता),मंदोदरी (मंदोदरी),मानापमान (भामिनी),मृच्छकटिक (वसंतसेना),ययाति आणि देवयानी (शर्मिष्ठा),रंगात रंगला श्रीरंग (माधवी),रामराज्यवियोग (मंथरा),रूपमती (रूपमती),विद्याहरण (देवयानी)शाकुंतल (शकुंतला),शारदा (शारदा),श्रीरंग प्रेमभंग (राधा),संशयकल्लोळ (रेवती),सौभद्र (कृष्ण, नटी, नारद, रुक्मिणी, सुभद्रा),स्वयंवर (रुक्मिणी),स्वरसम्राज्ञी (मैनाराणी) ही काही त्यांची गाजलेली नाटक आणि त्यातील काही भुमिकां रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवत आहेत.  
कीर्ती शिलेदार यांना २०१४ सालचा महाराष्ट्र सरकारचा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार तसेच दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा विशेष पुरस्कार आणि बालगंधर्व पुरस्कार मिळाला आहे.सौंदर्यशोधक दृष्टीने शास्त्रीय संगीतातील अकारण होणारे शब्दोच्चारांचे दुर्लक्ष टाळले जावे, या हेतूने त्यांनी ’स्वर ताल शब्द संगती’या नावाचे हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे.
आपल्या आई, वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताची आराधना केलेल्या कीर्ती शिलेदार यांनी वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकलं. त्यांचं शास्त्रीय संगीताचं उच्च शिक्षण नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे झालं.
पुणे विद्यापीठातून साहित्य शाखेच्या पदवी घेतलेल्या कीर्ती शिलेदार यांच्ची भूमिका असलेल्या नाटकांचे आजवर ४०००हून अधिक प्रयोग झाले आहे. देशातल्या मराठी रसिकांसाठीही त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले. संगीत कान्होपात्रासह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. गोड गळा आणि शास्त्रीय संगीतासाठी केलेल्या प्रचंड परिश्रमामुळे कीर्ती शिलेदार यांनी संगीत मराठी नाटकात केलेल्या सर्वच भूमिका गाजल्या. बालगंधर्वांच्या सुवर्ण युगाची आठवण यावी, अशा एकरूपतेनं कीर्ती शिलेदार यांनी गायलेली गीतं रसिकांनी डोक्यावर घेतली. संगीत नाटक हेच त्यांच्या आई, वडिलांचा श्वास आणि ध्यास होता. आपल्या आई, वडिलांची संगीत मराठी नाटकांच्या सेवेचा हाच वारसा जपताना कीर्ती शिलेदार यांनी, कीर्ती आणि पैशाचा मोह बाजूला ठेवत, मराठी संगीत रंगभूमीची सेवा पन्नासहून अधिक वर्षे अविरतपणे केली आहे. मराठी संगीत रंगभूमीच्या त्या सर्वार्थानं बिनीच्या शिलेदार होत्या. 
रंगभूमीवर भूमिका रंगवताना त्यांनी नेहमी अभ्यासपूर्ण सौंदर्यशोध घेतला. त्यामुळेच त्यांच्या सर्व भूमिका आगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत. संगीत रंगभूमीवर त्यांनी स्वतःचे आगळे स्थान निर्माण केले आहे. संगीत नाटके व स्वतंत्र मैफलींच्या निमित्तानं भारतभर तसेच इंग्लंड-अमेरिकेत त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. 
विदेशात त्यांनी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताच्या मैफिली गाजवल्या आहेत. महाराष्ट्राच्या प्रतिनिधी या नात्यानं त्यांनी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीमध्ये सदस्य म्हणूनही काम केलं होतं. 
संगीत स्वरसम्राज्ञी हे कीर्ती शिलेदार यांचे अत्यंत गाजलेले नाटक आहे. या नाटकाव्यतिरिक्त कीर्ती शिलेदार, लता शिलेदार आणि सुरेश शिलेदार हे तिघेही मिळून जे तीनपात्री सौभद्र सादर करतात, त्या तीनपात्रीचे रंगमंचावर अनेक प्रयोग झाले आहेत.संवाद पुणे च्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांनी शेवटची प्रत्यक्ष उपस्थिती नोंदवली होती. किर्ती शिलेदार यांच्या भगिनी दिप्ती भोगले यांनी किर्ती शिलेदार यांच्या जीवनकार्यावर आधारीतनिर्मित केलेला माहितीपट नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने कार्यक्रमात डॉ.जब्बार पटेल यांच्या उपस्थितीत दाखविण्यात आला होता. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...