ज्येष्ठ अभिनेते विश्वजीत चटर्जी यांचा इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर म्हणून सन्मान

Date:

पणजी, 24 जानेवारी 2021

एक्कावन्नांव्या भारतीय  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोवा येथे आज 24 जानेवारी 2021 रोजी ज्येष्ठ अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि हिंदी तसेच बंगाली सिनेमांचे गायक विश्वजीत चटर्जी यांना “इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर“ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महोत्सवाच्या समारोप प्रसंगी गोव्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रिय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार आज प्रदान करण्यात आला.

या पुरस्काराची घोषणा केंद्रिय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात 16 जानेवारी 2021 रोजी केली होती.

आज समारोप समारंभ प्रसंगी बोलताना ज्येष्ठ अभिनेते विश्वजीत चटर्जी म्हणाले, “मला या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी अगदी मनापासून भारत सरकार आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे आभार मानतो. या वर्षी आपल्याला समजले की, बांग्लादेश हा आपल्याला  सांस्कृतिक दृष्ट्या केंद्रस्थानी असलेला देश आहे, ज्या देशाशी माझे खूप सखोल नाते आहे. जेव्हा बांग्लादेशवर हल्ला होत होता, तेव्हा मुंबईत बुद्धिमान दिग्दर्शक ऋत्विक घटक माझ्याबरोबर होते आणि आम्हाला बंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांच्या भाषणांमधून प्रेरणा मिळत असे. त्यानंतर ऋत्विकदांच्या सूचनेनुसार, आम्ही `देअर फ्लोज पद्मा, द मदर रिव्हर` हा माहितीपट तयार केला. नंतर मी ढाका येथे गेलो आणि बंगबंधूना ती दाखविली. त्यांच्या कार्यालयात मला दोन तैलचित्र दिसली, ती होती गुरुदेव रविंद्रनाथ टागोर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची. बांग्लादेशकडून मला मिळालेले प्रेम मी कधीच विसरू शकत नाही. बांग्लादेश आणि भारत हे एकच आहेत, आपण भाऊबंद आहोत, आपण वेगळे झालेलो नाही.“

अभिनेत्याने आठवणींना उजाळा दिला आणि बांग्लादेशहून मुंबईला आणणाऱ्या गायक आणि निर्माते हेमंतकुमार यांच्या आठवणी सांगत, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

समारंभात दाखविल्या गेलेल्या व्हिडिओमध्ये प्रख्यात अभिनेत्याने आयुष्यातील यशाबद्दल प्राधान्याने, एक कलाकार म्हणून आपले विचार व्यक्त केले होते. “एक कलाकार म्हणून, एक अभिनेता म्हणून, मला कोणीतरी व्हायचे होते. मला संपूर्ण भारताची ओळख असणारा एक अभिनेता व्हायचे होते, केवळ पश्चिम बंगालची ओळख असलेला अभिनेता व्हायचे नव्हते. जर एखाद्याला अगदी मनापासून आत्मविश्वास असेल, तर तो किंवा ती निश्चितच काही तरी मिळवू शकतात, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपण निवडलेल्या मार्गापासून, ध्येयापासून ढळू नका, असे केल्यास तो किंवा ती निश्चितच आपले ध्येय गाठू शकेल. जेव्हा तुम्हाला एखादी भूमिका मिळते, तेव्हा तुम्हीच त्या भूमिकेसाठी सर्वोत्तम म्हणून निवडले गेलेले आहात, असे लक्षात ठेवून ती भूमिका साकारा. कलाकाराचा शोध अगदी शेवटपर्यंत संपत नसतो. “

विश्वजीत चटर्जी हे बीस साल बाद या चित्रपटातील कुमार विजय सिंह या त्यांच्या भूमिकेसाठी विशेष ओळखले जातात. कोहरा या सांगितिक नाट्यातील राजा अमित कुमार सिंह, एप्रिल फूल या प्रेमकथेच्या सिनेमात अशोक, मेरे सनम मध्ये राजेश कार, नाईट इन लंडन मध्ये जीवन, दो कलिया सिनेमात शेखर आणि किस्मत सिनेमामध्ये विकी या त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. त्यांनी नामवंत अभिनेत्री आशा पारेख, वहीदा रहमान, मुमताज, माला सिन्हा आणि राजश्री यांच्याबरोबर बऱ्याच वेळा काम केले आहे. त्यांच्या काही बंगाली सिनेमांमध्ये चौरंघी (1968) आणि गढ नरसिंहपूर यामध्ये उत्तम कुमार आणि कुहेली यांच्या बरोबर आणि बऱ्याच नंतर श्रीमान पृथ्वीराज (1973), जय बाबा तारकनाथ (1977) आणि अमर गीती (1983). 1975 मध्ये, विश्वजीत यांनी स्वतःचा चित्रपट कहते है मुझको राजा याची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. अभिनय आणि दिग्दर्शनाखेरीज ते गायक आणि निर्माते देखील होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...