ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे करोनाने निधन

Date:

मुंबई-मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे निधन झाले आहे. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही काळापासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे.किशोर नांदलस्कर यांनी सुमारे 40 नाटके, 25 हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट आणि 20 हून अधिक मालिकांमधून काम केले आहे.त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.किशोर नांदलस्कर गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. त्यांना हृदयविकार, मधुमेहाचा त्रास होता. काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया झाली होती. ‘पेसमेकर’ बसवला गेला होता. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी काम करणे कमी केले होते.

किशोर नांदलस्कर यांचा अल्पपरिचय
किशोर नांदलस्कर यांचे मूळ गाव खारेपाटण तालुक्यातील शेजवली हे आहे. त्यांचा जन्म मुंबईत झाला. मुंबईतील लॅमिंग्टन रस्ता, नागपाडा, घाटकोपर आणि अन्य काही भागात त्यांचे लहानपण गेले. न्यू इरा हायस्कूल आणि युनियन हायस्कूल येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले होते.

किशोर नांदलस्कर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला होता. त्यांच्या वडिलांनी त्याकाळी नाटकांमधून स्त्री भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे घरातच अभिनयाचे संस्कार किशोर यांच्यावर झाले. 60 च्या सुमारास रंगभूमीवर सादर झालेल्या ‘आमराई’ या नाटकात किशोर नांदलस्कर यांनी पहिल्यांदा अभिनय केला. दरम्यान त्यांनी एका कंपनीत काही वर्षे नोकरीदेखील केली. नोकरी करत त्यांनी आपली आवडही जोपासली. 80 च्या दशकात त्यांनी दुरदर्शनवर गजरा, नाटक आणि अन्य कार्यक्रमांमधून आपला सहभाग नोंदवला.

‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘नाना करते प्यार’ ही त्यांची नावाजलेली नाटकं आहेत. तर महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’, ‘जान जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटांमधून नांदलस्कर प्रेक्षकांच्या भेटीला आले.


SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...