51 व्या इफ्फीमध्ये ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विश्वजीत चटर्जी यांना इंडियन पर्सनॅलीटी ऑफ इयर पुरस्काराची घोषणा

Date:

पणजी, 16 जानेवारी 2021

गोवा इथल्या 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, हिंदी आणि  बंगाली चित्रपटांचे गायक विश्वजीत चटर्जी यांना  इंडियन पर्सनॅलीटी ऑफ इयर पुरस्काराने गौरवण्यात येईल असे माहिती प्रसारण मंत्री श्री प्रकाश जावडेकर म्हणाले.

मार्च 2021 मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.बीस साल बाद चित्रपटातल्या  कुमार विजय सिंग,कोहरा मधल्या राजा अमित कुमार सिंग,एप्रिल फुल मधल्या अशोक,  मेरे सनम मधल्या रमेशकुमार, नाईट इन लंडन मधला जीवन, दो कलिया मधल्या शेखर आणि किस्मतमध्ये त्यांनी साकारलेल्या  विकीच्या  भूमिकेला  रसिकांची मोठी पसंती मिळाली. आशा पारेख, वहिदा रेहमान, मुमताज,माला सिन्हा आणि राजश्री या प्रख्यात अभिनेत्रीसमवेत त्यांनी चित्रपटात भूमिका केल्या. त्यांच्या बंगाली चित्रपटांमध्ये चौरीन्घी (1968), उत्तम कुमार यांच्यासमवेत गढ नसीमपूर, कुहेली आणि त्यानंतर श्रीमान पृथ्वीराज (1973),जय बाबा तारकनाथ (1977)  आणि अमर गीती  (1983) यांचा समावेश आहे. 1975 मध्ये विश्वजीत यांनी ‘कहते है मुझको राजा’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिगदर्शन त्यांनी केले. अभिनय आणि दिग्दर्शनाबरोबरच गायक आणि निर्माता म्हणूनही  त्यांनी  काम केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

येरवडा कारागृहात 5 मोबाईल,2 पॉवर बँक,चार्जिंग वायर सापडली..

पुणे- येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न...

माझी गाणी आजही रसिकांच्या पसंतीत -सिनेगीतकार समीर अंजान

'एमआयटी एडीटी' विद्यापीठाच्या 'पर्सोना महोत्सवा'ची उत्साहात सांगता लोणी-काळभोर (पुणे)...

अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग दहा वर्षे विजेतेपदाची परंपरा कायम!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा दणदणीत विजयपिंपरी : पुणे आंतर कचेरी...