पुणेरी मिसळसाठी प्रसिध्द असलेले भवानी पेठेतील” वटेश्वर भुवन ” ची दुसरी शाखा कोथरूड – कर्वेनगर भागात सुरु करण्यात आलेल्या दुसऱ्या शाखेचे उदघाटन माजी आमदार कमल ढोलेपाटील यांच्याहस्ते करण्यात आले .
असंख्य चोखंदळ खवय्याच्या पसंतीस उतरलेल्या व दोनतीन पिढीच्या जिभेवर तोच स्वाद देवून तृप्त करणारे ” वटेश्वर भुवन ” ची दुसरी शाखा कोथरूड – कर्वेनगर भागात ताथवडे उद्यानाजवळ मधुबन सोसायटीमध्ये शॉप नंबर दोन येथे सुरु करण्यात आली.
यावेळी उदघाटन सोहळ्यास ” वटेश्वर भुवन ” चे प्रमोद कुदळे व करण कुदळे , सागर ढोलेपाटील , नितीन दरवडे , राजेंद्र राऊत , प्रशांत नेवसे , मोहन जगताप व वटेश्वरचे खवय्ये चाहते उपस्थित होते .
पुण्याच्या कोथरूड भागात ” वटेश्वर भुवन ” सुरु करण्याची अनेक खवय्यांची मागणी गेले अनेक वर्षांपासूनची होती , तसेच जास्तीत जास्त पुणेकरांना आमच्या मिसळीचा आस्वाद घेता यावा यासाठी हि दुसरी शाखा सुरु करण्यात आली . ” वटेश्वर भुवन ” चा विस्तार वाढावा आणि हा विस्ताराचा वटवृक्ष जास्तीत जास्त खवैय्यांना आमच्या मिसळचा आनंद मिळावा , हा उद्देश ठेवून आम्ही आमचा व्यवसाय वाढवित आहोत , हि शाखेचे व्यवस्थापन आम्हीच पाहणार आहोत , त्यामुळे तीच चव खवैय्यांना मिळणार असून गुणवत्ता हि राखली जाणार आहे . अशी माहिती ” वटेश्वर भुवन ” चे प्रमोद कुदळे व करण कुदळे यांनी दिली .

