पुणे– ‘व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लिमिटेड’च्या ‘फॉरेस्ट एज’ या प्रकल्पाच्या प्रारंभाच्या दिवशीच 68 सदनिका म्हणजे जवळपास 85 टक्के सदनिका विकल्या गेल्या असल्याची माहिती पुणे शहरात मुख्यालय असलेल्या, अतिशय विश्वासार्ह आणि प्रसिद्ध अशा व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लिमिटेड (BSE Scrip ID VASCONEQ) या विकासकांतर्फे देण्यात आली. हा प्रकल्प खराडी येथे असून, या संकुलातील पहिल्या टॉवरमध्ये 80 सदनिका आहेत. या प्रकल्पाचा प्रारंभ मकरसंक्रातीच्या दिवशी करण्यात आला.
या प्रकल्पात टू बीएचके अपार्टमेंट असून, आधुनिक निवास म्हणून विकसित करण्यात येत असलेला हा प्रकल्प 1.7 एकर परिसरात वसविण्यात येणार आहे. हेल्थ टेक होम्स (आरोग्यदायी तंत्रज्ञानयुक्त घरे) असे यांचे प्रारूप असून, पुण्यात अशा प्रकारची घरे प्रथमच तयार होत आहेत.
व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लिमिटेडच्या रिअल इस्टेट विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश म्हात्रे म्हणाले, ‘तीन दशकांहून अधिक काळाची परंपरा असलेली व्हॅस्कॉन कंपनी उत्तमतेच्या ध्यासासाठी आणि ग्राहकांना त्यांच्या पैशांचे योग्य मूल्य देण्यासाठी ओळखली जाते. ‘फॉरेस्ट एज’ या प्रकल्पाला ग्राहकांकडून पहिल्याच दिवशी मिळालेल्या प्रतिसादाने, ग्राहकांचा आमच्यावर असलेला विश्वास अधोरेखित झाला आहे. आम्हाला या प्रतिसादाचा अतिशय आनंद असून, ग्राहकांना प्रेरणादायी वातावरण देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू.’
हा प्रकल्प पुणे विमानतळ, प्रस्तावित पुणे मेट्रो स्टेशन आणि पुणे रेल्वे स्टेशन अशा महत्त्वाच्या आस्थापनांपासून केंद्रबिंदूवर आहे, तसेच वर्ल्ड ट्रेड सेंटर, ग्लोबल बिझनेस हब, इऑन आयटी पार्क, वेकफिल्ड आयटी चेम्बर्स अशा काही महत्त्वाच्या उद्योग केंद्रांजवळ आहे. रुग्णालय, रेस्टॉरंट्स आणि मनोरंजन केंद्रेही या प्रकल्पापासून नजीक आहेत.
‘फॉरेस्ट एज’ हा व्हॅस्कॉन, क्लोव्हर बिल्डर्स आणि श्री मधुर रिएल्टर्स यांचा संयुक्त प्रकल्प असून, त्यात व्हॅस्कॉनचा 50 टक्के वाटा आहे.
व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लिमिटेडबाबत
व्हॅस्कॉन इंजिनीअर्स ही पुण्यात मुख्यालय असलेली बांधकाम व्यवसायातील आघाडीची नोंदणीकृत कंपनी आहे. कंपनीने गेल्या 30 वर्षांहून अधिक काळात भारतातील 30हून अधिक शहरांत 5 कोटी चौरस फुटांवर निवासी, औद्योगिक, आयटी पार्क, मॉल, मल्टिप्लेक्स, हॉस्पिटॅलिटी आणि कम्युनिटी वेल्फेअर सेंटर्स या प्रकारांतील 200 हून अधिक प्रकल्प साकारले आहेत. कंपनीचा भविष्यकाळात ईपीसी आणि परवडणारी घरे या प्रकारांवर भर असणार आहे.