व्हॅस्कॉनचे भागीदार अजंटा एंटरप्राइझेसने खराडीस्थित एसपीव्हीला सुमारे ८ एकर जमिन विकली १७० कोटीला ….

Date:

पुणे – पुण्यातील आघाडीची रियल इस्टेट डेव्हलपर- व्हॅस्कॉन इंजिनियर्सने आज घोषणा केली, की व्हॅस्कॉन इंजिनियर्सची (बीएसई – 533156/एनएसई – व्हीएएससीओएनईक्यू/आयएसआयएन) ५० टक्के संयुक्त भागिदारी असलेल्या अजंटा एंटरप्राइझेसने ,मेपलट्री इन्व्हेस्टमेंट पीटीई लि. (मेपलट्री) च्या खराडीस्थित एसपीव्हीला ,अंदाजे आठ एकर जमिनीची एकूण १७० कोटी रुपये मोबदल्यात यशस्वीपणे विक्री केली. १७ डिसेंबर २०१९ रोजी विक्री खताची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आणि संपूर्ण  मोबदला मिळालेला आहे. अजंटा एंटरप्राइझेसकडे विकासासाठी ८ लाख चौरस फुट जमीन शिल्लक असून त्याचा काही भाग विकासाअंतर्गत आहे.

 नुकत्याच झालेल्या या व्यवहाराविषयी व्हॅस्कॉन इंजिनियर्स लि. चे अध्यक्ष श्री. आर वासुदेवन म्हणाले, मला जाहीर करताना आनंद होत आहे, की या जमीन व्यवहारामुळे आमच्या कंपनीची विकास क्षमता लक्षणीय प्रमाणात विकसित झाली आहे. कंपनीसाठी ही असामान्य कामगिरी असून त्यातून मिळालेली रक्कम मोठ्या रकमेचे कर्ज कमी करण्यासाठी व पुढील विकासासाठी वापरली जाणार आहे. येत्या काही वर्षांत आमचा व्यवसाय उच्च- विकास क्षेत्रात प्रवेश करेल याची मला खात्री वाटत असून या एकंदर घडामोडीमुळे आम्ही पुढील कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहोत.

पुणेस्थित व्हॅस्कॉन इंजिनियर्स लि. ही भारतातील आघाडीच्या ईपीसी कंपन्यांपैकी एक असून ती असेट- लाइट रियल इस्टेट व्यवसायात कार्यरत आहे. चालू आर्थिक वर्षातील ईपीसी कंत्राटे १५३९ कोटी रुपये आहे. सध्याची ईपीसी कंत्राट पुस्तिका २१७५ कोटी रुपयांची असून त्यात २०४९ कोटी रुपयांच्या बाह्य ईपीसी कंत्राटांचा आणि १२५ कोटी रुपयांच्या आमच्या अंतर्गत रियल इस्टेट लाँच कंत्राटांचा समावेश आहे. स्थावर मालमत्ता क्षएत्रात ३५ लाख चौरस फुट जागा विकासाअंतर्गत असून एकूण अपेक्षित विक्री अंदाजे २००० कोटी रुपये होईल असा अंदाज आहे. या जागेचा काही भाग विकासाअंतर्गत असून शिल्लक जागेचा विकास येत्या २ ते ३ वर्षांत टप्प्याटप्प्याने लाँच केला जाईल.

व्हॅस्कॉन इंजिनियर्स लि.बद्दल

व्हॅस्कॉन इंजिनियर्स ही आघाडीची नोंदणीकृत स्थावर मालमत्ता कंपनी आणि आता फॉर्च्युन नेक्स्ट 500 कंपनी असून तिचे मुख्यालय पुण्यात आहे. ३० वर्षांचा अनुभव असलेल्या या कंपनीने आतापर्यंत ५० दशलक्ष चौरस फुटांचे मिळून एकूण २०० पेक्षा जास्त प्रकल्प तयार केले असून निवासी, औद्योगिक, आयटी पार्क्स, मॉल्स व मल्टीप्लेक्सेस, हॉस्पिटॅलिटी आणि कम्युनिटी वेल्फेयर सेंटर्सचा समावेश आहे. हे प्रकल्प भारतातील ३० पेक्षा जास्त शहरांत ईपीसीसह उभारलेले तसेच कंपनीचे स्वतःचे स्थावर मालमत्ता प्रकल्प आहेत. यापुढेही ईपीसी आणि परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण कंपनीने ठेवले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...