पुणे-नगरसेवकउमेश गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज आपल्या कोरेगाव पार्क या प्रभागात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते . खासदार गिरीश बापट , भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक,महापौर मुरलीधर मोहोळ , माजी मंत्री दिलीप कांबळे, आमदार सुनिल कांबळे आदी मान्यवर नेत्यांनी या उपक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून उपस्थिती लावली . बी. टी. कवडे रोड येथील जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन त्यानंतर रक्दान शिबीर ,कार्यअहवाल व दिनदर्शिका प्रकाशन ;विविध बँकेतील कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहोळा ,विविध सोसायटी मधील सिक्युरिटी गार्ड यांना ब्लॅंकेट वाटप अशा उपक्रमांचा यात समावेश होता . बापट ,मोहोळ, मुळीक कांबळे या सर्व पाहुण्यांनी आपल्या भाषणात उमेश आणि दिनेश गायकवाड यांनी सातत्याने चालविलेल्या सामाजिक उपक्रमांबाबत त्यांचे कौतुक केले. आणि शुभेच्छ्या दिल्या .
नगरसेवक उमेश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
Date:

