Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पाणी वाचवणे म्हणजेच पाणी मिळवणे – श्रीनिवास पाटील

Date:

 

पुणे – पाणी मुबलक आहे पण त्याच्या वापराचे योग्य नियोजन नसल्याने पाणी टंचाईच्या संकटाचा सामना करावा लागतो. हे संकट कायमस्वरूपी टाळण्यासाठी पाणी वाचवणे गरजेचे आहे. पाणी वाचवणे म्हणजेच पाणी मिळवणे हा संदेश लोकांपर्यंत आज पोहोचवण्याची आवश्यकता असून, वनराईच्या या वार्षिक विशेषांकाने हाच संदेश दिला आहे, असे सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी आज येथे सांगितले.

‘जल : नियोजन आणि व्यवस्थापन’ या वनराई मासिकाच्या रौप्यमहोत्सवी वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन श्री. राज्यपाल पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर प्रशांत जगताप, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे, वनराईचे विश्वस्त रोहिदास मोरे आणि नितीन देसाई, कार्यकारी संपादक अमित वाडेकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

माननीय डॉ. मोहन धारिया तथा अण्णानी पंचवीस वर्षापूर्वी जे रोपटं लावलं त्या रोपट्याच्या सावलीत आज येण्याची संधी मिळाली, असे सांगून राज्यपाल पाटील म्हणाले, वसंतदादा पाटील, मोहन धारिया यांनी पंचवीस वर्षापूर्वी पाणी आडवा पाणी जिरवा अशी कामे सुरू केली. जमिनीत जिरवलं की वर येतचं म्हणूनच या कामांना आण्णांनी ध्येयाची जोड दिल्याने आज त्याचे जन आंदोलन किंवा चळवळीत रूपांतर झालेले बघायला मिळते. सिक्कीममध्ये ४७ टक्के क्षेत्रावर जंगल आहे. तरीही मी स्वत: राजभवनात येणा-या पाहुण्यांना अर्धाच ग्लास पाणी देण्याची सूचना दिली आहे. मागितले तर आणखी देतो, पण उगीचच पाण्याच्या बाटल्या किंवा ग्लास भरून पाणी देण्याला मीच विरोध केला आहे.

पुण्याच्या बाबतीतही तेच आहे, आता काय तर अंघोळीची गोळी निघाली आहे, असे सांगून ते म्हणाले, पुण्याच्या वरच्या धरणांमध्ये ३२.५ टीएमसी पाणी असूनही पाण्यासाठी वणवण करायची वेळ येते. कारण पाणी वाचवण्याची सवयच नाही. पाणी वाचवणे म्हणजेच पाणी मिळवणे हा संदेश लोकांपर्यंत पोचवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आपणही पाणी वाचवू व इतरांना देऊ अशी कृती सर्वांनी करण्याची हीच वेळ आहे. अण्णांनी पंचवीस वर्षांपूर्वी वनराई सुरू केली. राई राई म्हणजे लहान आणि नुसतं राई म्हणजे मोठे जसं देवराई, आमराई तशीच ही आण्णांची वनराई आहे. इथं मिळालेले तुळशीचं रोपटं सिक्कीमच्या राजभवनात लावू असेही त्यांनी शेवटी आवर्जून नमूद केले.

महापौर प्रशांत जगताप म्हणाले, ”आज जगाला दहशतवादाबरोबरच सर्वात मोठा धोका हवामान बदलाचा आहे.  त्यासाठी आपण आता काय करतो यावर आपल्या पुढच्या पिढीचे भवितव्य अवलंबून आहे. पुणेकरांनी गेले वर्षभर पाण्याची बचत करून दाखवली आहे. पाणी जपून वापरण्याची सवय लावून घेतली आहे. यापुढे हवामान बदलावर एक उपाय म्हणून शहराभोवतीच्या टेकड्यांवर वनराई उभी करण्यासाठी महानगरपालिका वनराईसारख्या संस्थांबरोबर काम करण्यास उत्सुक आहे.

कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वनराईच्या ‘जल नियोजन व व्यवस्थापन’ या अंकाचे वर्णन मार्मिक अंक असे केले. ते म्हणाले, पाणी या विषयात काम करणा-या तज्ज्ञांनी महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील कार्यकर्त्यांनी या अंकात लेख लिहिले आहेत. हा अंक परिपूर्ण असून, राज्यातील प्रत्येक कृषी महाविद्यालयातील ग्रंथालयात असणे आवश्यक आहे. कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांना हा अंक अभ्यासासाठी उपयुक्त आहे.

वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, झाडे लावण्यापासून वनराईच्या कामाची सुरूवात झाली. पण त्यानंतर काम करताना आलेल्या अनुभवातून मृद संधारण, पाणी अडवा पाणी जिरवा असे वेगवेगळे विषय वनराईने हाती घेतले. आता रायगड, रत्नागिरी, सातारा, जालना या जिह्यातील दहा-दहा गावांच्या समूहात क्लस्टर डेव्हलपमेंटचे काम वनराईने सुरू केले आहे. यात अन्य कामाबरोबरच शाळांच्या इमारती व इतर मुलभूत सुविधा, जसे कि, विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह बांधणे अशीही कामे करण्यात येत आहेत. या शिवाय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने शंभर गावात वनराईचे कार्यकर्ते जनजागृतीचे काम करत आहेत.

अंकाचे कार्यकारी संपादक अमित वाडेकर यांनी मनोगतात सांगितले की, डॉ. मोहन धारिया यांनी वनराईच्या माध्यमातून काम सुरू केले. आता वनराई संस्था न राहता जनआंदोलन झाले आहे. या जनांदोलानासाठी लोकांमध्ये वैचारिक परिवर्तन घडविण्यात वनराई मासिकाचा मोठा हातभार आहे. गेली पंचवीस वर्षे मासिक अंक आणि वर्षात एक वार्षिक विशेषांक काढण्यात येतो आणि हा विशेषांक एकाच विषयाला वाहिलेला असतो. गेल्या दोन वर्षातील दुष्काळ व पाणी टंचाईची अवस्था सर्वांनी अनुभवली आणि नंतरचा पाऊसही बघितला. आता गरज आहे पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन करून वापरण्याची त्यासाठी हा अंक लोकांना सखोल मार्गदर्शक ठरेल.

यावेळी विशेषांक तयार करण्यासाठी सहकार्य करणा-या प्रभात प्रिंटर्स व वनराईच्या कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन प्रकाश जगताप यांनी केले तर वनराईचे मुख्य प्रकल्प संचालक जयवंत देशमुख यांनी शेवटी आभार मानले.

वनराईच्या रौप्य महोत्सवी वार्षिक अंकाविषयी……

स्व. डॉ. मोहन धारिया यांनी सुरू केलेल्या वनराई या पर्यावरण क्षेत्रात काम करणा-या स्वयंसेवी संस्थेचा हा २५ वा वार्षिक विशेषांक आहे. यंदाचा अंक जल नियोजन व व्यवस्थापनाबद्दलची सविस्तर माहिती देणारा आहे. या अंकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे पाण्याच्या व्यवस्थापनासंबंधीचे विचार, महात्मा फुले यांचे पाणलोट विषयक विचार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वसमावेशक जलनियोजनासंबंधीचे विचार, महात्मा गांधी यांचे जलव्यवस्थापनाचे अभिनव प्रयोग, राजर्षि शाहू महाराजांचे विचार, संत तुकडोजी महाराज यांनी मांडलेले जलस्त्रोतांच्या व्यवस्थापनाचे विचार याविषयी माहिती आहे. तसेच या अंकात राजेंद्रसिंह, डॉ. एम. एस. स्वामिनाथन, डॉ. यशवंत नेने, कल्पनाताई साळुंके, विजय बोराडे, पोपटराव पवार अशा ३० मान्यवरांच्या लेखांचा समावेश आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन

“समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी...

पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा

बीसीसीआय स्टॅंडर्डसह देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप सुरू पुणे...

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...