चौथ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात व्हेरॉकचे युनायटेड स्पोर्ट्स क्लबवर वर्चस्व

Date:

  • रोहित चौधरी, जयेश पोळ, यश जगदाळे यांची उत्कृष्ट खेळी 

पुणे, दि.8 नोव्हेंबर 2021- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित चौथ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात फिरकीपटू रोहित चौधरी(3-76) याने केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाला 269 धावांवर रोखत धावांची आघाडी घेत वर्चस्व राखले.          
पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावरील तीन दिवसीय सामन्यात दुसऱ्या दिवशी युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या फलंदाजीपासून डावास आज सुरुवात झाली. तत्पूर्वी काल प्रथम फलंदाजी करताना व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 80.1षटकात सर्वबाद 273 धावा केल्या.  या आव्हानाचा पाठलाग करताना युनायटेड स्पोर्ट्स क्लबचा डाव  74.2षटकात सर्वबाद 269 धावावर संपुष्टात आला. यात मल्हार वंजारीने 83चेंडूत 8चौकारांसह 60धावा व श्रीराज चव्हाणने 58चेंडूत 5चौकार व 1षटकारासह 45 धावा केल्या. या दोघांनी नवव्या गड्यासाठी 126चेंडूत 97 धावांची  महत्वपूर्ण भागीदारी केली. व्हेरॉककडून रोहित चौधरीने 76धावात 3 गडी बबाद केले. त्याला समर्थ जगतापने 41धावात 2 गडी, सुरज गोंड(1-15), हर्षवर्धन पवार(1-23) यांनी प्रत्येकी एक गडी बाद करून साथ देत संघाला पहिल्या डावात 4 धावांची आघाडी मिळवून दिली. 
दुसऱ्या डावात  व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने आज दिवसखेर 25षटकात 1गड्याच्या बदल्यात 79धावा केल्या. यात यश जगदाळे नाबाद 33धावा, जयेश पोळ नाबाद 34धावांवर खेळत आहे. दोन्ही संघातील अजून एक दिवसाचा खेळ शिल्लक आहे. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 80.1षटकात सर्वबाद 273 धावा वि.युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 74.2षटकात सर्वबाद 269 धावा(मल्हार वंजारी 60(83,8×4), श्रीराज चव्हाण 45(58,5×4,1×6),  निमीर जोशी 32, परम अभ्युदया 31, आदित्य राजहंस 20, श्रेयस चव्हाण 20, रोहित चौधरी 3-76, समर्थ जगताप 2-41, सुरज गोंड 1-15, हर्षवर्धन पवार 1-23); पहिल्या डावात व्हेरॉक संघाकडे 4 धावांची आघाडी; 
दुसरा डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 25षटकात 1बाद 79धावा(यश जगदाळे नाबाद 33(68,2×4), जयेश पोळ नाबाद 34(60,3×4,2×6), हर्षवर्धन खांदवे 12, मल्हार वंजारी 1-11) वि.युनायटेड स्पोर्ट्स क्लब: . 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...

पुण्यात एकाच वेळी ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम संपन्न

जल संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचे पुण्यामध्ये विशाल स्वच्छता...

शरद पवार यांची प्रकृती पुन्हा खालावली:डिहायड्रेशनमुळे अशक्तपणा, पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात दाखल

पुणे:राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार...

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून:विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार; अजित पवारांच्या अपघाताबाबत संशय

सत्ताधारी पक्ष मस्तीमध्ये असल्याची टीका,घरगुती डिजिटल मीटरचा विरोध,सोलार...