पुणे: बीडीपी बांधकामाला परवानगी देणे, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा पराभव आहे. त्यामुळे चांदणी चौकातील “बीडीपी’च्या आरक्षित जागी शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय मागे घ्यावा आणि पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत महाराजांच्या विचारांची शिकवण देणारी अभिनव शिवसृष्टी साकारावी, अशी अपेक्षा खासदार आणि राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी मंगळवारी व्यक्त केली. अशा निर्णयामुळे “बीडीपी’च्या उद्देशाला धक्का बसणार आहे, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.शिवसृष्टी कोणत्या जागेत उभारावी ? असा प्रश्न उपस्थित करत शिवसृष्टीचा विषय लांबणीवर टाकण्यात येत होता .. अखेरीस भाजप ने स्वतःला राजकीय दृष्ट्या सबल करणारा निर्णय घेतल्याची समीक्षकांकडून कुजबुज सुरु होत असताना दुसरीकडे भाजपकडून दबावतंत्राचा अवलंब होत असल्याचा संशय व्यक्त होत असतानाही खासदा वंदना चव्हाण यांनी आपली स्पष्ट प्रतिक्रिया नोंदविण्याचे धाडस केल्याचे मानले जात आहे . कोथरुड येथील कचरा डेपोच्या जागेत मेट्रोचे स्टेशन उभारण्यात येणार असल्याचे चांदणी चौक येथील “बीडीपी’च्या तब्बल 50 एकर जागेत शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. या प्रकल्पाचे काम वेगाने करण्याकरिता येथे विशेष बाब म्हणून बांधकामाला परवानगी देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. या पार्श्वभूमीवर “बीडीपी’त बांधकामाला परवानगी देण्याच्या निर्णयाला खासदार चव्हाण यांनी विरोध दर्शविला आहे. राज्याच्या प्रमुखांनी पर्यावरणाला छेद देणारे निर्णय घेणे योग्य नसल्याचेही चव्हाण यांनी म्हटले आहे. “पर्यावरणाबाबत महाराजांची भूमिका अत्यंत चांगली होती. त्यातून झाडे आणि त्यांच्या फांद्या तोडण्यालाही त्यांचा प्रखर विरोध होता. ज्यामुळे रयतेला कोणताही त्रास होऊ नये, अशी महाराजांची भूमिका होती. त्यामुळे महाराजांच्या भूमिकेची जोपसना करण्याऐवजी, पर्यावरणावर घाला घालण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आहे. “बीडीपी’ बांधकामे होणार असल्याने महाराजांच्या शिकवणीची अवहेलना करण्यासारखे आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसृष्टी उभारणीचा निर्णय मागे घेऊन महाराजांच्या विचारांचा सन्मान करावी, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.