आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारअनिल जाधव यांनी साधला जनतेशी संवाद

Date:

पुणे-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल जाधव यांनी पुणे स्टेशन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली त्याचबरोबर दिवसभर येथे येणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेशी त्यांनी खुला संवाद साधला .या वेळी दलित समाजाच्या विविध समस्या जाणून  त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले .
        आंबेडकर भवन चा विस्तार करणार
या वेळी जाधव यांनी पुणे स्टेशन येथील आंबेडकर भवन ची जागा अपुरी असून बऱ्याच समस्या या भवन मध्ये असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी आपण निवडून आल्यानंतर आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसरातील शासकीय जागा तांब्यात घेऊन भवन चा विस्तारीकरण करणार असल्याचेसांगितले.
        या वेळी येथे अभिवादनासाठी आलेल्या जनतेशी त्यांनी भेटीगाठी घेऊन  प्रकाश आंबेडकर यांचे हात मजबूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्याचे  आवाहन केले . या भेटी दरम्यान विविध सामाजिक संस्था आणि संघटना चे स्टॉल येथे होते त्यांनी उमेदवार अनिल जाधव यांचा  सत्कार करून पाठीशी राहण्याचे आस्वासन दिले
       या वेळी एम आय एम चे शहराध्यक्ष लियाकत शेख ,भारीपचे शहराध्यक्ष अतुल बहुले ,महिला आघाडीच्या अनिता चव्हाण ,नवनीत अहिरे ,इब्राहिम खान या सह वंचित बहुजन आघाडी आणि मित्रपक्षाचे ,संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोट्या संख्येने उपस्थित होते
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्वलनशील व तत्सम धोकादायक पदार्थांच्या वाहतूकीची आदर्श कार्यपद्धती तयार करण्याचे आदेश -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,दि. २८ : महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित होण्याच्यादृष्टीने ज्वलनशील व...

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे प्रती किलोवॅट १५ हजाराची बचत, वीज ग्राहकांचा फायदा

मुंबई, २८ फेब्रुवारी २०२६: महिना शंभर युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या दारिद्र्य...

अरण येथे संत सावता महाराज समाधी सोहळ्यासाठी पांडुरंगाच्या मूळ पादुका नेण्याच्या मागणीवर सभागृहात चर्चा

वारकरी संप्रदायाच्या भावनांचा सन्मान राखत, समाधी सोहळ्यापूर्वी सर्वसंमतीने निर्णय...

पुण्यात गावठी दारू अड्ड्यावर छापा:महिला अटकेत, ६ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

पुणे -नगर रस्त्यावरील भावडी गावात गावठी दारू तयार करणाऱ्या...