पुणे- सहकार नगर , पद्मावती प्रभागातील नागरिकांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल पदमावती येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. सदर केंद्रात लसीकरण करणाऱ्या नागरिकांना चहा ,नाष्टा , पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे
डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल येथील लसीकरण केंद्राचा शुभारंभ महेश काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक महेश वाबळे ,भारतीय जनता पार्टी पर्वतीविभागाचे अध्यक्ष जीतेंद्र पोळेकर, प्रंशात दिवेकर समन्वयक सरचिटणीस भा ज पा पर्वती ,सहायक आयुक्त प्रज्ञा पोतदार,आरोग्य अधिकारी डॉ विद्या नागमोडे, ,डीएसआय भालेराव,राजू कदम सरचिटणीस भा ज पा पर्वती ,कैलास मोरे ,हरीष परदेशी ,संध्याताई नांदे ,शैलेश देशपांडे,संगिताताई चौरे ,मालतीताई अवघडे,गणेश लगस,प्रशात थोपटे ,भानुदास ढोबळे, करण देवेंद्र ,शेखर खिलारे ,शाम लोढे,अनिल जाधव आदी उपस्थित होते.
नागरिकांना लसीकरणाची ऑन लाईन नोंदणी करण्यासाठी सोय करण्यात आली आहे.
आंबेडकर क्रीडा संकुल पदमावती येथे लसीकरण केंद्र सुरू
Date:

