भारतात कोरोना व्हायरसवर लस लवकरच! पुण्यातील सिरम इंस्टिट्युटमध्ये कोव्हीशील्ड लसच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रायलला औषध महानियंत्रकांची मंजुरी

Date:

पुण्यातील सिरम इंस्टिट्युट ऑफ इंडिच्या कोरोनाविरोधी लस कोव्हीशील्डच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्विनिकल ट्रायलला डीसीजीआय (ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) मंजुरी मिळाली आहे.

जगभरात खळबळ माजवणाऱ्या कोरोना व्हायरसवर विविध देशांवर लस तयार करण्याचे काम प्रगती पथावर आहे. भारतात हे लस ऑक्सफोर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मदतीने पुण्यातील सिरम इंस्टिट्युट करत आहे. सिरम इंस्टिट्युटचे सीईओ अदार पूनावाला ही लस मोठ्या प्रमाणात तयार करणार आहेत. प्रति मिनिट 500 व्हॅक्सिन डोस तयार केले जातील असे वृत्त आहे.सिरम इंस्टिट्यूट कंपनी ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञांसोबत मिळून कोरोनावर लस तयार करणार आहे. ही लस एक्स्ट्राजेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या वतीने तयार केली जात आहे. सध्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लसीने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात केली. तर रशियातील आपल्या प्रायोगिक कोरोना लसीच्या 3 कोटी डोसची तयारी करत आहे. या लसीचे 17 कोटी डोस परदेशात बनविण्याचा मॉस्कोचा मानस आहे. यापूर्वी मॉडर्नना इंक या अमेरिकन कंपनीची कोरोना व्हायरस लसदेखील पहिल्या चाचणीत पूर्णपणे यशस्वी झाली. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार 45 निरोगी लोकांवर या लसीची पहिली चाचणी घेतली असता चांगले निकाल हाती आले आहेत. पहिल्या चाचणीत 45 लोकांचा समावेश होता ते निरोगी असून त्यांचे वय 18 ते 55 असे आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...