पुणे–युएसके फाउंडेशनतर्फे भारतीय चित्रपटसृष्टीतील भरीव योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना यंदा ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आदित्य बिर्ला सेंटर फॉर कम्युनिटी इनिशिएटिव्ह ऍंड रुरल डेव्हलपमेंटच्या चेअरपर्सन श्रीमती राजश्री बिर्ला प्रमुख पाहुण्या म्हणून, तर ऍक्सिस बॅंकेच्या सहयोगी उपाध्यक्षा आणि अमृता देवेंद्र फडणवीस या अध्यक्षस्थानी असणार आहेत. येत्या सोमवारी (दि. १६ जानेवारी २०१७) सायंकाळी ७.३० वाजता नगर रोडवरील हॉटेल हयात रिजन्सी येथे हा सोहळा संपन्न होणार आहे.
ऐतिहासिक वारसा जपणार्या बडोदा संस्थानच्या राधिकाराजे, लेखन आणि साहित्यातील योगदानाबद्दल प्रसिद्ध लेखक चेतन भगत, नाट्य-चित्रपटसृष्टीतील कार्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा, संगीत क्षेत्रातील कार्याबद्दल पंडित शिवकुमार शर्मा, उद्योजिका अनुराधा देसाई, अभिनेत्री रविना टंडन, शिक्षण क्षेत्रासाठी डॉ. विश्वजित कदम, आरोग्य क्षेत्रासाठी रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. परवेझ ग्रांट, उद्योजक अजिंक्य फिरोदिया, युवा उद्योजिका अनन्या बिर्ला आणि टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे यांना ‘उर्जा पुरस्कार 2017’ जाहीर झाले आहेत. त्याचबरोबर शहीद सौरभ फराटे यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सहसंयोजक ‘हॅलो’ हे मासिक आहे. युएसके फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. उषा काकडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.