पुणे, ता. 12 – प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कागदी पिशव्या वापरण्याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे मत पर्यावरण अभ्यासिका आणि लेखिका मृणालिनी वनारसे यांनी व्यक्त केले.
जागतिक कागदी पिशवी दिनानिमित्त डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड प्रशालेत कागदी पिशव्या बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत वनारसे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होत्या.
वनारसे म्हणाल्या, ‘प्लास्टिक बॅगचा वापर पर्यावरणाला घातक आहे. त्यामुळे पृथ्वीवरील सर्व सजीवांना धोका निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून 100 मायक्रॉनपेक्षा कमी जागेच्या प्लास्टिक पिशव्या आणि वस्तूंच्या वापरावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. दैनंदिन कचर्यातील प्लास्टिकचा कचरा कमी करणे हा या मागचा उद्देश आहे. त्यासाठी रोजच्या वापरातील प्लास्टिकच्या वस्तूंचा पर्याय ठरणार्या पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर केला पाहिजे.’
या कार्यशाळेत पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुख्याध्यापिका दर्शना कोरके यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णा बोरकर आणि अवंती बाचीम यांनी संयोजन केले.
‘कागदी पिशव्यांचा वापर करा’ पर्यावरण अभ्यासिका: मृणालिनी वनारसे
Date:

