पुणे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ हैराण
पुणे -उरुळी देवाची गाव पुणे महापालिकेत समाविष्ट होऊन चार वर्षे झाली तरीही गावाला वीज ,पाणी रस्ते , स्वचछता या मूलभूत सुविधा महापालिका देऊ शकली नाही .आता तर पुणे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गाव दोन दिवस अंधारात आहे .कारण वीज बिल भरले नाही म्हणून महावितरण ने गावातील स्ट्रीट लाईट चे कनेकेशन तोडले आहे .त्यामुळे संपूर्ण गाव अंधारात आहे . याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहे.वीज पुरवठा तत्काळ सुरू करावा व गावातील सर्व सेवा सुविधा पूर्ण करवून नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात अन्यथा उरुळी ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनातून माजी उपसरपंच अतुल बहुले यांनी दिला आहे . माजी सरपंच कैलास नेवसे ,दिलीप मोरे व इतर ग्रामस्थ आणि महिला यांनी याप्रकरणी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.
आपल्या पुणे जिल्यातील मौजे उरुळी देवाची या गावच्या नागरी सुविधेकडे लक्ष द्याल का ? असा प्रश्न या निवेदनात ग्रामस्थांनी विचारला आहे .प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे. आज आमच्या गावची रस्त्यावरिल स्ट्रीट लाईटचे कनेक्शन महावितरण ने तोडले आहे व संपूर्ण गाव गेले दोन दिवस अंधारात आहे. लोकांची अत्यावश्यक सेवा सरकार कधीच बंद करू शकत नाही व ते कायद्यास धरुन ही नाही. तरी आपल्या कार्यकाळात २१ व्या शतकात गाव अंधारात असणे हे निश्चित भूषणावह नाही . आपण गावाला अंधारात ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर करावी अशी मागणी या निवेदनातून केली आहे.

