पुणे: संशोधनाद्वारे दिसून आले आहे की बालपणातील सुरवातीची काही वर्ष मुलांच्या शिक्षण आणि विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतात. आपल्या भवतीचे जग अत्यंत जलद गतीने बदलत आहे. त्यानुसार वर्तमान आणि भविष्यास अनुरूप असे बदल शिक्षणातही होणे आवश्यक आहे. समाजाला आज अश्या प्रकारच्या शिक्षणाची गरज आहे. लहान मुलांची देखभाल आणि शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींना त्यांचा अनुभव व कौशल्य उपस्थितांशी शेअर कारण्यासाठी द अर्ली चाइल्डहुड अससोसिएशन त्यांना एका व्यासपीठावर आणणार आहे. अर्ली चाइल्डहुड अससोसिएशन, पुणे चॅप्टरने ‘पीस- पुणे इंटरनॅशनल अर्ली चाइल्डहुड अजुफेस्ट’ ह्या एकदिवसीय परिषदेचे आयोजन केले आहे. २ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत शेरेटन ग्रँड यथे ही परिषद होणार आहे.
मुलांमध्ये भावनिक विकास होऊन पर्यावरणाविषयी संवेदनशीलता निर्माण झाली पाहिजे जेणेकरून ते भविष्यात जबाबदार नागरिक बनु शकतील. अर्ली चाइल्डहुड एजुकेशन चिरस्थायी विकासासाठी अशा शिक्षाणाचा पाया रचत आहे.
या परिषदेमध्ये लहान मुलांच्या शिक्षणाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. नेक्स्ट जेन टीचर एजुकेशन या विषयावर इंटरनॅशनल करिक्युलमच्या शैक्षणिक सल्लागार फर्जाना दोहाडवाला चर्चा करणार आहेत. आत्मा अकॅडमीच्या संचालिका मंजुश्री पाटील देखील उपस्थित राहून चर्चा करणार आहेत. श्रीमती लेसली फॅल्कोनर अध्यापन आणि मूल्यमापनातील ‘डिझाइन थिंकिंग’ या विषयावर चर्चा करणार आहेत.
अर्ली चाइल्डहुड एजुकेशनच्या अध्यक्षा स्वाती पोपट वत्स प्री-स्कुल एजुकेशनच्या जागतिक प्रथेविषयी बोलणार आहेत. शैक्षणिक कार्यकर्त्यांना व शालेय शिक्षकांना समर्थन देत त्यांना सक्षम करतानाच गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने या परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. या विषयावर चार्चा करणे आजच्या काळात अत्यंत गरजेचे आहे.
श्रीमती लेसली फॅल्कोनर म्हणाल्या की, “आजच्या काळात शाळा व पालक जनशिक्षणामध्ये इतके व्यस्त झाले आहेत की मुलांच्या वैयक्तिक गरजा व आवडींना गृहित देखील धरले जात नाही. खेळ, संगीत, कला व निसर्ग हे प्री-स्कुल एजुकेशनचे अविभाज्य भाग बनले पाहिजेत. मानसिक व शारीरिकदृष्ट्या तयार होण्या आधीच मुलांना अक्षर आणि आकडे शिकविले जातात. येथे मला माझा अनुभव व नव्या शिक्षण पद्धतीचे माहिती देण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप आनंदित आहे”.

