उपेंद्रची वकिली

Date:

आपल्या दमदार अभिनयाने वेगवेगळ्या भूमिका सक्षमपणे साकारणारे अभिनेते उपेंद्र लिमये आगामी आक्रंदन या चित्रपटात सरकारी वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. एका कुटुंबावर काही जणांकडून अमानुष अत्याचार केले जातात  त्यांची केस लढवायला कोणीही नसते. या पीडित कुटुंबाच्या वकिलाची भूमिका साकारताना उपेंद्र लिमये दिसणार आहेत. गोविंद मोतीराम आहेर निर्मित, शशिकांत देशपांडे लिखित-दिग्दर्शित आक्रंदन हा चित्रपट २९ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘वंदे मातरम फिल्मस’ चे विवेक पंडित या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून ‘पार्वती पुत्र प्रॉडक्शन्स’च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना उपेंद्र सांगतात की, आदित्य जहागिरदार या वकिलाची व्यक्तिरेखा मी साकारत आहे. अतिशय प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ वकिलाची ही भूमिका आहे. वकिलांची देहबोली त्यांचे व्यक्तिमत्व याच्या निरीक्षणातून ही भूमिका साकारण्याचा प्रयत्न मी केला आहे. समाजात एखादी चुकीची घटना घडल्यानंतर त्याविरोधात तात्पुरता आवाज उठवला जातो. मात्र नंतर अशा घटना विसरल्या ही जातात. चित्रपटाच्या माध्यमातून अशा विषयांवर विचार मंथन होऊन बदल घडणार असतील तर असे चित्रपट आवर्जून यायला हवेत. हे चित्रपट आपल्याला किमान विचार करायला प्रेरित करीत असतात.

आक्रंदन या चित्रपटात उपेंद्र लिमये यांच्यासोबत शरद पोंक्षे, मिलिंद इनामदार,  विक्रम गोखले, गणेश यादव, बाळ धुरी, तेजश्री प्रधान, अमिता खोपकर, प्रदीप वेलणकर, उदय टिकेकर, भारत गणेशपुरे, विलास उजवणे, पल्लवी वाघ,  स्नेहा बिरांजे या कलाकारांच्या भूमिका आहेत. मिलन तारी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

आक्रंदन २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ईडीने अनिल अंबानींचे 3716 कोटी रुपयांचे 17 मजली घर केले जप्त : 40 हजार कोटींच्या फसवणूक प्रकरणात चौकशी सुरू

मुंबई-अंमलबजावणी संचालनालयाने (ED) रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांचा...

अबब गुटखा विक्री प्रकरणी ५ वर्षांत १८ हजार आरोपी गजाआड ! २३९ कोटी १० लाखांचा मुद्देमाल जप्त- मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

आमदार जगताप यांच्या विधानसभेतील तारांकित प्रश्नानंतर धक्कादायक माहिती उघडमुंबई...

बांधकाम साईट्सवर प्रदूषण सेन्सर बंधनकारक:’क्लिन एअर पोर्टल’ डॅशबोर्डचे लोकार्पण, पातळीवर लक्ष ठेवणार-महापौर मंजुषा नागपुरे

पुणे -शहरात बांधकामांच्या ठिकाणी होणारे वायूप्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल...

स्त्री जन्माचा दर कमी होतोय .. याची गंभीर दखल घेणार कधी ?आमदार जितेंद्र आव्हाड

स्त्री भ्रूण हत्या, गर्भलिंग चाचणी करणरे डॉक्टर,...