Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘अपसाऊथ एक्स्प्रेस’ हे नवे क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट पुण्यात सुरु

Date:

index index2 index3 index4

पुणे – पुणेकर खाद्यप्रेमींना आनंद साजरा करण्यासाठी आणखी एक कारण मिळाले आहे. दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ पुरवणारी लोकप्रिय साखळी अपसाऊथने पुण्यातील आपले तिसरे आऊटलेट कोंढव्यात अपसाऊथ एक्स्प्रेस नावाने सुरु केले आहे.

 अपसाऊथ एक्स्प्रेस प्रकारचे हे पुण्यातील पहिलेच रेस्टॉंरंट आहे. ते मूळ अपसाऊथ आऊटलेटपेक्षा किंचित वेगळे आहेच, परंतु आपल्या नेहमीच्या रेस्टॉरंटपेक्षाही अगदी भिन्न आहे. येथे तुम्हाला सजावट केलेले टेबलक्लॉथ किंवा आदरातिथ्य तत्पर वेटर्स आढळणार नाहीत. हे दिखाऊपणा नसलेले, उभे राहून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याचे ठिकाण आहे. येथील खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला अस्सल आणि चविष्ट असे खाद्यपदार्थ अत्यंत जलद सेवेसह मिळतात. विद्यार्थी आणि नोकरदारांना सकाळी झटपट खाऊन आपले कामाचे ठिकाण गाठण्याची घाई असते. त्यांच्यासाठी हे रेस्टॉरंट आदर्श ठिकाण आहे.

 अपसाऊथ एक्स्प्रेसमध्ये अत्यंत लोकप्रिय व जगभर आवडते असे दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ झटपट उपलब्ध होतात. त्यात इडली, मसाला डोसा, मेदूवडा, उथप्पा हे पदार्थ चटणी व सांबार यासह मिळतात आणि पाठोपाठ वाफाळती फिल्टर कॉफीही सज्ज असते. हे सर्व पदार्थ सर्व्ह करण्यात थोडाही वेळ गमावला जात नाही. ग्राहकाला इडलीची प्लेट २० रुपयांत, इडली वडा ३५ रुपयांत आणि अस्सल दक्षिण भारतीय फिल्टर कॉफी केवळ १५ रुपयांत मिळते. येथील खाद्यपदार्थांच्या किंमती स्पर्धात्मक असून प्रतिव्यक्ती सरासरी खर्च केवळ ३५ ते ६५ रुपये येतो. उत्तम दर्जाचे खाद्यपदार्थ व पैशाचे पुरेपूर मूल्य येथे दिले जाते.

 अपसाऊथ एक्स्प्रेस हा बिलियन स्माईल्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडचा क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट (क्यूएसआर) ब्रँड आहे. बिलियन स्माईल्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड ही भारताची आघाडीची दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ पुरवणारी हॉटेल साखळी असून अपसाऊथखेरीज त्यांचे बॉनसाऊथसाऊथइंडिज हेही प्रख्यात ब्रँड्स आहेत.

 दक्षिण भारतीय शाकाहारी खाद्यपदार्थ आधुनिक व जलद सेवा पद्धतीने ग्राहकांना देण्यासाठी अपसाऊथ एक्स्प्रेस कटिबद्ध आहे. उत्पादने व सेवा हे दोन्ही पुरवताना अत्युच्च दर्जा, किमान वाजवी किंमत व आरोग्यदायी वातावरण राखले जाते. अपसाऊथ आपले पदार्थ बनवताना ताज्या घटक पदार्थांचा वापर करते. अनेक बड्या आंतरराष्ट्रीय साखळ्यांमध्ये औद्योगिक तत्त्वावर उच्च प्रक्रियायुक्त पदार्थ बनवले जातात, तसे अपसाऊथमध्ये नसते.

 प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांमुळे पाश्चिमात्य देशांमध्ये लठ्ठपणाची मोठी समस्या उभी राहिली आहे. ताज्या घटक पदार्थांपासून बनवलेले भारतीय पारंपरिक खाद्यपदार्थ हा अशा समस्यांवर उत्तम उपाय आहे. दक्षिण भारतीय शाकाहारी खाद्यपदार्थ चविष्ट, आरोग्यपूर्ण घटकांनी परिपूर्ण, पोटासाठी हलके असतात.

 यासंदर्भात अपसाऊथचे कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह शेफ मनू नायर म्हणाले, की ग्राहकांसाठी सोई-सुविधा निर्माण करण्यास आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. आमच्या आऊटलेटमधील उत्पादनांच्या किंमती इतक्या वाजवी व किफायती आहेत, की तशा पुण्यातील कोणत्याही ब्रँडेड आऊटलेटमध्ये कधी अनुभवासही आल्या नसतील. काळाशी सुसंगती राखून अपसाऊथ एक्स्प्रेसने दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांचा आनंद समकालीन बदलांसह अधिकच वृद्धिंगत केला आहे. आम्ही आरोग्यपूर्ण, चविष्ट, ताजे व पोषणमूल्याने परिपूर्ण असे दक्षिण भारतीय शाकाहारी पदार्थ आधुनिक प्रकारांत सादर केले आहेत.

 अपसाऊथ एक्स्प्रेसने विस्ताराचीही योजना आखली असून चालू वर्षअखेरीपर्यंत पुण्यात त्याची आणखी चार आऊटलेट्स उघडली जात आहेत.

 दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ हे अत्यंत लोकप्रिय भारतीय खाद्यपदार्थांपैकी समजले जातात आणि दिवसभर कधीही म्हणजे न्याहारी, दुपारच्या भोजनात, सायंकालीन स्नॅक्स किंवा रात्रीच्या जेवणात त्यांचा समावेश सुयोग्य ठरतो. यामुळेच अपसाऊथला देशभरात यशस्वी जलद सेवा रेस्टॉरंट्स उभारण्याची मोठी संधी आहे, अशी प्रतिक्रिया अपसाऊथचे व्यवसाय प्रमुख कुमार गौरव यांनी व्यक्त केली आहे.

 अपसाऊथ एक्स्प्रेसमधील खाद्यपदार्थ इतके उत्कृष्ट व लज्जतदार आहेत, की त्यांचा आस्वाद घेण्यासाठी टेबल नसले तरीही ग्राहकांना काहीच उणीव भासणार नाही.

 अपसाऊथ एक्स्प्रेसचा पत्ता – शॉप ३ए, ब्रह्मा इस्टेट, गेरा जंक्शन, लुल्लानगर चौक, कोंढवा, पुणे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतील एकता सोसायटीला ८ कोटीची लाच मागणारा सहकार खात्याच्या विनोद देशमुख व भास्कर पोळला बेड्या

दोघे एसीबीच्या सापळ्यात; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहाथ पकडलंपुणे:...

पुणे कँटोन्मेंटमधील केंद्र शासनाच्या जागांवर जाहीर केलेल्या ‘वक्फ’ मालमत्तांची चौकशी करा

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी...

घराण्यांचे वेगळेपण जाणून घेतल्यास भिंतींचा अडथळा जाणवत नाही : पंडित अरुण कशाळकर

पुणे : गायनाची ज्ञानगंगा घराण्यातूनच उगम पावते आणि तो...