असंघटित गरजूंना देखील मदत मिळणे आवश्यक-सूर्यकांत पाठक

Date:

माणुसकीचे दूत व्यासपीठातर्फे ११०० कुटुंबांना धान्याच्या किटची मदत
पुणे : भारतात अनेक आपत्ती येत असतात. मात्र, बहुतांश वेळा संघटित लोकांकडे मदत मोठया प्रमाणात दिली जाते. शेतकरी, संघटित कामगार यांना अनेकदा मदत मिळते. मात्र, शहरी भागात राहणा-या गरजू असंघटित घटकांना मदत मिळत नाही, ती त्यांना मिळण्याची आवश्यकता आहे. सरकारच्या यादीत देखील असंघटित गरजूंची नोंद नसते. त्यामुळे अशांना समाजाने मदत देणे हे माणुसकीचे कार्य आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत पाठक यांनी व्यक्त केले. 
माणुसकीचे दूत व्यासपीठातर्फे विश्रामबाग वाडयासमोरील झांजले विठ्ठल मंदिरात उपेक्षित, वंचितांना धान्य किट देण्याच्या उपक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, विश्वेश्वर बँकेचे राकेश कोकाटे, प्रदिप तुंगारे, अखिल झांजले, संयोजक सारंग सराफ, महेश काबरा, रुपेश चांदेकर, प्रफुल्ल रोकडे आदी उपस्थित होते. व्यासपीठातर्फे ११०० कुटुंबांना धान्याच्या किटची मदत देण्यात येणार आहे. तसेच कायमस्वरुपी धान्य देण्याचा देखील प्रयत्न आहे. 
सूर्यकांत पाठक म्हणाले, कोविड काळात स्कूल बस, स्कूल रिक्षाचे काम ठप्प होते. त्यांना शासन नियमानुसार त्या गाडया दुसरीकडे देखील वापरता आल्या नाहीत. तसेच, घरकाम करणा-या अनेक महिलांना कामावर बोलविण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्या घरी चूल बंद करण्याची वेळ आली. लोककलावंतांची व कलाकारांनी परिस्थिती देखील बिकट होती. अशांना ही मदत नव्हे, तर प्रसाद म्हणून देण्यात आला, हे कौतुकास्पद आहे. आजची परिस्थिती कठिण असून भविष्यात जिथे मदत लागेल, तेथे आपण पोहोचायला हवे. 
आनंद सराफ म्हणाले, लॉकडाऊन म्हणजे सगळीकडे सर्व बंद होते. मात्र, अशा उपक्रमांच्या माध्यमातून माणुसकीचे दारे खुले करण्याचे काम तरुणाई करीत आहे. समाजातील असंघटित गरजू कुटुंबांच्या घरची चूल विझू नये, याकरीता हा उपक्रम राबविण्यात येत असून दानशूरांनी मदतीकरीता पुढे यावे, असेही त्यांनी सांगितले. सारंग सराफ यांनी प्रास्ताविक केले.हेमंत जाधव यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लाडक्या बहिणींनो बँक खाते चेक करा!:जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

मुंबई-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जानेवारी...