~आजाराची पुनरावृत्ती, आजार विस्तारणे यासाठी योजनेत सुरक्षा कवच,
दुसऱ्यांदा आजार बळावल्यास नेहमीच्या वैद्यकीय सुरक्षा कवचाशिवाय सुरक्षा उपलब्ध~
मुंबई : स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स या देशातील पहिल्या आरोग्य विमा कंपनीने, कर्करोगाचे निदान झालेल्या व्यक्तीसाठी पहिल्या वहिल्या स्टार कॅन्सर केअर गोल्ड या आरोग्य विम्याचे आज उद्घाटन केले.
स्टार कॅन्सर केअर गोल्डतर्फे 5 महिन्याच्या बालकापासून 65 वयोगटातील व्यक्तीस 5 लाख रुपयांपर्यंत सुरक्षा कवच दिले जाते, हे कवच आजाराच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी दिले जाते. या योजनेअंतर्गत आजाराची पुनरावृत्ती झाल्यास, आजार बळावल्यास आणि दुसऱ्यांदा आजार बळावल्यास सुरक्षा कवच दिले जाते. यात नियमित कर्करोगाशी संबंधित नसलेल्या इतर आजारांच्या हॉस्पिटायझेशन खर्चही समाविष्ट आहे.
विमा पॉलिसीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही पॉलिसी खऱेदी करण्यासाठी कुठल्याही वैद्यकीय तपासणीची गरज नाही. ग्राहक आपल्या पूर्वीच्या वैद्यकीय नोंद सादर करू शकतात, यात अलिकडे घेतलेले उपचार त्यांच्या प्रस्ताविक अर्जाचाही समावेश आहे.
स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सचे सीएमडी व्ही. जगन्नाथन् म्हणाले की, “पूर्वी असलेल्या आजारांच्या निदानाशिवाय कुठलाही आजार नसल्यास साधारणपणे आरोग्य विमा दिला जातो. परंतु आम्ही स्टार हेल्थ इन्शुरन्सने लोकांना जीवनास घातक असलेल्या उपचारपद्धती घेता याव्यात यासाठी विशिष्ट उत्पादने विकसित केली आहेत. अशा आजाराशी सामना करणाऱ्यांना, पुढील काही वर्षे वैद्यकीय आणि वित्तीय साहाय्याची गरज असते. आमचा विश्वास आहे की, प्रत्येक भारतीयासाठी आरोग्य विमा ही मूलभूत गरज आहे. हे लक्षात घेता, आम्ही सातत्याने लोकांसाठी जास्तीत जास्त चांगले असेल अशी काही उत्पादने सादर करण्याचा प्रयत्न करत असतो.’’
स्टार कॅन्सर केअर गोल्डचे इतर लाभ म्हणजे, कर्करोगाचे निदान झाल्यास एकूण रक्कमेच्या निम्मी रक्कम तातडीने दिली जाते. याशिवाय शस्त्रक्रिया करायची असल्यास, नसल्यास किंवा कर्करोगाशी संबंधित नसलेले इतर आजार, अपघात अशा सर्वच गोष्टींचा यात समावेश होतो, थोडक्यात या सुरक्षा कवचाअंतर्गत नियमित वैद्यकीय विम्याचेही लाभ प्राप्त होतात.
स्टार हेल्थ इन्शुरन्सचे प्रमुख प्रक्रिया अधिकारी डॉ. एस. प्रकाश म्हणाले की, “भारतात कर्करोग होणाऱ्यांची संख्या वाढते आहे आणि यासाठी अत्याधुनिक उपचारपद्धतीही उदयास येत आहेत. लोकांमध्ये जागरुकता वाढत असल्याने, कर्करोगाचे निदान आता प्राथमिक पातळीवरच होऊ लागले आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यासाठी आजारी व्यक्तीला आपले उपचार पूर्ण करण्यासाठी आर्थिक साहाय्य हवे असते, याव्यतिरिक्त कर्करोग बळावल्यास तर मोठ्या मदतीची गरज असते. स्टार कॅन्सर केअर गोल्डमध्ये कर्करोग झालेल्या व्यक्तींना कर्करोगाशी संबंधित नसलेल्या इतर आजारांसाठीही सुरक्षा कवच प्राप्त होते. यामुळे स्टार हेल्थ इन्शुरन्सद्वारे एका अत्यावश्यक गरज असेलल्या विमाधारकाला मनःपूर्वक समाधान प्राप्त होते.’’
“आमचे नेटवर्क देशातील प्रत्येक राज्यात विस्तारलेले आहे आणि शक्य तितक्या कर्करोग झालेल्या व्यक्तींपर्यंत पोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, त्यांना कर्करोगाशी आणि इतर आजारांशी लढण्यासाठी आर्थिक मदत करत आहोत,’’ असे स्टार हेल्थ इन्शुरन्सचे कार्यकारी संचालक आणि प्रमुख वितरण अधिकारी आनंद रॉय म्हणाले.
स्टार हेल्थ आणि अलाईड इन्शुरन्सतर्फे स्टार कॅन्सर केअर गोल्ड या प्रमुख उत्पादनाचे आयआरडीएआयच्या 2016 साली जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उद्घाटन करण्यात आले आहे.

