मुंबई – व्होडाफोन ही भारतातील अग्रणीची टेलिकम्युनिकेशन्स सेवा पुरवठादार कंपनी आहे आणि मायक्रोमॅक्स हा भारतातील सर्वात लोकप्रिय मोबाइल ब्रँड आहे, या दोहोंतर्फे भारतातील सर्वात कमी किंमतीतील म्हणजेच केवळ 999 रुपयांतील 4जी स्मार्टफोन व्होडाफोन सुपरनेट 4जीसह सादर करण्यात आला आहे.
डेटा स्वीकृतीच्या विकासाला चालना देण्यासाठी संलग्नित दृष्टीकोनासह व्होडाफोन आणि मायक्रोमॅक्सने एकत्रितपणे सर्वोत्तम कन्झ्युमर मोबाइल अनुभव सादर केला आहे. स्मार्टफोन `भारत 2 अल्ट्रा’ हा मायक्रोमॅक्सचा यशस्वी झालेला `भारत सिरीज’मधला 4जी स्मार्टफोन असून, याचे ध्येय सर्वोत्तम कॅमेरा, बॅटरी आणि नव्या स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी डिस्प्लेचे पर्याय आदी सुविधा परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध करून देणे हे आहे. भारत -2 अल्ट्रा रिटेल आउटलेट आणि व्होडाफोनच् दुकानात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून उपलब्ध होतील.
या भागीदारीविषयी सध्याच्या आणि नव्या व्होडाफोनच्या ग्राहकांना मायक्रोमॅक्स भारत -2 अल्ट्रा स्मार्टफोन 2,899 रुपयांना विकत घेता येईल – आणि यावेळ 36 महिन्यांसाठी केवळ 150 रुपयांचे रिचार्ज करायचे आहे. (हे रिचार्ज प्रति महिन्याला कमीत कमी 150 रुपयांचे उपलब्ध आहे.) 18 महिन्यांच्या पूर्ततेनंतर वापरकर्त्यांना 900 रुपयांची रक्कम परत मिळेल आणि अन्य 18 महिने झाल्यावर आणखी 1,000 रुपये परत मिळतील, व्होडाफोनच्या एम-पेसा वॉलेटमध्ये ही रक्कम टाकली जाईल, ही रक्कम आपल्या सुलभतेनुसार डिजिटली वापरू शकतो किंवा रोख रक्कम काढून घेऊ शकतो.
मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक श्री. राहुल शर्मा याविषयी म्हणाले की, “स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या पहिल्या पिढीच्या संपादनाचे ध्येय भारत सिरीजने समोर ठेवले आहे. यासाठी व्होडाफोनबरोबर भागीदारी केल्याने, स्मार्टफोनच्या स्वीकृतीतील पुढचा टप्पा गाठण्यास मदत होणार आहे, आतापर्यंत असे फोन न वापरणाऱ्या ग्राहकांवा अपग्रेड करून फिचर फोन ते स्मार्टफोनपर्यंत आणण्यात येईल. ही उपकरणे परवडणाऱ्या किंमतीत तर असतीलच, शिवाय कमी किंमतीतील डेटा पॅकमुळे स्मार्टफोनची स्वीकृती लवकर होऊ शकेल, सध्या तरी या वापरात खूपच अंतर आहे. मायक्रोमॅक्सला लोकांना सर्वोत्तम उपकरण वापरण्याचा अनुभव द्यायचा आहे, तोही परवडणाऱ्या किंमतीत आणि भारत श्रेणीतच, याअंतर्गत आतापर्यंत तब्बल 2 दशलक्षांपेक्षा जास्त हँडसेटची विक्री झाली आहे.’’
या ऑफरविषयी व्होडाफोन इंडियाचे कन्झ्युमर बिझनेसचे संलग्नित संचालक अवनीश खोसला म्हणाले की, “4जी स्मार्ट फोन आतापर्यंत कधीही सादर न करण्यात आलेल्या, म्हणजेच 999 रुपयांमध्ये सादर करण्यात येत आहे, अशा प्रकारे उत्पादनांचे लोकशाहीकरण करण्यासाठी मायक्रोमॅक्सबरोबर आम्ही भागीदारी करत आहोत, याचा आम्हाला आनंदच आहे. यामुळे स्मार्ट फोन घेण्याची इच्छा असते, परंतु परवडत नसल्याने तो घेता येत नाही, अशा देशातील लाखो लोकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. यामुळे सध्या 4जी न वापरणाऱेही ते वापरू शकतील आणि व्होडाफोन सुपरनेट 4जीचा सर्वोत्तम आनंद घेऊ शकतील.’’
मायक्रोमॅक्स भारत सिरीजबद्दल
आर्थिक मर्यांदांबद्दल कमालीच्या जागरूक असलेल्या देशातील नव्या पिढीच्या स्मार्टफोन वापरकर्त्यांना समोर ठेवण्यात आलेल्या, भारत सिरीजला आतापर्यंत तब्बल 2 दशलक्ष वापरकर्त्यांनी स्वीकारले आहे, या सिरीजने प्रथम संपूर्णपणे निर्दोष फोनचे प्रकार सादर केले.
भारत-2 अल्ट्राची वैशिष्ट्ये म्हणजे याचे सुरेख डिझाइन, याचे प्रायोजन स्प्रेडट्रम एससी9832 1.3 गिगाहर्ट्ज क्वाड कोअर प्रोसेसर, 512 एमबी रॅम + 4 जीबी रोमसह करण्यात आले आहे. याशिवाय याचा डिस्प्ले 4 इंचाचा डब्ल्यूव्हीजीएचा आहे आणि याच्या 0.3 एमपीच्या फ्रंट कॅमेरासह 2एमपीचा रेअर कॅमेरा सादर करण्यात आला आहे. याशिवाय हे उपकरण सीन, फ्रेम आणि बर्स्टसारख्या विविध पद्धतींसह येते, याच्या प्राथमिक वैशिष्ट्यांमुळे वापरकर्ते याचा आनंद लुटू शकतील. 1300 एमएएच बॅटरीच्या अँड्रॉइड मार्शमेलोसह हा हँडसेट सज्ज आहे, शिवाय यावर पूर्ण व्हिडिओ पाहणे सहज शक्य आहे, सोशल नेटवर्किंग आणि चॅट अॅप यामुले स्मार्टफोनचा सर्वोत्तम अनुभव वापरकर्त्यांना मिळतो.
मायक्रोमॅक्स इन्फॉरमेटिक्सबद्दल
मायक्रोमॅक्स इन्फॉरमेटिक्सबद्दल लिमिटेड हा जगातील दहावा सर्वात मोठा मोबाइल ब्रँड आहे (स्पर्धकांवरील संशोधनातून) आणि ही एक अग्रणीची ग्राहक इनेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे. गेल्या दशकभरापासून, मायक्रोमॅक्सने समाजासाठी तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण केलेले आहे, याद्वारे आपल्या उत्पादनांतून परवडणाऱ्या किंमतीतील नावीन्यपूर्णता सादर केली आहे, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी मोठ्या प्रमाणावर स्वीकृती व्हावी यासाठी यातील अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. ब्रँडद्वारे नावीन्यपूर्ण उत्पादनांच्या विविध पोर्टफोलिओची श्रेणी सादर करण्यात आली आहे – यात वैशिष्ट्यांसह, दोन सिम असलेला, 4जी अँड्रॉइड स्मार्टफोन, टॅब्लेट, स्मार्ट टेलिव्हिजन, एअर कंडिशनर आणि लॅपटॉप अशा उत्पादनांचा समावेश आहे. भारत, रशिया आणि सार्क बाजारपेठांमधील यशस्वी प्रक्रियांसह मायक्रोमॅक्सने प्रत्येक महिन्याला 3 दशलक्ष मोबिलिटी उपकरणे सादर केली आहेत.