Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सार्स-कोव्ह-2 विषाणूविरोधात पुण्यातील नोव्हालीड फार्मातर्फे 42 मान्यताप्राप्त औषधांची यादी सादर

Date:

पुणेमार्च 31, 2020 – भारतात औषध पुनरुत्पादनाच्या क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या नोव्हालीड फार्मा या कंपनीने ‘सार्स-कोव्ह-2’ विषाणूविरूद्ध संभाव्यतः प्रभावी ठरू शकणारी व मानवी शरीरावर होणारे परिणाम कमी करणारी 42 औषधे शोधली आहेत. ‘सार्स-कोव्ह-२’ संसर्गाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर रूग्णांना उपयुक्त ठरू शकतील, अशा सुमारे 2010 मान्यताप्राप्त ओषधांची व 30 संभाव्य विषाणुजन्य व मानवी लक्ष्यांची यादी नोव्हालीडने आपले संगणकीय तंत्रज्ञान वापरून तपासली आहे.

‘नोव्हालीड फार्मा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुप्रीत देशपांडे म्हणाले, “काही औषधे कोविड-19 विषाणूवर उपचार करण्यास प्रभावी असल्याचे आढळू शकते. नियामकांनी आधीच मंजूर केलेल्या व सध्या अस्तित्वात असलेल्या अशा औषधांचा वापर अल्प व मध्यम मुदतीत मोठा दिलासा देऊ शकेल. या पध्दतीचा मोठा फायदा म्हणजे ही मान्यताप्राप्त औषधे आधीपासूनच मानवांसाठी सुरक्षित असल्याचे सिद्ध झालेले आहे. ती सक्रियपणे तयार केली जात आहेत आणि म्हणूनच फारच कमी वेळात उपयोगात येऊ शकतात. ती उपचारावर यशस्वी ठरल्यास, लोकांचे प्राण वाचू शकतात, तसेच लागण झाल्यावर प्राथमिक अवस्थेतील आजार गंभीर होण्यापासून रोखू शकतात. ‘कोविड-19’ विरुद्धची लढाई ही काळाविरुद्धची शर्यत आहे. त्याकरीता आम्ही ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’सह (एआय) सुसज्ज असलेल्या आमच्या संपूर्ण संगणकीय पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म तैनात करीत आहोत. यामध्ये गहन सांख्यिकी मॉडेलिंग आणि ‘सिम्युलेशन्स’सह ‘मशीन लर्निंग’ (एमएल) तंत्राचा वापर आम्ही करीत आहोत.”

नोव्हालीड कंपनीने ‘गॅल्नोबॅक्स’ हे पुनर्रचित औषध मधुमेही रुग्णांच्या पायाच्या अल्सरवर विकसीत केले असून ते चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. आतापर्यंत या अल्सरवर अन्यत्र विशेष औषधे निर्माण झालेली नाहीत. सोरायसिस या आजारावरही नोव्हालीड कंपनीने ‘एनएलपी91’ हे पुनर्रचित औषध शोधून काढलेले असून ते 2021 मध्ये चाचणीसाठी दाखल करण्यात येईल.

औषधांच्या संशोधन स्थितीविषयी माहिती देताना ‘नोव्हालीड फार्मा’चे संशोधन प्रमुख डॉ. सुधीर कुलकर्णी म्हणाले, “नोव्हालीड अनेकविध संगणकीय दृष्टिकोन बाळगणार्‍या बहुआयामी रणनीतीचा अवलंब करीत आहे. आम्ही तर्कशुद्ध संगणकीय स्क्रीनिंगचे तीन टप्पे पूर्ण केले आहेत आणि आमच्या शोधांमध्ये आतापर्यंत अशी औषधे समाविष्ट आहेत जी विषाणू प्रथिनांवर थेट हल्ला करून किंवा मानवी प्रथिनांचा प्रसार कमी करण्यास सक्षम बनवून प्रभावी उपचार करू शकतात. सार्स-कोव्ह-२ विषाणूची लागण झालेल्या विशिष्ट टप्प्यातील रुग्णांवर, तसेच श्वसनाच्या तीव्र त्रासाच्या टप्प्यात (एआरडीएस) पोहोचलेल्या रुग्णांवर चाचण्या करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत.”

कोविड-19 हा साथीचा आजार जगभरात फार कमी वेळात पसरला आहे. याचा संसर्ग रोखण्यासाठी आणि आधीच संक्रमित लोकांना ओळखण्यासाठी सामाजिक अंतर राखणे महत्वाचे आहे. तथापि, हे केवळ प्रतिबंधात्मक उपाय आहेत. ‘कोविड-19’शी त्वरीत लढा देण्यासाठी औषधोपचार शोधणे हा खरा शाश्वत उपाय आहे. या विषाणूवर उपयुक्त औषधे आणि लस शोधण्यासाठी जगभरात शास्त्रज्ञ झगडत आहेत,  परंतु आतापर्यंत त्यांना अतिशय मर्यादीत यश मिळालेले आहे.  कोणतेही नवीन औषध किंवा लस शोधून, विकसीत करून त्यास नियामकांची मंजूर मिळण्याची प्रक्रिया प्रचंड वेळखाऊ असेल, तसेच त्यास अनेक सुरक्षितता मूल्यांकनांची आवश्यकता असणार आहे.

 नोव्हालड फार्मा प्रा. लि.विषयी

नोव्हालीड फार्मा ही पुण्यातील कंपनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने औषधांचा शोध व विकास करण्याच्या क्षेत्रात अग्रगण्य आहे. जागतिक पातळीवर ज्या वैद्यकीय गरजांवर विशेष लक्ष देण्यात आले नाही, अशांसाठी गेल्या 10 वर्षांपासून ही कंपनी भारत सरकारच्या सहकार्याने विशेष स्वरुपाचे काम करीत आहे. ‘नोव्हालीड’च्या सर्व औषधांना मोठ्या बाजारपेठांमध्ये पेटंट्स मिळालेली आहेत. अशा वेळी मोठ्या फार्मा कंपन्यांच्या भागीदारीत या औषधांचे परवाने किंवा औषधे विकसीत करणे हा नोव्हालीडच्या व्यवसायाचा गाभा आहे. ‘नोव्हालीड’च्या संशोधनाला ‘बीआयआरएसी इनोव्हेटर अवॉर्ड’, ‘टेक्नोलॉजी लीडर फॉर ड्रग रीपर्पोजिंग इन इंडिया’ ही पारितोषिके ‘फ्रॉस्ट अॅंड सलिव्हन’ यांच्याकडून मिळालेली आहेत. तसेच, या कंपनीच्या संस्थापकांनाही ‘बायोस्पेक्ट्रम एशिया’द्वारे ‘एंटरप्रेन्योर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज आहे – प्रशांत जगताप

पुणे- होणार… होणार.. म्हणता म्हणता पुणे महानगरपालिकेची निवडणूक अखेर...

महायुतीतून पुण्या पिंपरीत अजितदादा कशासाठी बाहेर ? मविआला धोबीपछाड करण्यासाठी ?

पुणे- महापालिका निवडणुका जाहीर होताच आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र...

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या समन्वय समिती प्रमुखपदी रमेश बागवे

पुणे- येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती गठीत...

इनव्हेलियर इंडिया व राष्ट्रवादी कामगार युनियनमध्ये वेतन करार

पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि...