भारतीय वंशाचे उद्योजक श्री. विवेक सालगांवकर यांचा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या प्रतिष्ठित फोरम ऑफ यंग ग्लोबल लीडर्समध्ये समावेश

Date:

सिंगापूर / नवी दिल्ली:  भारतीय वंशाचे ३३ वर्षीय उद्योजक श्री. विवेक सालगांवकर यांना फोरम ऑफ यंग ग्लोबल लीडर्स ऑफ क्लास ऑफ २० च्या प्रतिष्ठित यादीत स्थान देण्यात आले आहे.  एका कुटुंबाच्या मालकीच्या, विविध क्षेत्रांमधील कामाची अनेक वर्षांची दीर्घ परंपरा असलेल्या बलाढ्य उद्योगसमूहात कार्यरत असून देखील श्री. सालगांवकर हे खनिजे आणि नैसर्गिक स्रोत उद्योगांसाठी शाश्वत आणि सामाजिक जबाबदारी पूर्ण होईल अशा दृष्टीने नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान निर्माण करून त्याच्या व्यवसायीकरणाला समर्थन देण्यात सक्रिय सहभागी राहून स्वतःची एक विशेष परंपरा निर्माण करत आहेत.

 

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूईएफ) चे संस्थापक क्लॉस श्वाब यांनी २००४ मध्ये फोरम ऑफ यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ २०२० ची सुरुवात केली.  श्री. विवेक सालगांवकर यांच्यासह या यादीमध्ये ५१ देशांचे ११३ अन्य कार्यकर्ते, शिक्षक आणि राजकीय नेते यांचा या यादीत समावेश आहे.  यावर्षीच्या इंडक्टिजमध्ये फिनलँडचे पंतप्रधान सांना मारिन, विश्वचषक विजेत्या यूएस विमेन्स सॉकर टीमची कर्णधार आणि लैंगिक अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ती मेगन रॅपिनो, क्रिस्टो सह-संस्थापक व ट्रान्सफरवाईज या पिअर-टू-पिअर मनी ट्रान्सफर व्यवसायाचे सीईओ यांचा समावेश आहे.

 

फोरममध्ये सहभागी होण्याच्या बातमीबद्दल विमसन ग्रुपचे डायरेक्टर श्री. विवेक सालगांवकर यांनी सांगितले, “युवा नेत्यांच्या प्रतिष्ठित जागतिक समुदायामध्ये सहभागी होणे हा माझ्यासाठी एक सन्मान आहे. या समूहामध्ये उद्योगक्षेत्र, धोरण आणि वकिली यांचा संगम असून या जगाला जगण्यायोग्य अधिक चांगली जागा बनवण्याच्या दृष्टीने त्यांचे योगदान खूप मोलाचे ठरेल.”  विमसन ग्रुप हा एका कुटुंबाच्या मालकीचा उद्योग असून खनिज संपत्ती, स्थावर मालमत्ता आणि आर्थिक सेवा या क्षेत्रांमध्ये तो कार्यरत आहे.  आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातील सामाजिक उपक्रमांमध्ये देखील हा समूह सक्रिय सहभागी आहे.  त्यांनी पुढे असे सांगितले, पारंपरिक उद्योग असल्यामुळे तंत्रज्ञानाला कमी वाव आहे असे समजले जाणाऱ्या उद्योगामध्ये नावीन्य आणून संचालनात्मक क्षमता सुधारण्यासाठीच्या माझ्या प्रयत्नांमध्ये या प्रोग्रॅमचा खूप मोठा फायदा होईल.” 

 

श्री. सालगांवकर हे मार्च २०२० पासून एका पंचवार्षिक कार्यक्रमात नवीन क्लासमध्ये सहभागी होतील.  या प्रोग्राममध्ये एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन कोर्सेस, शोध मोहीम आणि अनुभवी व्यक्तींसोबत संवाद साधण्याची संधी यांचा समावेश असेल. फोरम ऑफ यंग ग्लोबल लीडर्सच्या सदस्यसंख्येत दरवर्षी वाढ होत असून आता त्यामध्ये १३०० पेक्षा जास्त सदस्य आणि माजी सदस्यांचा समावेश आहे.  जागतिक सार्वजनिक हिताच्या दृष्टीने उद्यमशीलतेला वाव मिळावा यासाठी सार्वजनिक-खाजगी सहकार्याला प्रोत्साहन देण्याच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अभियानासोबत फोरम ऑफ यंग ग्लोबल लीडर्सला जोडले गेले आहे. आता हा फोरम १०० पेक्षा जास्त राष्ट्रीयत्वांचे प्रातिनिधीत्व करतो.  यंग ग्लोबल लीडर्सचे असे ठाम मत आहे की, सद्यस्थितीतील तातडीच्या समस्यांमध्ये सर्व क्षेत्रे, पिढ्या आणि देशांसाठी एक अधिक चांगले भविष्य निर्माण करण्याची संधी दडलेली आहे.

 

अलिबाबाचे संस्थापक टेक टायटन जॅक मा, विकिपीडिया या ऑनलाईन एन्सायक्लोपीडियाचे संस्थापक जिमी वेल्स आणि अभिनेता लिओनार्दो डीकॅप्रिओ यांना याआधी या फोरममध्ये सन्मानित करण्यात आले होते.  या फोरमच्या प्रख्यात भूतपूर्व सदस्यांमध्ये इकोनॉमिक्समध्ये नोबेल पुरस्कार विजेते डॉ. मायकेल क्रेमर आणि मानवाधिकार वकील अमल क्लूनी यांचा समावेश आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...