मर्सिडीझ-बेंझचा उत्पादन व तंत्रज्ञान ब्रँड ‘इक्यू’ (‘EQ’) भारतात दाखल

Date:

मर्सिडीझबेंझ इंडियानेसस्टेनेबल लक्झरीने केले नव्या दशकाचे स्वागत; मर्सिडीझबेंझचा उत्पादन तंत्रज्ञान ब्रँडइक्यू‘ (‘EQ’) भारतात दाखल

विशेष आवृत्ती इक्यू १८८६(EQ 1886) चे उदघाटन

पहिले उत्पादन इक्यूसी (EQC) एप्रिल २०२० मध्ये येणार

२०२० साठी मर्सिडीझबेंझचा मंत्र रेस्टलेस फॉर टुमॉरोअर्थात भविष्यासाठी आतुर

 इक्यू (‘EQ’) म्हणजे इलेक्ट्रिक इंटेलिजन्स‘, “भावना व बुद्धिमत्ता” या ब्रँड तत्त्वांवरून हे नाव ठेवण्यात आले आहे.

·सस्टेनेबल लक्झरीअर्थात पर्यावरणपूरक शान व आराम ही संकल्पना भारतात प्रत्यक्षात आणली जावी यासाठी मर्सिडीझ-बेंझ योजना तयार करत आहे.  ब्रँड इक्यू हा त्या योजनेचा प्रमुख आधारस्तंभ असणार आहे.

·ज्याप्रमाणे मर्सिडीझ-बेंझ म्हणजे आधुनिक शान व आराम, मर्सिडीझ-मेबॅच म्हणजे परिपूर्ण शान व आराम आणि मर्सिडीझ-एएमजी म्हणजे ड्रायव्हिंगची सर्वोत्कृष्ट कामगिरी, त्याचप्रमाणे इक्यू म्हणजे उज्वल भवितव्य.  हा ब्रँड मर्सिडीझ-बेन्झचा सस्टेनेबल लक्झरीसिद्धांत अधोरेखित करतो.

·इव्ही क्षेत्रातील मर्सिडीझ-बेंझ इंडियाचा धोरणात्मक पुढाकार आणि भारतात लक्झरी इलेक्ट्रिक मोटरींग स्थापन करण्याचा संकल्प इक्यू ब्रँडमधून दिसून येतो.

·इलेक्ट्रिक श्रेणीची सुरुवात इक्यूसी मॉडेलपासून होईल आणि ही कार एप्रिल २०२० मध्ये आणली जाईल. ग्राहकांसाठी आकर्षक उत्पादने व सेवा सादर करण्याची कंपनीची योजना.

·नाविन्यपूर्ण गोष्टी शोधण्याची आणि नवनवीन अनुभव घेण्याची हीच योग्य वेळ आहे असे आमच्या ग्राहकांना वाटते.  २०२० या वर्षाचे मर्सिडीझ-बेन्झचे तत्त्व ग्राहकांच्या या उत्साहापासून प्रेरणा घेऊन ठरविण्यात आले आहे – रेस्टलेस फॉर टुमॉरोअर्थात भविष्यासाठी आतुर

.रेस्टलेस फॉर टुमॉरोहा मंत्र मर्सिडीझ-बेंझ इंडियाच्या अनेक आकर्षक, अनोख्या उपक्रमांची प्रेरणा असणार आहे, यामध्ये १० पेक्षा जास्त उत्पादनांचा समावेश असलेल्या ऑफर्स, १००व्या मर्सिडीझ-बेंझ आउटलेटचा शुभारंभ, नाविन्यपूर्ण ग्राहक सेवा उपक्रम यांचा समावेश असेल.

·आपल्या उत्पादन कारखान्यामध्ये मर्सिडीझ-बेंझ इंडिया अनेक पर्यावरणस्नेही उपक्रम राबवत आहे: या तिमाहीच्या अखेरपर्यंत मर्सिडीझ-बेंझ इंडियाच्या कारखान्याच्या एकूण ऊर्जा गरजेपैकी ४५% ऊर्जा अक्षय ऊर्जा स्रोतांकडून पुरवली जाईल, त्यासाठी ४००० पेक्षा जास्त सोलार पॅनेल्स बसविले जात आहेत.  अशाप्रकारे मर्सिडीझ-बेंझ इंडिया दरवर्षी जवळपास १.६ मेगावॅट ऊर्जानिर्मिती करेल व कार्बन उत्सर्जनामध्ये २६०० टनांची घट करेल.

· पर्यावरण संवर्धनाच्या सर्व उपक्रमांमुळे २०२० सालापर्यंत मर्सिडीझ-बेंझ इंडिया हा ७५% ग्रीन एनर्जी उत्पादन कारखाना बनेल.  कार्बन न्यूट्रल बनण्याच्या कंपनीच्या जागतिक महत्त्वाकांक्षेच्या पूर्ततेसाठी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल ठरेल.

·कायद्यानुसार आखून दिलेल्या पर्यावरण सुरक्षा नियमांचे डीलरशिप नेटवर्ककडून १००% पालन करण्यात आले आहे.

· अतिशय पर्यावरणस्नेही उत्पादने: मर्सिडीझ-बेन्झच्या सर्व कार या ८५% रिसायकलेबल आणि ९५% रिकव्हरेबल असतात.

 पुणे: देशातील सर्वात मोठी लक्झरी कार उत्पादक मर्सिडीझ-बेंझने आपला उत्पादन आणि तंत्रज्ञान ब्रँड इक्यू‘ (‘EQ’) भारतात दाखल करून भारतातील संपूर्ण ऑटोमोटिव्ह उद्योगक्षेत्रात आश्चर्याचा मोठा धक्का दिला आहे.  ब्रँड इक्यू ही उत्पादन आणि तंत्रज्ञान इकोसिस्टिम असून गतिशीलता तंत्रज्ञानाच्या भविष्याला आकार देणे हे तिचे उद्धिष्ट आहे.  ‘भावनाआणि बुद्धिमत्ताया दोन मर्सिडीझ ब्रँड मूल्यांपासून हे नाव ठेवले गेले आहे.  ‘इक्यूहा लक्झरी विभागातील पहिला समर्पित इलेक्ट्रो मोबिलिटी ब्रँड असून या ब्रँडचे पहिले उत्पादन इक्यूसी‘ (‘EQC’) एप्रिल २०२० मध्ये दाखल केले जाईल.

 भारतातील आपल्या भवितव्याचा आराखडा तयार करताना मर्सिडीझ-बेंझने सस्टेनेबल लक्झरीअर्थात पर्यावरणपूरक, शाश्वत शान आणि आराम हे मूलतत्त्व मानले असून ब्रँड इक्यू‘ (‘EQ’) ची सुरुवात हा त्या आराखड्याचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.  ब्रँड इक्यूचा भारतात शुभारंभ पुण्यातील चाकण येथील मर्सिडीझ-बेंझ कारखान्यामध्ये मर्सिडीझ-बेंझ इंडियाचे एमडी व सीईओ मार्टीन श्वेन्क आणि मर्सिडीझ-बेंझ इंडियाचे सेल्स व मार्केटिंग विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट संतोष अय्यर यांनी केला.

 या प्रसंगी मर्सिडीझ-बेंझ इंडियाचे एमडी व सीईओ मार्टीन श्वेन्क यांनी सांगितले, भारतात ऑटोमोबाईलचे संशोधक आणि लक्झरी मोबिलिटीचे प्रवर्तक या नात्याने ब्रँड इक्यूदाखल करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.  ब्रँड इक्यूभारतात लक्झरी इलेक्ट्रिक मोटारींगचे नवे युग घेऊन येईल.  इक्यूब्रँड आमच्या सस्टेनेबल लक्झरीउद्धिष्टाचा अतिशय महत्त्वाचा आधारस्तंभ आणि भारतातील पहिला समर्पित लक्झरी इलेक्ट्रिक ब्रँड आहे.  भारतात इक्यू ब्रँड आणण्याची हीच सर्वात योग्य वेळ आहे आणि या ब्रँडचे भारतातील पहिले उत्पादन इक्यूसी इव्ही हे असेल.  आम्हाला पक्की खात्री आहे की भारतासाठीच्या आमच्या इलेक्ट्रिक महत्त्वाकांक्षेचा भक्कम पाया ब्रँड इक्यू रचेल.  आमच्या या महत्त्वाकांक्षेतूनच आमच्या ग्रीन कार पोर्टफोलिओचा विस्तार केला जाईल.  आमच्या भविष्यातील प्रगतीचा हाच मंत्र आहे.”

 मार्टीन श्वेन्क यांनी पुढे सांगितले, इक्यू ब्रँड भारतात दाखल करून आम्ही अतिशय ठामपणे व अभिमानाने घोषणा करतो की मर्सिडीझ-बेंझने इलेक्ट्रो मोबिलिटीच्या नव्या युगामध्ये पदार्पण केले आहे.  आमची इच्छा आहे की इक्यू ब्रँडने अशी इकोसिस्टिम निर्माण करावी ज्यामध्ये इलेक्ट्रिक मोबिलिटी विश्वसनीय, सहजसोपी आणि त्याचवेळी अतिशय रोमांचक असेल.  इक्यूसी एडिशन १८८६ मध्ये प्रगतिशील रचना, रोमांचक ड्रायव्हिंग प्रेरक शक्ती आणि दैनंदिन वापरापेक्षाही कितीतरी जास्त उपयुक्त असणारी श्रेणी ही वैशिष्ट्ये असतील.  भारतात इक्यू ब्रँड दाखल करताना वाहनाचा निश्चिन्त मनाने, दीर्घकाळपर्यंत उपयोग करता यावा हा एकमेव उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवला आहे.” 

 “रेस्टलेस फॉर टुमॉरो” (भविष्यासाठी आतुर):

वर्ष २०२० साठी मर्सिडीझ-बेंझ इंडियाने स्वीकारलेल्या ब्रँड मंत्राबद्दल मार्टीन श्वेन्क यांनी सांगितले, आमच्या ग्राहकांची क्षितिजे सातत्याने विस्तारत आहेत, ते स्वतःमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणत आहेत, त्यांच्या स्वतःच्या यशाला आव्हान देत सातत्याने पुढे जात आहेत.  ग्राहकांमध्ये आतुरता आणि उत्साह अपरिमित असल्याचे वारंवार दिसून येत आहे.  त्यांच्यासाठी यश म्हणजे प्रवासाची सांगता नव्हे तर नव्या प्रवासाचा आरंभ आहे.  ग्राहकांचा हा जोश आणि उत्साह आमच्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे आणि त्यांच्या या मनोवृत्तीनुसार स्वतःला घडविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.  म्हणूनच २०२० साठी मर्सिडीझ-बेंझ इंडियाचा ब्रँड सिद्धांत रेस्टलेस फॉर टुमॉरोहा असणार आहे.” 

 बाजारपेठ विस्तार आणि विकासाचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन मर्सिडीझ-बेंझ इंडिया अनेक उपक्रम हाती घेणार आहे.  यामध्ये अभूतपूर्व उत्पादने, नवनवीन ग्राहक व बाजारपेठांपर्यंत पोहोचणे आणि भारतात लक्झरी इलेक्ट्रिक मोटारींग स्थापन करणे यांचा समावेश असणार आहे.  आमची आंतरिक आतुरता, उत्तेजना, उत्साह हा या सर्व उपक्रमांचा मूळ गाभा असेल.  नवा प्रवास सुरु करण्याची, नवे यश गाठण्याची आणि त्याचवेळी नवे टप्पे निर्माण करण्याची आमची महत्त्वाकांक्षा ही त्यांची प्रेरणा असणार आहे.

 पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी मर्सिडीझ-बेंझ इंडियाचे प्रयत्न:

सस्टेनेबल लक्झरीअर्थात शान, आराम मिळवून देत असताना पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचे संपूर्ण भान राखण्याच्या आराखड्याच्या योजनेच्या आधारे मर्सिडीझ-बेंझ इंडियाने सस्टेनेबिलिटीअर्थात पर्यावरणपूरकता, शाश्वततेवर सर्वाधिक भर दिला आहे.  याचे तीन भाग करण्यात आले आहेत – प्लॅनेट अर्थात पृथ्वी, पीपल म्हणजे लोक आणि प्रॉडक्ट्स अर्थात उत्पादने.  पर्यावरणीय समतोल कायम राखण्यात मदत व्हावी यासाठी कार्बन न्यूट्रॅलिटी साध्य करण्यासाठी विविध अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत.  वसुंधरेच्या संरक्षणात आमचे योगदान म्हणून आम्ही अक्षय ऊर्जेवर भर देत आहोत.

·आज कारखान्यात आवश्यक असलेल्या एकूण ऊर्जेपैकी जवळपास २०% ऊर्जा अक्षय ऊर्जा स्रोतांकरवी (सौर ऊर्जा) पुरवली जाते.  या तिमाहीच्या अखेरपर्यंत हे प्रमाण ४५% पर्यंत वाढविण्याची आमची योजना आहे.  त्यासाठी सोलार पॅनेल्स बसविण्यात येतील.मर्सिडीझ-बेंझ इंडियाच्या कारखान्यात आवश्यक असलेल्या एकूण ऊर्जेपैकी जवळपास ४५% ऊर्जा या सोलार पॅनेल्समधून पुरवली जाईल.

अशाप्रकारे आम्ही दरवर्षी जवळपास १.६ मेगावॅट ऊर्जा निर्माण करू शकू आणि दरवर्षी निर्माण होणाऱ्या कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण २६०० टनांनी कमी होईल.

 इक्यू १८८६: मर्सिडीझ-बेंझ इलेक्ट्रिक कारची उत्पादन वैशिष्ट्ये

प्रभावी रूप आणि उच्चतम दर्जा

अंतर्गत व बाह्य सजावट, वैशिष्ट्ये, तंत्रज्ञान यांचा अतिशय काळजीपूर्वक, सुयोग्य मिलाप हे इक्यूसी एडिशन १८८६ चे वैशिष्ट्य आहे.  लौव्हर्ससहित ब्लॅक पॅनल रेडिएटर ग्रिल व हाय-ग्लॉस ब्लॅक एजिंग यामुळे बाह्य रूप अतिशय प्रभावी असणार आहे.  इक्यूसी एडिशन १८८६ फक्त मेटॅलिक हाय-टेक सिल्वर रंगात उपलब्ध असणार आहे.  याच्या खास वैशिष्ट्यांमध्ये मडगार्डवर इक्यूसी एडिशन १८८६ अशी अक्षरे असलेला हाय-ग्लॉस ब्लॅक बॅज आणि १०-स्पोक २०-इंची लाईट-अलॉय व्हील्स, काळया व सफेद रंगांची शानदार सजावट यांचा समावेश आहे.

 अंतर्गत सजावटीमध्ये देखील हाच प्रभाव कायम राखला गेला आहे.  इंडिगो ब्ल्यू आणि ब्लॅक रंगाच्या अर्टिको मानव-निर्मित लेदर / डिनामिका मायक्रोफायबर अपहोलस्टरी असलेल्या नवीन डिझाईनच्या सीट्स यामध्ये असून सीट बॅकरेस्ट्सवर इक्यूसी एडिशन १८८६ या अक्षरांची कशिदाकारी केलेली आहे.  सेंटर कन्सोलवर देखील बॅजच्या रूपात ही अक्षरे आहेत.  सिल्वर मॅट्रिक्स लुक तसेच इक्यूसी कशिदाकारी असलेले फ्लोर मॅट्स यातून अंतर्गत सजावट किती मन लावून करण्यात आली आहे ते दिसून येते.

 ग्राहकांना व्यक्तिशः छान वाटेल असे वातावरण निर्माण करणारे एनर्जायझिंग पॅकेज

इक्यूसी एडिशन १८८६ मध्ये प्रवाशांना सर्वोत्तम गुणवत्तेची सुरक्षा व अतिशय आरामदायी ड्रायव्हिंगचा पुरेपूर अनुभव घेता यावा यासाठी लक्षणीय ड्रायव्हिंग असिस्टंस सिस्टिम्स बसविण्यात आल्या आहेत.  यातील बर्म्सटर® सराऊंड साऊंड सिस्टिममुळे आवाजाचा उत्तम अनुभव घेता येतो, इक्यूसीच्या आत अत्यंत शांत वातावरणात या सिस्टिमची संपूर्ण क्षमता दिसून येते.

 एनर्जायझिंग पॅकेज ऑन-बोर्ड देखील आहे.  एनर्जायझिंग कम्फर्ट कंट्रोलर कारमधील विविध सिस्टिम्सचे एकत्रीकरण करतो आणि अशाप्रकारे लायटिंग मूडपासून, फ्रॅग्रँस आणि हवेच्या आयोनायझेशनपर्यंत सर्व गोष्टी नीट करून प्रवाशांना आराम मिळेल, ताजेतवाने वाटेल असे वातावरण निर्माण करतो.  परिस्थिती आणि व्यक्ती यांना अनुकूल असा एनर्जायझिंग प्रोग्रॅम सुचविण्यासाठी एनर्जायझिंग कोच वाहन आणि आजूबाजूच्या वातावरणाविषयीच्या माहितीचा वापर करतो.  उदाहरणार्थ, ट्रॅफिकची स्थिती, हवामान, प्रवास किती दूरचा आहे यासारखी माहिती या विश्लेषणात वापरली जाते.  त्याशिवाय ड्रायव्हरच्या सध्याच्या स्थितीबद्दल माहिती देखील वापरली जाऊ शकते.  उपलब्ध असलेल्या गर्मीन® वेअरेबल्स सोबत नेटवर्किंग करून हे सहजशक्य केले जाऊ शकते (स्मार्टवॉचेस / फिटनेस ट्रॅकर्स).  याशिवाय मेमरी फंक्शन सहित ड्रायव्हर आणि फ्रंट सीट पॅसेंजर्सच्या इलेक्ट्रिक ऍडजस्टेबल सीट्स हे देखील एडिशन पॅकेजचे खास वैशिष्ट्य आहे.

 चार्जिंग: आपल्याला हवे तसे आणि वेगवान

प्रत्येक इक्यूसीप्रमाणे इक्यूसी एडिशन १८८६ मध्ये ७.४ केडब्ल्यू आऊटपुट क्षमतेचा वॉटर-कूल्ड ऑन-बोर्ड चार्जर (ओबीसी) आहे त्यामुळे अल्टर्नेटीव्ह करंट सोबत (एसी) घरी किंवा सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्सवर चार्जिंग करणे सहजशक्य आहे.  डोमेस्टिक पॉवर सॉकेटच्या तुलनेत तीनपट वेगाने मर्सिडीझ-बेंझ वॉलबॉक्सला चार्जिंग करणे शक्य आहे.  इक्यूसीसाठी स्टॅंडर्ड असलेल्या अनुकूल मार्केट-स्पेसिफिक प्लग डीसी चार्जींगपेक्षा देखील हे वेगवान आहे.  एसओसीनुसार इक्यूसीला योग्य चार्जिंग स्टेशनला ११० केडब्ल्यूच्या जास्तीत जास्त आउटपुटने चार्ज केले जाऊ शकते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...