टायटन आय प्लसचे स्कायफ्लाय म्यूट्रिक्स स्मार्ट आयवेअरसोबत स्मार्ट आयवेअरमध्ये पदार्पण

Date:

आपल्या ग्राहकांना आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादने उपलब्ध करवून दिली जावीत यासाठी भारतातील आघाडीचा ऑप्टिकल ब्रँड टायटन आयप्लसने स्कायफ्लाय म्यूट्रिक्स स्मार्ट आयवेअर सादर केले आहे.  यासाठी टायटन आयप्लसने स्कायफ्लायसोबत भागीदारी केली आहे.  या नवीन श्रेणीसोबत टायटन आयप्लस स्मार्ट आयवेअर क्षेत्रात पदार्पण करत आहे.  उच्च गुणवत्तेचे नवे मापदंड निर्माण करण्याची आपली परंपरा टायटन आयप्लस स्कायफ्लाय म्यूट्रिक्स स्मार्ट ऑडिओ सनग्लासेससोबत देखील कायम राखेल.

आजच्या काळात आधुनिकतेची आवडनिवड असलेल्या ग्राहकांना उच्च तंत्रज्ञान आणि नावीन्य यांचा मिलाप असलेली उत्पादने हवी असतात.  आपल्या बोटांच्या इशाऱ्याने अवघे जग समोर हजर व्हावे आणि फक्त एक टॅप करून हवी ती गोष्ट मिळवता यावी इतके सहजसोपे आयुष्य हवे अशी आधुनिक ग्राहकांची इच्छा असते.  ग्राहकांची तंत्रज्ञानाची आवड आणि सवय या दोन्ही गोष्टी सातत्याने वाढत जात आहे.  हे सर्व लक्षात घेऊन टायटन आयप्लसने आपल्या ग्राहकांसाठी स्कायफ्लायचे स्मार्ट ऑडिओ सनग्लासेस सादर केले आहेत.  प्रत्येक नवीन उत्पादन आणि भागीदारी करताना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि ग्राहकांचे समाधान या दोन मूल्यांना टायटन आयप्लसमधे सर्वाधिक प्राथमिकता दिली जाते.

स्कायफ्लायचे हे क्रांतिकारी ग्लासेस सखोल संशोधन आणि अभ्यासांती बनविले गेले आहेत.  यामध्ये अनेक गोष्टींचा अतिशय बारकाईने विचार केला गेला आहे. म्हणूनच यातील प्रत्येक वैशिष्ट्य अतिशय उपयुक्त आहे. उदाहरणार्थसक्रियवेगवान जीवनशैलीसाठी आदर्श आयवेअर असण्याबरोबरीनेच सुबक डिझाइन्स आणि हलके वजन ही सोयीस्कर वैशिष्ट्ये देखील यामध्ये आहेत.  स्मार्ट ऑडिओ सनग्लासेसमध्ये नाविन्यपूर्ण ओपन-इयर आहे ज्यामुळे युजर्सना संगीत ऐकत असताना देखील आपल्या आजूबाजूच्या वातावरणाबद्दल जागरूक राहता येते.  क्वालकॉम ब्ल्यूटूथ . आणि आठ तासांचा प्लेटाईम असलेल्या या आकर्षकविविध रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या सनग्लासेसमुळे तंत्रज्ञानाची विशेष आवड असलेल्यांचा प्रत्येक दिवस म्हणजे नव्या उत्साहाने भरलेला असेल.  वापरणाऱ्यांची सुविधा हा या सनग्लासेसच्या रचनेचा मूलमंत्र आहे.  उदाहरणार्थइनबिल्ट माईकमुळे  युजर्सना सिरी आणि गूगल असिस्टंट यांच्या सेवांचा लाभ घेता येतो आणि प्रवासात असतानासुद्धा कॉल्स घेणे सहजशक्य होते.

 

स्कायफ्लायसोबतच्या या भागीदारीबद्दल टायटन आयप्लसच्या मार्केटिंग हेड श्रीमती शालिनी गुप्ता यांनी सांगितलेटायटन आयप्लस नेहमीच आधुनिक विचारधारेला डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करत असल्यामुळे ग्राहकांच्या सतत बदलत्या गरजा आम्ही खूप चांगल्याप्रकारे समजू शकतो.  आजच्या ग्राहकांना आपल्या लूक्सच्या बाबतीत सतत नवनवीन प्रयोग करत राहायला आवडतेत्यांच्या जीवनात तंत्रज्ञान खूप महत्त्वाचे आहे.  अशा ग्राहकांच्या नेमक्या मागण्या समजून घेऊन त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने स्कायफ्लाय म्यूट्रिक्स स्मार्ट आयवेअर नक्कीच यशस्वी होईल.  नावीन्य आणि गुणवत्ता या दोन्ही बाबतीत सर्वोत्कृष्ट अशी उत्पादने भारतातील ग्राहकांना उपलब्ध करवून देण्यासाठी आम्ही ही भागीदारी केली आहे.  स्कायफ्लाय म्यूट्रिक्स हा फॅशनच्या बाबतीत अग्रेसर आयवेअर ब्रँड असून त्यांच्या उत्पादनांमध्ये स्टाईल आणि उपयुक्तता यांचा खूप छान मेळ असतो.  नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाबरोबरीनेच युवी ४०० संरक्षण सुविधा असलेले उत्तम दर्जाचे सनग्लासेस यामध्ये आहेत.”

 

या उत्पादनांच्या संशोधनामध्ये लक्षणीय योगदान देऊन ग्राहकांच्या इच्छा व गरजा पूर्ण करणारी उत्पादन श्रेणी बनविण्यात यशस्वी झालेले स्कायफ्लायचे सहसंस्थापक श्रीप्रभात माहेश्वरी यांनी सांगितलेस्मार्ट आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान असलेली उत्पादने वापरण्याची विशेष आवड असलेल्या आधुनिक ग्राहकांसाठी स्कायफ्लाय हा ब्रँड सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.  कोट्यवधी लोक सहज विकत घेऊ शकतात अशा आधुनिक उत्पादनांपैकी एक म्हणजे सनग्लासेस.  आधुनिक आयवेअर्सची विशाल श्रेणीसंपूर्ण देशभरात पसरलेले रिटेल आणि ऑनलाईन नेटवर्क यामुळे भागीदार म्हणून टायटन आयप्लस आमच्यासाठी अगदी आदर्श आहेत.”  त्यांनी पुढे असेही सांगितलेमध्य पूर्वआफ्रिकायुरोप आणि युएसमधील ग्राहकांना देखील येत्या काही महिन्यातच स्कायफ्लायची उत्पादने विकत घेता येतील.”

 

स्कायफ्लाय म्यूट्रिक्स स्मार्ट ऑडिओ सनग्लासेसची वैशिष्ट्ये

या सनग्लासेसमध्ये यूव्ही ४०० संरक्षक लेन्सेस आहेत.  यामुळे सूर्याच्या किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण होतेच शिवाय दररोज वापरण्याजोगी सर्वात चांगली ऍक्सेसरी म्हणून देखील तुम्ही याचा वापर करू शकता.  लेन्सेस इंटर चेंजेबल असल्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सनग्लासेस बनवू शकता.  स्कायफ्लाय म्यूट्रिक्स स्मार्ट ऑडिओ सनग्लासेसचे भारतातील मार्केटिंग करण्याचे विशेषाधिकार टायटन आयप्लसकडे असून ऑक्टोबर महिन्यापासून सर्व टायटन आयप्लस स्टोअर्स आणि टायटन आयप्लस वेबसाईट्सवर देखील हे खरेदी केले जाऊ शकेल.  चला तर मगया वर्षीची सर्वात आकर्षक आणि फॅशनेबल ऍक्सेसरी लवकरात लवकर विकत घ्या.  फक्त ९९९९ रुपये किंमत असल्यामुळे तुमच्या खिशावर देखील फार भार पडणार नाही.

वैशिष्ट्ये

  • यूव्ही ४०० संरक्षण
  • आजूबाजूच्या वातावरणाबद्दल जागरूक ठेवणारी साऊंड सिस्टीम आणि व्हर्च्युअल बेस वाढविणारे अल्गोरिथम
  • क्वालकॉम ब्ल्यूटूथ ५.०
  • हॅन्ड्स फ्री कॉलिंग
  • इन-बिल्ट माईक
  • ८ तासांचा प्ले टाईम

 

टायटन आय प्लस:

सर्वात नवीन जागतिक आयवेअर ट्रेंड्सच्या फ्रेम्स आणि लेन्सेसची विशाल श्रेणी टायटन आयप्लसमध्ये उपलब्ध करवून देण्यात आली आहे.  टायटनफास्ट्रॅक व डॅश यासारख्या ब्रँड्सच्या १०० पेक्षा जास्त फ्रेम्स असणाऱ्या या स्टोअरमधे प्रत्येक वयोगटासाठीग्राहकांच्या विविध गरजांनुसार खास बनवून दिल्या जाणाऱ्या लेन्सेस देखील मिळतात.  टायटन आय प्लसमधील फ्रेम्स आणि लेन्सेसच्या किमती अनुक्रमे फक्त ४९५ आणि ३९५ रुपयांपासून सुरु होतात.  त्यामुळेच आज नव्या पिढीच्या ग्राहकांसाठी टायटन आयप्लस हे मनाजोगत्या खरेदीचे हमखास ठिकाण बनले आहे.  टायटनफास्ट्रॅक या ब्रँड्स बरोबरीनेच रे-बॅनवोगपोर्शटॅग ह्युएर अशा १० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या विशाल श्रेणीदेखील उपलब्ध आहेत.  बॉश अँड लोम्बअलकॉन सिबा व्हिजन आणि जेअँडजे यांच्या कॉन्टॅक्ट लेन्सेस देखील याठिकाणी आहेत.  ऍरिस्टो या ब्रँडच्या १८ कॅरेट सोन्यापासून तयार केलेल्या फ्रेम्सदेखील टायटन आयप्लसमध्ये विकत घेता येतील.  सध्या देशभरातील २०० पेक्षा जास्त शहरांमध्ये त्यांची ५५० पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...