एसबीआय लाइफ इन्शुरन्सने वर्षामध्ये नोंदवले 13,792 कोटी रुपये

Date:

एसबीआय लाइफ इन्शुरन्स या देशातील एका आघाडीच्या लाइफ इन्शुरन्स कंपनीने 31 मार्च 2019 रोजी संपलेल्या वर्षामध्ये न्यू बिझनेस प्रीमिअममध्ये 26% म्हणजे 13,792 कोटी रुपयांपर्यंत वाढ साध्य केली आहे;या तुलनेत हे प्रमाण 31 मार्च 2018 रोजी संपलेल्या वर्षामध्ये 10,966 कोटी रुपये होते.संरक्षण यावर प्रामुख्याने भर देत, एसबीआय लाइफच्या प्रोटेक्शन न्यू बिझनेस प्रीमिअमचे संकलन 31 मार्च 2019 रोजी संपलेल्या वर्षामध्ये 1,643 कोटी रुपये झाले. 31 मार्च 2018 पर्यंतच्या वर्षातील 600 कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात 174% वाढ झाली. इंडिव्हिज्युअल न्यू बिझनेस प्रीमिअमचे संकलन 15% म्हणजे9,636 कोटी रुपयांपर्यंत वाढले, अगोदरच्या वर्षात ते 8,407 कोटी रुपये होते.31 मार्च 2019 पर्यंतच्या बारा महिन्यांत, एसबीआय लाइफचा करोत्तर नफा 15% वाढून 1,327 कोटी रुपये झाला, तर अगोदरच्या वर्षातील याच कालावधीत तो 1,150 कोटी रुपये होता.31 मार्च 2019 पर्यंत, कंपनीचा सॉल्व्हन्सी रेश्यो 2.13 होता, तर या तुलनेत नियमनात्मक आवश्यकता 1.50इतकी आहे.

31 मार्च 2019 पर्यंत एसबीआय लाइफच्या एयूएममध्ये 21% म्हणजे 1,41,024 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली.31 मार्च 2018 पर्यंत हे प्रमाण 1,16,261 कोटी रुपये होते आणि डेट्-इक्विटी प्रमाण 77:23 होते. 90% डेट् गुंतवणूक AAA व सोव्हिरिअन साधनांत केली आहे.

कंपनीकडे 184,452 प्रशिक्षित विमा प्रोफेशनलचे व देशात 908 कार्यालयांचे विस्तृत वितरण जाळे असून त्यामध्ये सक्षम बँकाश्युरन्स चॅनल, एजन्सी चॅनल व अन्य चॅनल – कॉर्पोरेट एजंट, ब्रोकर, मायक्रो एजंट, कॉमन सर्व्हिस सेंटर, इन्शुरन्स मार्केटिंग फर्म, वेब अग्रिगेटर्स व डायरेक्ट बिझनेस – यांचा समावेश आहे.

मार्च 31, 2019 पर्यंतच्या वर्षातील कामगिरी

  • न्यू बिझनेस प्रीमिअममध्ये26% वाढ
  • प्रोटेक्शनन्यू बिझनेस प्रीमिअममध्ये 174% वाढ
  • इंडिव्हिज्युअल रेटेड प्रीमिअममध्ये15% वाढ व खासगी बाजारहिस्सा 22.3%
  • ऑपरेटिंग एक्स्पेन्स रेश्योमध्ये6.8% वरून 6.4% पर्यंत घट
  • करोत्तर नफ्यामध्ये15% म्हणजे 1,327 कोटी रुपयांपर्यंत वाढ
  • इंडियन एम्बडेड व्हॅल्यूमध्ये (आयईव्ही)17% म्हणजे 22,402 कोटी रुपयांपर्यंत वाढ
  • लागू कराच्या दरानुसार, व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेसमध्ये (VoNB) 22% म्हणजे 1,916 कोटी रुपयांपर्यंत वाढ
  • लागू कराच्या दरानुसार,VoNB मार्जिनमध्ये 18.4% वरून 19.8% पर्यंत वाढ
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

येरवडा कारागृहात 5 मोबाईल,2 पॉवर बँक,चार्जिंग वायर सापडली..

पुणे- येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न...

माझी गाणी आजही रसिकांच्या पसंतीत -सिनेगीतकार समीर अंजान

'एमआयटी एडीटी' विद्यापीठाच्या 'पर्सोना महोत्सवा'ची उत्साहात सांगता लोणी-काळभोर (पुणे)...

अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग दहा वर्षे विजेतेपदाची परंपरा कायम!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा दणदणीत विजयपिंपरी : पुणे आंतर कचेरी...