सुपर कार्स, व्हिंटेज कार्स, सुपर बाइक्स आणि व्हिंटेज बाइक्सचा शो ८, ९ आणि १० फेब्रुवारी ला

Date:

मुंबई– पार्क्स भारतात सुपर आणि व्हिंटेज कार व बाइक शो सादर करत असून तो अशा प्रकारचा पहिलाच शो आहे. एप्रिल २००९ मध्ये सुरू झालेल्या सुपर कार शोचा डिस्प्लेवर असणाऱ्या सुपरकार्सबाबत मोठा विकास झाला आहेच, शिवाय त्याचे मोटरिंग सेलिब्रेशनची भव्य झाले आहे. या सोहळ्यात भर घालण्यासाठी या शोमध्ये पहिल्यांदाच विविध प्रकारच्या सुपर कार्स आणि बाइकसोबत व्हिंटेज कार्स आणि व्हिंटेज बाइक्स डब्ल्यूआयएएच्या शतकमहोत्सवाच्या निमित्ताने समाविष्ट करेल्या जाणार आहेत. काळजीपूर्वक निवडलेल्या कार्स आणि बाइक्स एमएमआरडीए मैदान, बीकेसी येथे ८, ९ आणि १० फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित केल्या जाणार आहेत. या परंपरेचा एक भाग म्हणून सुपर कार क्लब ऑफ इंडिया मुंबईच्या प्रमुख रस्त्यांवर १० फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांच्या खास गाड्यांसर परेड काढणार आहेत.

श्री. गौतम सिंघानिया, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, रेमंड लिमिटेड आणि सुपर कार क्लबचे संस्थापक अध्यक्ष म्हणाले, पार्क्सद्वारे सादर केला जात असलेला मोटर शो भारतातील सर्वात अनोखा शो आहे आणि इतक्या वर्षांत प्रतिष्ठितशो म्हणून त्याची ओळख तयार झाली आहे. या आवृत्तीमध्ये डब्ल्यूआयएएचा शतकमहोत्सवही साजरा केला जाणार असून त्यात विविध सुपर कार्स, व्हिंटेज व क्लासिक कार्स, व्हिंटेज बाइक्स व सुपरबाइक्सचा ताफा या सोहळ्याचा भाग असेल. आम्हाला विश्वास वाटतो, की हा वार्षिक महोत्सव आणखी मोठा व चांगला बनेल.

डब्ल्यूआयएएच्या शतकमहोत्सवाचा भाग म्हणून या सुपरकार्स तसेच विविध व्हिंटेज कार्स, बाइक्स व सुपरबाइक्स १० फेब्रुवारी रोजी सकाळी११.३०नंतररस्त्यांवरून फिरतील तेव्हा मुंबईकरांना त्यांची झलक पाहाता येईल. सुपर कार्स आणि बाइक्स तसेच व्हिंटेज कार्स आणि बाइक्स एमएमआरडीए मैदान, बीकेसी येथे शुक्रवार आणि शनीवारी म्हणजेच ८ व ९ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ दरम्यान प्रदर्शित केल्या जाणार आहेत.

नितिन डोसा, अध्यक्ष, व्हिंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया म्हणाले, ‘डब्ल्यूआयएएचे अध्यक्षपद हा माझ्यासाठी सन्मान आहे आणि मला अभिमान वाटतो, की व्हिंटेज व सुपर कार्स आणि बाइक्सचा भारतातील सर्वात मोठा ऑटो शो डब्ल्यूआयएएच्या शतकमहोत्सवी वर्षात मुंबईत भरवला जाणार आहे.’

परेड फ्लॅग ऑफची वेळसकाळी ११.३०

परेडचा मार्गएमएमआरडीए मैदान, बीकेसी– सी लिंक – वरळी सीफेस – एनएससीआय – हाजी अली – पेडर रोड – बाबूलनाथ – चौपाटी – मरीन ड्राइव्ह – एयर इंडिया इमारतीपाशी डावीकडे वळून – रिगल राउंडअबाउट – एशियाटिक ग्रंथालय – रिझर्व्ह बँक – बलार्ड इस्टेट

विवेक गोयंका, डब्ल्यूआयएएचे अध्यक्ष म्हणाले, या १०० वर्ष जुन्या संघटनेचा अध्यक्ष या नात्याने भारतातील व्हिंटेज व सुपर कार्स आणि बाइक्सचा भारतातील सर्वात मोठा ऑटो शोडब्ल्यूआयएएच्या शतकमहोत्सवी वर्षात मुंबईत भरवला जाणार आहे, याचा मला अभिमान वाटतो. डब्ल्यूआयएए शतकमहोत्सवी वर्षात असल्यामुळे दुहेरी सेलिब्रेशनाची संधी आहे आणि डब्ल्यूआयएएमध्ये आम्ही या मोटरिंग सोहळ्याचा भाग होताना आनंदित झालो आहोत.

ऑडी, मर्सिडीज, मॅसरेटी, लॅम्बोर्गिनी, अस्टन मार्टन, पोर्श, फेरारी, बेंटले आणि रोल्स रॉइस अशा प्रसिद्ध सुपर आणि लक्झरी कार ब्रँड्ससोबतच सुपर कार्सही पहिल्यांदाच पार्क्स सुपर कार शोमध्ये पहिल्यांदा सहभागी होणार आहेत. भारतातील सुपर कार्स मालकांचा पहिला आणि एकमेव क्लब – सुपर कार क्लब (एससीसी) www.facebook.com/SuperCarClubOfficial हा दोन भिन्न व्यक्तिमत्त्व मात्र समान आवड असलेल्या दोन व्यक्तींच्या संकल्पनेतून साकार झाला आहे. सुपर कार क्लब हा केवळ सदस्यांसाठीचा क्लब असून रेमंड लिमिटेडचे सीएमडी श्री. गौतम सिंघानिया त्याचे सदस्य आणि संस्थापक आहेत.

पार्क्सबद्दल

 पार्क्स हा प्रीमियम कॅज्युअल लाइफस्टाल ब्रँड आहे, जो आयुष्यातल्या वेगवेगळ्या प्रसंगांसाठी आवश्यक ड्रेसिंगच्या शोधात असलेल्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करतो. पार्क्स हा ब्रँड २२ ते ३० वर्ष वयोगटातल्या उत्साही, आक्रमक, बहिर्मुख, दमदार आणि आयुष्य मनसोक्त जगणाऱ्या तरुणांचे व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित करतो. पार्क्सने आपला स्वभाव आणि तेजतर्रार वृत्तीचे प्रतिंबिब असलेल्या कपड्यांची निवड करणाऱ्या नव्या पिढीची नस अचूक पकडली आहे.

१९९९ मध्ये स्थापना झाल्यापासून पार्क्स कॅज्युअल वेयर सेगमेंटमधील सातत्यपूर्ण नाविन्य आणि आंतरराष्ट्रीय ट्रेंड्स व स्टायलिंग पसंतीचा ब्रँड ठरला आहे. कामापलीकडच्या आयुष्यातील कपड्यांची गरज पुरवणारा ब्रँड असे त्याचे स्थान असून स्पोर्ट आणि क्लबसारख्या विभागांतून या गरजा पूर्ण केल्या जातात. दर्जावर भर देण्यासाठी हा ब्रँड पूर्ण प्रयत्न करतो. उत्पादनासाठी सर्वोत्तम यंत्रणा, तंत्र, ट्रॅकिंग यंत्रणा व प्रक्रिया वापरली जाते. यातील बहुतांश भाग स्वयंचलित आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...