कोलकाता: अलाहाबाद बँक ही भारतातील प्रमुख व सर्वात जुनी राष्ट्रीयीकृत बँक आणिएसबीआय लाइफ इन्शुरन्सही देशातील एक आघाडीची खासगी लाइफ इन्शुरन्स कंपनी यांनी ग्राहकांना सर्वांगीण आर्थिक नियोजन सुविधा देण्याच्या हेतूने आज बँकाश्युरन्स करारावर सही केली.
देशातील सर्वात मोठ्या बँकाश्युरन्स भागीदारींपैकी एक असणाऱ्या या भागीदारीमुळे, अलाहाबाद बँकेच्या देशभरातील 3,238शाखा एसबीआय लाइफची संरक्षण, संपत्तीनिर्मिती व बचत उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करणार आहेत.यामुळे, ग्राहकांना त्यांच्या सर्व वित्तीय गरजा एकाच ठिकाणी पूर्ण करता येणार आहेत.
अलाहाबाद बँकेचेव्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सीएच. एस. एस. मल्लिकार्जुन राववएसबीआय लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव नौतियाल यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
या महत्त्वाच्या कराराबद्दल बोलताना, अलाहाबाद बँकेचेव्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन राव यांनीग्राहकांना एकाच ठिकाणी विविध लाइफ इन्शुरन्स उत्पादने उपलब्ध करण्याच्या आणि बँकेच्या नॉन–इंटरेस्ट उत्पन्नास सुरुवात करण्याच्या बँकेच्या उद्दिष्टावर अधिक भर दिला.
या भागीदारीविषयी बोलताना, एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव नौतियाल यांनी सांगितले, “ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी आमच्या बँकाश्युरन्स माध्यमामुळे मिळालेले यश विचारात घेता, अलाहाबाद बँकेबरोबरच्या भागीदारीबद्दल आम्ही अतिशय उत्सुक आहोत.ग्राहकांना आता एसबीआय लाइफची संरक्षण, संपत्तीनिर्मिती व बचत उत्पादने सहज उपलब्ध होणार आहेत.यामुळे, ग्राहकांना सर्वांगीण आर्थिक नियोजन करणे शक्य होणार आहे”. त्यांनी नमूद केले, “इन्शुरन्स योजना सर्वसाधारण लोकांना सहजपणे मिळाव्यात, यासाठी आमचे वितरण जाळे महत्त्वाची भूमिका बजावणार आहे आणि अलाहाबाद बँकेशी केलेल्या भागीदारीमुळे या दिशेने एक पाऊल टाकण्यात आले आहे”.