मुंबई– मुंबईतील योगा इन्स्टिट्यूट हे जगातील सर्वात जुने संघटित योग केंद्र योगाच्या उल्लेखनीय सेवेद्वारे लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याची 100 वर्षे पूर्ण करत आहे, तसेच या निमित्ताने मुंबईमध्ये दोन दिवस हार्मनी फेस्ट हे भारतातील सर्वात मोठे वेलनेस फेस्टिवल आयोजित केले जाणार आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि शुक्रवार, 28 डिसेंबर रोजी साजरीकरणाचे उद्घाटन करणार आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईतील योगा इन्स्टिट्यूटच्या संचालक डॉ. श्रीम. हन्साजी जयदेव योगेंद्र हे मान्यवरही कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत.
राज्यपालांच्या हस्ते योगा फॉर ऑल या डॉ. श्रीम. हन्साजी जयदेव योगेंद्र यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन केले जाणार आहे. गेली तीन वर्षे पुस्तकाच्या लेखनाचे काम सुरू होते आणि हे पुस्तक योगा इन्स्टिट्यूटने केलेल्या शंभर वर्षांच्या संशोधनावर बेतलेले आहे.
मुंबईतील योगा इन्स्टिट्यूटच्या संचालक डॉ. श्रीम. हन्साजी जयदेव योगेंद्र यांनी खाली प्रकारे आभार प्रकट केले, “योगा इन्स्टिट्यूटने गेल्या 100 वर्षांत ज्यांच्या जीवनामध्ये बदल घडवले, त्या लाखो लोकांच्या वतीने, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आयुषचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद वाय. नाईक व अन्य मान्यवरांचे त्यांच्या उपस्थितीबद्दल आणि शुभेच्छा व आशीर्वादांबद्दल आभार. आमचे संस्थापक, महान योग गुरू योगेंद्रजी यांच्या उद्दिष्टाला अनुसरून, योगा इन्स्टिट्यूटद्वारे योग सेवा कायम ठेवू शकलो आहोत, याचे समाधान वाटते. आणी सर्वांचे हार्मनी फेस्टमध्ये स्वागत आहे. हा कार्यक्रम भारतभरातील लोकांच्या जीवनामध्ये एकोपा व संतुलन आणण्यासाठी मदत करेल, अशी अपेक्षा आहे.”
हार्मनी फेस्ट – 28-29 डिसेंबर 2018, एमएमआरडीए मैदान, बीकेसी, मुंबई. दुपारी 12 ते रात्री 9
मोफत व सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या हार्मनी फेस्टमध्ये संगीत, मनोरंजन व गुड फूड फेस्टिवल, शाश्वत वस्तूंसाठी बाजारपेठ, 20 तास योग, परिसंवाद, कार्यशाळा, मार्गदर्शन व उपयुक्त भाषणे, नवीन व उत्तम शिकण्यासाठी कार्यक्रम अशा निरनिराळ्या उपक्रमांद्वारे विचार, मन, शरीर व आत्मा यासाठी आरोग्य व वेलनेस राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सेलिब्रेटी होस्ट कबीर बेदी सूत्रसंचालन करणार असलेल्या हार्मनी फेस्टची काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:
. गुड फूड फेस्टिवल – शेफ रणवीर ब्रार, शेफ पंकज भदौरिया अशा सेलिब्रेटींबरोबर निरोगी पदार्थ. यामध्ये फूड ट्रक्स व स्टॉल, बाजारपेठ, फार्मर्स मार्केट यांचा समावेश असेल.
· भारतातील आघाडीच्या स्पोर्ट्स सायन्स व न्यूट्रिशन तज्ज्ञ असणाऱ्या आणि जगातील लोकप्रिय न्यूट्रिशनिस्ट ऋजूता दिवेकर यांचे मार्गदर्शन.
· गौर गोपाल दास, डॉ. एच. आर. नागेंद्र, चिदानंदजी सरस्वती, डॉ. डी. आर. कार्तिकेयन, डॉ. लोकेश मुनी, डॉ. चिन्मय पांड्या, साध्वी भगवती सरस्वती अशा तज्ज्ञांचा समावेश असलेली योगावरील भाषणे व परिसंवाद, लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांचे योगटॉक.
· 4 योग कार्यशाळा: गृहस्थाश्रमींसाठी योगाचा प्रचार करण्यास मदत होण्यासाठी: भवस कार्यशाळा, आसन कार्यशाळा, महिलांच्या आरोग्यावर कार्यशाळा व जोडप्यांसाठी कार्यशाळा.
· आराम मिळण्यासाठी मेडिटेशन पॉड्स
· हार्मनी स्टेजमध्ये शंकर महादेवन, सुखविंदर सिंग, रेखा भारद्वाज अशा लोकप्रिय नावांचा समावेश असणारे सिम्फनी स्टेज अँड म्युझिकल बँड्स यांचे परफॉर्मन्स, तसेच धारावी रॉक्स, इंडियन ओशन, प्रेम जोशुआ, फ्लेमेन्को कथा, कबीर कॅफे अशा बँड्स व म्युझिकल कार्यक्रमांचा समावेश असेल.
थोडे योगा इन्स्टिट्यूटबद्दल
योगा इन्स्टिट्यूट या बिगर–नफा तत्त्वावरील संस्थेची स्थापना 25 डिसेंबर 1918 रोजी, योग गुरू योगेंद्रजी यांनी मुंबईतील सांताक्रुझ येथे केली. योगेंद्रजी यांच्या नेतृत्वाखालील तीन पिढ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे योगा इन्स्टिट्यूटने गृहस्थाश्रमींसाठी योगाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी लक्षणीय योगदान दिले आहे. या पिढ्यांमध्ये माता सिता देवी, डॉ. जयदेवा योगेंद्र व डॉ. हन्साजी योगेंद्र यांचा समावेश आहे.
2018 मध्ये, योगाचा विकास व प्रसार यासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी इन्स्टिट्यूटला आयुष मंत्रालयाकडून पंतप्रधानांचा पुरस्कार मिळाला. आयुष मंत्रालयाच्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाकडून भारतातील पहिले योग स्कूल असेही प्रमाणपत्र मिळाले आहे.
योगा इन्स्टिट्यूटची 500 हून अधिक प्रकाशने आहेत आणि योगेंद्रजी यांची योगावरील पुस्तके अमेरिकेतील ऑगलेथॉर्प युनिव्हर्सिटीतील क्रिप्ट ऑफ सिव्हिलायझेशन या जगातील या सहस्रकातल्या सर्वात जुन्या व सर्वात मोठ्या आणि 8113 एडी वर्षात सुरू केलेल्या टाइम कॅप्स्युलमध्ये जतन करण्यात आली आहेत.
पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. हन्साजी जयदेवा योगेंद्र या एकमेव महिला योग गुरूंना व्यासपीठावर उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले होते.
प्रशिक्षण व आरोग्याविषयी सल्ला, यासाठी योगा इन्स्टिट्यूटमध्ये दररोज अंदाजे 2000 व्यक्ती येतात. गेल्या काही वर्षांमध्ये, योगा इन्स्टिट्यूटने 55,000 हून अधिक प्रशिक्षित योग शिक्षकांना प्रमाणित केले असून, हे शिक्षक 120 देशांमध्ये लाखो जणांना योगाच्या मदतीने सर्वांगीण निरोगी जीवन जगण्यासाठी मदत करत आहेत.

