~आंतरराष्ट्रीय बुकिंगवर 11 नोव्हेंबर 2018 रोजीपर्यंत करा 54,680 रुपयांपर्यंत* (प्रिमिअर) व 25,390 रुपयांपर्यंत * (इकॉनॉमी) इतकी मोठी बचत~ ~भारतांतर्गत प्रवासासाठी आणि भारताबाहेर सार्क/ आशियायी/ आखाती/ यूके/ युरोप व कॅनडा आणि त्याउलट प्रवासासाठी करा 30% पर्यंत बचत~ ~ विमानकंपनीची वेबसाइट व मोबाइल अॅप यामार्फत केलेल्या बुकिंगवर मिळवा अतिरिक्त विशेष लाभ~
मुंब: जेट एअरवेज या भारतातील प्रीमिअर, परिपूर्ण सेवा देणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानकंपनीने सध्या सुरू असलेल्या दिवाळी सेलची मुदत 11 नोव्हेंबरपर्यंत वाढवल्याचे आज जाहीर केले असून, यामुळे ग्राहकांना कंपनीच्या संपूर्ण नेटवर्कमध्ये व एअर फ्रान्स व केएलएम रॉयल डच एअरलाइन्स या कोडशेअर पार्टनरच्या नेटवर्कमध्ये इकॉनॉमी व प्रीमिअर भाड्यावर 30%* पर्यंत बचत करण्याची संधी मिळणार आहे. प्रवाशांना मुंबई – मस्कत या मार्गासाठी 6723* रुपये इतक्या कमी रकमेपासून व मुंबई – कोची मार्गावर 1998* रुपये इतक्या कमी रकमेपासून बुकिंग करता येणार आहे.
रविवार, 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत सर्व बुकिंग चॅनलमध्ये फेअर सेल उपलब्ध असणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या ग्राहकांना तातडीने प्रवासास सुरुवात करता येईल, देशांतर्गत प्रवास करणार असणाळ्या प्रीमिअर प्रवाशांना प्रवाशांना 8 दिवसांनंतर प्रवासास सुरुवात करता येईल 8 दिवसांनंतर प्रवासास सुरुवात करता येईल, तर इकॉनॉमी प्रवाशांना बुकिंगपासून 15 दिवसांनंतर प्रवासास सुरुवात करता येईल.
जेट एअरवेजचे जगभर विक्री व वितरण विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज शिवकुमार यांनी सांगितले, “सध्या सुरू असलेल्या आमच्या सेलला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे आणि या दिवाळीत अधिकाधिक ग्राहकांना विमानप्रवासाचा आनंद देण्याच्या हेतूने आम्ही ही सवलत संपूर्ण आठवड्यासाठी विस्तारण्याचे ठरवले आहे. या सवलतीमुळे, ग्राहकांना आपल्या प्रियजनांना हॉलिडे भेट करता येईल आणि अविस्मरणीय आठवणी निर्माण करता येतील, शिवाय मोठी बचतही करता येईल. www.jetairways.com किंवा विमानकंपनीच्या मोबइल अॅपवरून थेट बुकिंग केल्यास ग्राहकांना विविध प्रकारचे विशेष लाभ मिळतील. भारतातून आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या ग्राहकांना प्रवासात खरेदीही करता येईल आणि जेटबुटिक या आमच्या इन-फ्लाइट ड्युटी-फ्री शॉपिंग सेवेमध्ये 20% सवलत मिळवता येईल.”
भारतातून प्रवास करणाऱ्या ग्राहकांना विमानकंपनीकडून थेट सेवा दिली जाणाऱ्या 66 देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय ठिकाणी प्रवास करण्याचा पर्याय निवडता येईल किंवा कंपनीच्या कोडशेअर पार्टनर्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या विमानसेवेमार्फत अॅम्स्टरडॅम व पॅरिस येथून व येथे विविध ठिकाणी प्रवास करता येईल. स्पर्धात्मक भाड्याव्यतिरिक्त, उत्तम जागतिक जाळे व कार्यक्षम व काळजीवाहू ग्राउंड-हँडलिंग सेवा यामुळे जेट एअरवेजच्या सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना आरामदायीपणे प्रवास करता येईल आणि भारतीय आदरातिथ्याची झलक देणाऱ्या कंनीच्या व्यक्तिगत इन-फ्लाइट सेवेचा अनुभव घेता येईल.
आखातातील शहरांतून तिकिट बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना भारत, आशियायी व सार्क येथील विविध ठिकाणी जाण्यासाठी या योजनेंतर्गत बुकिंग करता येऊ शकते. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका येथील विविध शहरांतील ग्राहकांना भारत, आखात, युरोप, लंडन व मँचेस्टर येथील विविध ठिकाणी जाण्यासाठी या सवलतीचा लाभ घेता येईल. फार ईस्टकडील प्रवाशांना भारत, गल्फ, सार्क, अॅम्स्टरडॅम, लंडन, मँचेस्टर व पॅरिस येथे जाता येईल, तर युरोप व टोरोंटो येथील प्रवाशांना भारतात विविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी या सवलतीचा लाभ घेता येईल.