मुंबई : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय), या देशातील रिटेल पेमेंटच्या यंत्रणेत अग्रणी असलेल्या प्रमुख संस्थेने संपूर्ण भारतभरात `कॅम्पस कनेक्ट’ या उपक्रमातून वित्तीय साक्षरता कँपेनचे आयोजन केले आहे.
एनपीसीआयच्या ह्युमन रिसोर्सेसचे उपाध्यक्ष आणि प्रमुख श्री. नीतिश चर्तुवेदी म्हणाले की, “जागतिक साक्षरता दिन साजरा करताना लेस कॅश सोसायटीबद्दल जागरुकता करणे हाच याचा प्रमुख उद्देश आहे. एनपीसीआयच्या कॅम्पसमधून नोकरीसाठी निवडीच्या भेटीपूर्वी प्री-प्लेसमेंट संवाद घडवून आणणे हाही याचा उद्देश आहे.’’
वित्तीय साक्षरता कार्यशाळा प्रामुख्याने एनपीसीआयच्या ह्युमन रिसोर्सेसद्वारे राबवल्या जातात, ऑगस्टपासून त्यांचे आयोजन केले जात आहे, याअंतर्गत देशभरातील कॅम्पसमध्ये डिजिटल पेमेंट एकीकृत करण्यात आली आहेत. पुणे, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई आणि मुंबई यासारख्या ख्यातनाम व्यवस्थापन संस्थांमध्ये 35 युनिव्हर्सिटीतून 3000 मुलांसाठी आयोजन केले जाणार आहे, याअंतर्गत युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) / भारत इंटरफेस फॉर मनी (भिम) यासारख्या वित्तीय उत्पादनांची ओळख करून दिली जाणार आहे.
पुण्याचे इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, डी वाय पाटील, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट/इंजिनिअरिंग, श्री बालाजी सोसायटी यासारख्या व्यवस्थापन संस्था आणि मुंबईच्या एनएमआयएमएस, डी वाय पाटील, चेतनाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, एन एल दालमिया, के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज आणि रिसर्च आणि आयटीएम यासारख्या ख्यातनाम संस्था कॅम्पस कनेक्टमध्ये सहभागी होणार आहेत.
याशिवाय, त्यांना `एनपीसीआय आयडिथॉन’मध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे – यूपीआय / भिम अॅपमध्ये सुधारणा करण्यासाठी नव्या संकल्पना सादर करण्यासाठीचे हे सत्र असणार आहे.
बीएचआयएम / यूपीआयबद्दल थोडेसे : भारत इंटरफेस फॉर मनी (बीएचआयएम) हे एक सुलभ, सोपे आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय)च्या साहाय्याने त्वरीत देयकांचे हस्तांतरण करणारे व्यासपीठ आहे. यामुळे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत थेट व तातडीने पैशांचे हस्तांतरण करता येते आणि मोबाइल क्रमांक किंवा देयकांचे पत्तेही गोळा करू शकता येतात. ही देयकांची अनोखी उपाययोजना असून, यामुळे वैयक्तिकस्तरावर तातडीने पैसे पाठवणे आणि त्यासाठीची रिक्वेस्ट प्राप्त करणे शक्य होते.
एनपीसीआयबद्दल थोडेसे :
भारतातील रिटेल देयक यंत्रणांसाठी केंद्रीय पायाभूत सुविधा म्हणून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ची स्थापना 2009 साली करण्यात आली आणि देशातील सर्व प्रकारच्या बँकांसाठी देयकांच्या वापरासाठी रिझर्व्ह बँकेने ही संकल्पना अमलात आणली.