पुणे -बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे शिवाजीनगर पोलिस ट्रॅफीक कर्मचा-यांसाठी मास्क आणि टोपी भेट देण्याचा कार्यक्रम,बँक ऑफ महाराष्ट्र पुणे शहर अंचल चे महाप्रबंधक व अंचल प्रबंधक श्री. प्रशांत खटावकर व सहायक पोलिस आयुक्त श्री. प्रभाकर ढमाले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
पुणे शहरामध्ये मोठया प्रमाणावर वाहतुकीचे नियम न पाळल्यामूळे अपघात घडतात. वाहतुकीच्या नियमांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन केले तर अपघातांची संख्या खुपच आटोक्यात येईल असे हया प्रसंगी सहायक पोलिस आयुक्त श्री. प्रभाकर ढमाले यांनी सांगितले.
वाहतुकपोलिस कर्मचारी हे वाहतुकीचे व्यवस्थापन करताना खुपच खडतर परिस्थितीमध्ये काम करतात त्यांच्या सुविधेसाठी अल्प मदत म्हणून धुळ आणी उन्हाच्या स्वरक्षणासाठी मास्क व टोपी देत आहोत असे बँक ऑफ महाराष्ट्र पुणे शहर अंचल चे महाप्रबंधक व अंचल प्रबंधक श्री. प्रशांत खटावकर यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी महाबँकेचे सहायक महाप्रबंधक श्री. अनिल गर्दे, पोलिस निरीक्षक श्री. शिंदे तसेच शिवाजीनगर ट्रॅफीक ऑफीसचे कर्मचारी व बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी उपस्थित होते.