मुंबई: लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी ऑफ इंडिया) या भारतातील सर्वात मोठ्या आयुर्विमा कंपनीने सप्टेंबर 2017 अखेरीपर्यंतच्या सहा महिन्यांतील ऑडिटेड आकडेवारी जाहीर केली आहे.कॉर्पोरेशनने सप्टेंबर 2017च्या अखेरीपर्यंत 1,48,037 कोटी रुपयांचा एकूण प्रीमिअम मिळवला. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 1,32,257 कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात 11.95% वाढ झाली.कॉर्पोरेशनचे ढोबळ एकूण उत्पन्न गेल्या वर्षी याच कालावधीतील 2,22,350 कोटी रुपयांवरून 2,50,267 कोटी रुपयांपर्यंत, म्हणजे अंदाजे 12.56% वाढले कॉर्पोरेशनची एकूण मालमत्ता 27,25,808 कोटी रुपये होती, या तुलनेत गेल्या वर्षी याच काळात ती 23,90,056 कोटी रुपये होती. यंदा त्यात 14.04% वाढ झाली.
30.09.2017 पर्यंतच्या कालावधीत एकूण पॉलिसी पेआउटचे प्रमाण 76,126 कोटी रुपये होते, तर गेल्या वर्षी ते 73,546 कोटी रुपये होते. त्यात 3.51% वाढ झाली. त्यामध्ये 30.9.2017 पर्यंतच्या अर्ध्या वर्षात 79,74,383 दाव्यांसाठी दिलेल्या 35482.07 कोटी रुपयांच्या रकमेचा समावेश असून, गेल्या वर्षी हे प्रमाण 73,22,250 दावेदारांसाठी 35643.75 कोटी रुपये होते.सप्टेंबर 2017 पर्यंतच्या सहा महिन्यांत कॉर्पोरेशनच्या नव्या व्यवसायाने 23.68% वाढ साध्य करून 68224.29 कोटी रुपयांची नोंद केली.पेन्शन व ग्रुप सुपरअन्युएशन बिझनेसने नव्या व्यवसायाच्या प्रीमिअममधून मिळालेल्या उत्पन्नापोटी 47078 कोटी रुपये नोंदवले, तर गेल्या वर्षी हे प्रमाण 37136 कोटी रुपये होते, त्यात यंदा 27% वाढ झाली.या विभागाने सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत 5.81 कोटी जणांना संरक्षण दिले आहे.
निकालांविषयी बोलताना एलआयसी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व्ही. के. शर्मा म्हणाले, “आमची कामगिरी आमच्या अपेक्षेप्रमाणे झाली आहे. कॉर्पोरेशनने सक्षम पाया व मूलभूत मूल्ये यांच्या मदतीने उत्तम निकाल नोंदवले आहेत. आमच्यावर विश्वास असलेल्या देशभरातील आमच्या ग्राहकांनी आम्हाला पाठिंबा दिला व उत्तम आर्थिक कामगिरी करण्याची क्षमता दिली.ग्राहकांचे समाधान व नफा हे दोन्ही साध्य करण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि ग्राहकांना मिळणारा अनुभव व कंपनीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आम्ही सातत्याने तंत्रज्ञानावर भर देतो.”
लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाविषयी:
मुंबई येथे मुख्यालय असलेल्या एलआयसीची 8 झोनल कार्यालये, 113 विभागीय कार्यालये, 2048 शाखा, 1408 सॅटेलाइट कार्यालये व 1238 मिनी कार्यालये देशाला सेवा देत आहेत. एआयसीने सक्षम वित्तीय संस्था म्हणून नाव कमावले असून, प्रशासन व पारदर्शकता ही ठळक वैशिष्ट्ये आहेत.भारतीय विमा क्षेत्रात तीव्र स्पर्धा असूनही एलआआयसी ही अजूनही प्रमुख विमा कंपनी असून 30.09.2017 पर्यंत तिचा बाजारहिस्सा योजनांमध्ये 74.75% आहे व पहिल्या वर्षातील प्रीमिअममध्ये 74.10 % आहे (लाइफ काउन्सिल अहवालानुसार).
सुरुवातीला 5 कोटी रुपयांच्या भांडवलाने सुरू झालेल्या कॉर्पोरेशनने हळूहळू 100 कोटी रुपयांपर्यंत वाढ केली आणि 27.26 लाख कोटी रुपयांची मालमत्ता असलेली सक्षम संस्था म्हणून स्थान निर्माण केले आहे. आज एलआयसी अंदाजे 29 कोटी योजनांची सेवा देत आहे. एलआयसी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून विविध सुविधांच्या माध्यमातून व दावे वेगाने पूर्ण करण्याच्या माध्यमातून आपल्या योजनाधारकांना उत्तम अनुभव देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.अप्रतिम कामगिरी व योजनाधारकांच्या अपेक्षेनुसार सेवा देण्याची क्षमता यमुळे एलआयसी या क्षेत्रातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड आहे. गेली 61 वर्षे एलआयसी पाय रोवून उभी आहे आणि आज ती विश्वास, आत्मविश्वास व विश्वासार्हता यासाठीचा ‘आयकॉन’ ठरली आहे. एलआयसी विविध योजनांमार्फत लाखो जणांना जीवनकवच देत आहेच, शिवाय पायाभूत सुविधा व सामाजिक क्षेत्रात गुंतवणूक करून राष्ट्रनिर्मितीसाठी विविध प्रकल्पही राबवून जीवनकवचाच्या पलीकडे जाऊन मोठी भूमिका निभावत आहे. य प्रकल्पांमध्ये वीजनिर्मिती व ट्रान्समिशनचे प्रकल्प/योजना, गृह क्षेत्र, पाणीपुरवठा व सांडपाणी प्रकल्प, रस्ते, पूल व रस्ते वाहतूक विकास यांचा समावेश आहे.