अनलॉक -पुणे महापालिकेची नियमावली जाहीर-वाचा

Date:

मॉल,सिनेमागृहे ,नाट्यगृहे ,शाळा पूर्णपणे बंद – इतर ४ वाजेपर्यंत सुरु,शनिवार -रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद

नवे निर्बंध पहा

पुणे -महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे शहरासाठी मिशन बिगेन अगेन म्हणजे अनलॉकची नियमावली जाहीर केली असून त्याबाबतचे आदेश आज (शनिवार) काढण्यात आले आहेत. सदरील आदेश हे सोमवार (दि.7 जून) पासून लागू होणार आहेत. पुणे महापालिकेची नियमावली पुढील प्रमाणे आहे.

मॉर्निंग वॉक साठी सार्वजनिक ठिकाणे सकाळी ५-९ पर्यंत सुरु राहतील. तर खासगी ॲाफिस हे ४ पर्यंत ५०% क्षमतेने फक्त वर्किंग डे ला सुरु राहील. सार्वजनिक कार्यक्रमांना ५०% क्षमतेने ४ वाजेपर्यंत परवानगी राहील. लग्नाला ५० लोक तर अंत्यविधीला २० लोकांना परवानगी असणार आहे. तर महापालिकाच्या सर्वसाधारण सभा ५०% क्षमतेने सुरु राहतील.

सुट देण्यात येत असलेल्या आस्थापना / सेवा

पुणे मनपा क्षेत्रातील खालील कार्यालये सुरू राहतील.

1. केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था यांची कार्यालये

2. को-ऑपरेटीव्ह बँका, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी बँका

3. अत्यावश्यक सेवा पुरवठा करणार्‍या कंपन्यांची कार्यालये

4. विमा / मेडिक्लेम कंपनी

5. औषध उत्पादन करणारे आस्थापना व त्यासाठी लागणारे साधन सामग्री उत्पादक तसेच त्याच्याशी संबंधित कार्यालये

6. रिझर्व बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था

7. सर्व नॉन-बँकिंग वित्तीय महामंडळे

8. सर्व मायक्रो फायनान्स संस्था

9. वकील, सी.ए. यांची कार्यालये, वित्तीय संस्थेशी संबंधित कार्यालये

* अत्यावश्यक सेवेतील दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवार पुर्णतः बंद राहतील.

* मॉल, सिनेमागृह, नाटयगृह, संपूर्णतः बंद राहतील.

रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. दुपारी 4 नंतर तसेच शनिवार आणि रविवार फक्त पार्सल सेवा / घरपोच सेवा रात्री 11 पर्यंत सुरू राहील.

* लोकल ट्रेन मधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व महिलांसाठी, शासकीय कर्मचारी, विमानतळ सेवा, बंदरे सेवा यांच्या कर्मचार्‍यांना प्रवास करणेस परवानगी राहील.

* पुणे मनपा क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे (उद्याने), खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवडयातील सर्व दिवस सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत सुरू राहतील.

* सुट देण्यात येत असलेल्या आस्थापना / सेवा व्यतिरिक्त सर्व खाजगी कार्यालये कामाचे दिवशी 50 टक्के कर्मचारी क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.

* पुणे मनपा क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा व कोविड-19 व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरू राहतील.

* शासकीय कार्यालय (अत्यावश्यक / कोरोना विषयक कामकाज करणार्‍या कार्यालयां व्यतिरिक्त) 50 टक्के अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत सुरूराहतील. उपरोक्त कार्यालय / आस्थाना यांना यापेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित असे आवश्यक असल्यास त्यांनी संबंधित आस्थापना प्रमुख यांनी आपली व्यवस्थापन प्राधिकारी यांची परवानगी घ्यावी.

* सर्व आऊटडोअर स्पोर्ट्स सर्व दिवस सकाळी 5 ते 9 या वेळेत सुरू राहतील.

* सामाजिक, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रम यास 50 लोकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत परवानगी राहील.

* लग्न समारंभ कार्यक्रम जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.

* अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.

* विविध बैठका, सभा, स्थानिक संस्था तसेच सहकारी संस्थांच्या मुख्य सभा, निवडणुका या 50 टक्के उपस्थितीत घेण्यास परवानगी राहील.

* पुणे मनपा क्षेत्रातील ज्या बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था आहे असे बांधकाम सुरू ठेवता येतील. तथापि, बाहेरून येणारे कामगार असल्यास असे बांधकाम दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी राहील. मात्र, बाहेरून येणारे कर्मचारी हे दुपारी 4 वाजता तेथून घरी जाण्यासाठी बाहेर पडतील.

* कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाची विक्री करणारे दुकाने / गाळे हे आठवडयातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.

* ई-कॉमर्स सेवांना सर्व वस्तू व सेवा यांचा पुरवठा करण्याकरिता परवानगी राहील.

* पुणे मनपा क्षेत्रात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास (जमावबंदी) प्रतिबंद राहील तसेच सायंकाळी 5 नंतर कलम 144 (संचारबंदी) लागू करण्यात येत आहे.

* व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र सदर ठिकाणी वातानुकूल सुविधा वापरता येणार नाही.

* पुणे मनपा क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (पीएमपीएमएल) असान क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.

* माल वाहतूक करणार्‍या वाहनांना व त्यामध्ये जास्तीत जास्त 3 व्यक्ती (चालक, क्लीनर आणि मदतनीस) यांना इतर प्रवाशांना लागू असलेल्या नियमानुसार प्रवास करण्यास परवानगी राहील.

* खाजगी वाहनातून, बसेस तसेच लांब अंतराच्या रेल्वे मधून अंतर जिल्हा प्रवास करण्यास परवानगी राहील. मात्र सदर वाहने शासनाने घोषित केलेल्या लेवल 5 मधील ठिकाणी थांबणार असतील तर ई-पास असे बंधनकारक आहे. अशावेळी वाहनामधून प्रवास करणार्‍या प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र ई-पास आवश्यक राहील.

* एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट मधील उत्पादन नियमितपणे सुरू राहील.

* खालील उत्पादन क्षेत्र / उद्योग नियमीतपणे सुरू राहतील

1. अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग

2. सतत प्रक्रिया करणारे उद्योग

3. राष्ट्रीय सुरक्षा व संरक्षणाशी संबंधित उत्पादन करणारे उद्योग

4. डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर, आयटी सपोर्टिंग सर्व्हिसेस

* कर्मचार्‍यांनी कामाच्या ठिकाणावरून घरी 5 वाजेपर्यंत पोहचावे.

पुणे मनपा क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग 30 जून 2021 पर्यंत पूर्णतः बंद राहतील. मात्र ऑनलाइन शिक्षणास मुभा राहील. सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस पूर्णतःबंद राहतील.

* मद्य विक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार आणि रविवार होम डिलेव्हरी सुविधा सुरू राहील.

* सदर आदेश हे पुणे मनपा क्षेत्रामध्ये येणार्‍या पुणे कॅन्टोमेंट व खडकी कॅन्टोमेंट यांना देखील लागू राहतील.

अत्यावश्यक सेवामध्ये खालील सेवांचा समावेश असेल

1. रूग्णालये, हायग्नोस्टिक सेंटर, क्लिनिक्स, लसीकरण, वैद्यकीय विमा कार्यालय, फार्मसीज व फार्मासिटीकल कंपनी, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा, त्यास सहाय्य करणारे उत्पादन व वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स, वाहतूक व पुरवठा करणार्‍या आस्थापना, लस, सॅनिटायझर, मास्क, वैद्यकीय साहित्य व उपकरणे, कच्चा माल उत्पादन व पुरवठा करणारे व त्यांच्याशी निगडीत सर्व सेवा.

2. पशु वैद्यकीय दवाखाने, पाळीव प्राणी संगोपन केंद्र, पाळीव प्राणी खाद्याची दुकाने

3. वन विभागाने घोषित केल्यानुसार वनीकरणाशी संबंधित कामे.

4. विमानसेवा व त्याच्याशी संबंधित सेवा

5. किराणा, भाजीपाला, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई व सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने, मटन, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने

6. शीतगृह आणि गोदाम सेवा

7. सार्वजनिक वाहतूक – टॅक्सी, रिक्षा, रेल्वे, विमान सेवा, सार्वजनिक बस

8. वेगवेगळया देशांचे राजदूत यांची कार्यालये

9. पूर्व पावसाळी नियोजित कामे

10. स्थानिक प्राधिकरणाव्दारे पुरविण्यात येणार्‍या सार्वजनिक सेवा

11. रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि त्यांनी अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केलेल्या सेवा

12. सेबी तसेच सेबीची कार्यालये व त्यांच्याशी निगडीत सेवा देणारी कार्यालये

13. दूरसंचार सेवा आणि त्याच्याशी निगडीत देखभाल व दुरूस्ती सेवा

14. मालवाहतूक

15. पाणी पुरवठा सेवा

16. कृषी संबंधित सवेवा आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरूस्ती सेवा इत्यादी)

17. सर्व प्रकारचे आयात-निर्यात

18. ई-कॉमर्स (अत्यावश्यक सेवेतील वस्तू व सेवांच्या पुरवठयासाठी)

19. मिडिया

20. पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने पुरविणार्‍या सेवा

21. सर्वप्रमारच्या कार्गो / कुरिअर सेवा

22. डेटा सेंटर / क्लाऊड सर्व्हिसेस / माहिती व तंत्रज्ञान यांचेशी संबंधित पायाभूत सुविधा आणि सेवा

23. शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा

24. विद्युत व गॅस वितरण सेवा

25. एटीएम

26.पोस्टल सेवा

27. कस्टम हाऊस एजंट्स, लस /औषधे / जीवन रक्षक औषधांशी संबंधित वाहतूक करणारी अधिकृत परवाना धारक मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर

28. कोणत्याही अत्यावश्यक सेवांसाठी कच्चा माल, पॅकेजिंग साहित्याची निर्मिती करणारे / पुरवठा करणारे सेवा

29. पावसाळयाच्या हंगामाकरिता नागरिक अथवा संस्थांसाठी साहित्याची निर्मिती करणार्‍या सेवा

30. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे घोषित केलेल्या अत्यावश्यक सेवा.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...