Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

प्रसारमाध्यमातील अहवाल चुकीचा आणि दिशाभूल करणारा -केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा खुलासा

Date:

नवी दिल्ली, 4 जानेवारी 2022

केंद्राने आपत्कालीन प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणा सज्जता पॅकेज टप्पा-II अंतर्गत केवळ 26.14% निधी जारी केल्याचा दावा करणारा प्रसारमाध्यमातील अहवाल चुकीचा  आणि दिशाभूल करणारा आहे.केंद्र सरकारने प्रसारमाध्यमातील बातम्यांमध्ये केलेल्या दाव्यानुसार 26.14% नव्हे तर राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी राखून ठेवलेल्या निधीपैकी 50% निधी जारी केला आहे.एका वृत्तवाहिनीने अलीकडेच दावा केला आहे की केंद्र सरकारने केवळ 26.14% ECRP-II अर्थात आपत्कालीन प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणा सज्जता पॅकेज टप्पा-II निधी राज्यांना वितरित केला आहे. वृत्त वाहिनीने पुढे दावा केला आहे की केंद्राने नोव्हेंबर 2021 पर्यंत निधी वितरित केला आहे आणि राज्यांनी मंजूर निधीपैकी 60% निधी वापरला आहे. बातमीतील  अहवाल चुकीचा आहे आणि दावे खोटे, दिशाभूल करणारे आणि चुकीच्या तथ्यांवर आधारित आहेत.असे केंद्रीर आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे

पुढे असेही म्हटले आहे कि ,’मंत्रिमंडळाने 8 जुलै 2021 रोजी “भारत कोविड-19 आपत्कालीन प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणा सज्जता पॅकेज टप्पा-II” (ECRP-फेज-II) ला मंजूरी दिली. 1 जुलै 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत 23,123 कोटी रुपये किमतीची (केंद्रीय हिस्सा – 15,000 कोटी रुपये आणि राज्याचा हिस्सा – 8,123 कोटी रुपये) ही योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना काही केंद्रीय क्षेत्र (CS) घटकांसह एक केंद्र पुरस्कृत योजना (CSS) आहे.

योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच, केंद्र सरकारने कृतीशील उपाययोजना केल्या आणि 22/07/2021 रोजी राज्य/केंद्रशासित प्रदेशांना केंद्राच्या वाट्यापैकी 15% निधी जारी केला. निधीचा दुसरा हप्ता ऑगस्ट 2021 मध्ये राज्यांना आगाऊ म्हणून लवकरच जारी करण्यात आला. 24 ऑगस्ट 2021 पर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) द्वारे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना एकूण 6075.85 कोटी रुपये (केंद्रीय वाटा 50%) आधीच जारी केले गेले आहेत. राज्यनिहाय जारी करण्यात आलेला केंद्रीय वाटा आणि आजपर्यंतचा खर्च परिशिष्ट I मध्ये पाहता येईल.

वृत्तवाहिनीच्या अहवालात अनेक तथ्यात्मक त्रुटी आहेत.

केंद्र सरकारने प्रसारमाध्यमातील बातम्यांमध्ये केलेल्या दाव्यानुसार 26.14% नव्हे तर राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी राखून ठेवलेल्या निधीपैकी 50% निधी जारी केला आहे.

सर्व निधी बातमीत दावा केल्यानुसार नोव्हेंबर 2021 मध्ये नव्हे तर 24 ऑगस्ट 2021 पर्यंत जारी केला गेला.

केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेल्या 6075.85 कोटी रुपये निधीपैकी, बातम्यांच्या अहवालात दावा केल्यानुसार 60% नव्हे तर 1679.05 कोटी रुपये, (म्हणजे 27.13%), राज्यांनी 31/12/21 पर्यंत खर्च केले आहेत.

उर्वरित निधी आधीच जारी केलेल्या किमान 50% निधीच्या प्रगती आणि वापराच्या आधारावर राज्यांना दिला जाईल. प्रत्यक्ष प्रगती आणि खर्च या दोन्हीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दैनंदिन निरीक्षण केले जात आहे.

Annexure I

ECRP-II Financial Progress (Source: NHM-PMS Portal) (As on 3rd January 2022)

S. No.Name of the State / UTAmount Approved
(Rs. In Crore)
Funds Available with State/UT
(Rs. In Crore)
Expenditure
(Rs. In Crore)
% Expenditure State Share Released to SHS (Y/N)
123456=5/48
1Andaman & Nicobar Islands14.237.110.000.00% NA
2Andhra Pradesh662.09348.2666.8819.20% Y
3Arunachal Pradesh118.5070.971.161.64% Y
4Assam657.03387.481.470.38% Y
5Bihar1,368.70860.72160.6218.66% Y
6Chandigarh5.682.840.7927.77% NA
7Chhattisgarh626.60188.0325.6513.64% N
8DNH & DD9.384.760.8217.17% NA
9Delhi50.3425.1734.92138.74% Y
10Goa17.519.820.030.35% Y
11Gujarat661.99323.9878.9424.37% Y
12Haryana272.71152.0291.4160.13% Y
13Himachal Pradesh203.87120.2911.959.94% Y
14Jammu & Kashmir211.04128.823.142.44% NA
15Jharkhand569.81319.450.000.00% Y
16Karnataka831.80420.032.570.61% Y
17Kerala267.35144.9030.2020.84% Y
18Ladakh34.5131.262.327.41% NA
19Lakshadweep1.500.500.000.00% NA
20Madhya Pradesh1,447.51728.62192.3926.40% Y
21Maharashtra1,294.69683.982.220.32% Y
22Manipur78.0738.673.007.76% N 
23Meghalaya79.6542.371.423.34% Y
24Mizoram44.301.660.000.00% N 
25Nagaland62.4628.110.000.00% N 
26Odisha807.33430.9855.0912.78% Y
27Puducherry7.184.520.8418.52% Y
28Punjab330.94165.73144.9387.45% Y
29Rajasthan1,472.28708.3334.004.80% Y
30Sikkim18.809.980.000.00% Y
31Tamil Nadu798.94399.66325.5881.46% Y
32Telangana456.08229.3442.8318.68% Y
33Tripura87.3346.510.601.29% Y
34Uttar Pradesh2,690.07939.9487.059.26% N 
35Uttarakhand254.78135.868.546.28% Y
36West Bengal983.97503.82267.6953.13% Y
 TOTAL17,499.008,644.491,679.0519.42% 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...