राज्यातील सरकार गेल्याचे दु:ख नाही, शिवसेनेने धोका दिल्याचे दु:ख -केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

Date:

मुंबई-राज्यात आमचेच सरकार आले होते. त्यावेळी शिवसेना-भाजपच्या युतीसाठीच आम्ही मते मागितली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळा शिवसेना नेत्यांसमोर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे वारंवार सांगितले होते. त्यामुळे जनतेनी आम्हाला मते दिली होती. पण शिवसेनेने दगाफटका केला. असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना राज्यातील सरकार गेल्याचे दु:ख नाही, शिवसेनेने धोका दिल्याचे दु:ख आहे, अशी खंत रावसाहेब दानवेंनी बोलून दाखवली.

दरम्यान यावेळी बोलताना जनतेने युती पाहून मतदान केले. मात्र जनतेशी आणि आमच्यासोबत धोका झाला. आणि शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. त्यांच्यातून एखाद्याला धोका झाला असेल आणि आम्हाला येऊन मिळाला असेल तर आमचा काय दोष? असा टोलाही त्यांनी पहाटेच्या शपथविधीवरून लगावला आहे.

शिवसेनेचे हिंदुत्त्व बेगडी आहे, त्यामुळे त्यांना आम्ही हिंदुत्त्ववादी आहोत हे सांगायची वेळ आली आहे. यावरून त्यांचे बेगडी हिंदुत्त्व आहे हे स्पष्ट होते आहे. यावेळी बोलताना त्यांनी आमचे नेते दत्तापंत ठेंगडी हे नेहमी एक उदाहरण देते होते, पूर्वी दुकानावर तुपाचे दुकान असे लिहलेले असायचे. आणि आता शुद्ध तुपाचे दुकान अशी पाटी लावलेली असते. याचा अर्थ भेसळ आहे हे स्पष्ट होते. शिवसेनेचे ही तसेच झाले आहे, हिंदुत्व सोडले नाही हे शिवसेना सांगते. याचा अर्थ त्यांनी हिंदुत्व सोडले आहे. तर यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना आम्ही हिंदुत्वावादी आहोत हे सांगाव लागत नव्हते. उलट लोकच त्यांना हिंदूहृदयसम्राट म्हणत होते, असेही दानवेंनी म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

किडनी विक्री प्रकरणातील सावकरांवर कधी कारवाई करणार? – वडेट्टीवार

मुंबई- विदर्भातील शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी किडनी विकवी लागल्याचा प्रकार...

DGCA कडून विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न:अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार...

घरकुल लाभार्थ्यांना तीन पावसाळे उलटले तरी घर मिळाली नाही,जनाची नाही तर मनाची ठेवा – वडेट्टीवार

मुंबई- राज्यातील घरकुल योजनेतील घरं मंजूर होऊनही गेल्या तीन...

अमेरिकेत हिमवादळामुळे 11 हजार विमानांची उड्डाणे रद्द:5 लाख घरांची वीज गेली, 153 वर्षांत पहिल्यांदाच वर्तमानपत्र छापले जाऊ शकले नाही

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकेत जोरदार वाऱ्यांमुळे आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे विमानतळावरील धावपट्ट्या...