स्वातंत्र्यलढ्यातले शहीद चंद्रशेखर आझाद यांच्यावरील ‘आझाद की शौर्य गाथा’ प्रदर्शनाचे केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते उद्‌घाटन

Date:

नवी दिल्ली, 24 जुलै 2021

केंद्रीय सांस्कृतिक आणि संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी नवी दिल्लीतील  इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात (आयजीएनसीए) “आझादी का अमृत महोत्सव” चा भाग म्हणून अमर शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनावर आधारित  “आझाद की शौर्य गाथा” प्रदर्शनाचे काल उद्‌घाटन केले. आयजीएनसीएतर्फे साजरा होत असलेल्या तीन दिवसीय ‘कलाकोष प्रतिष्ठान दिवस’ सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी काल पुस्तके व माहितीपटही प्रसिद्ध करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयजीएनसीए ट्रस्टचे अध्यक्ष  राम बहादुर राय होते. यावेळी संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.हरे राम त्रिपाठी; आयजीएनसीएचे सदस्य सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी; कलाकोष  विभागाच्या अध्यक्ष डॉ. सुषमा जटू व इतर पाहुणे उपस्थित होते.संस्कृती राज्यमंत्री याप्रसंगी म्हणाले की, “आझादी का अमृत महोत्सव” च्या माध्यमातून  देशातील युवा  पिढीला स्वातंत्र्यलढ्यात किती लोक शहीद झाले हे कळेल. स्वातंत्र्यलढ्यात दुर्बल घटकातील मोठ्या संख्येने शहीद झाले होते ,ज्याचा उल्लेख इतिहासात  कधीही करण्यात आला नाही असे ते म्हणाले .राम बहादुर राय आपल्या भाषणात म्हणाले की,  1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला असला तरी 1857 मध्ये स्वातंत्र्यलढ्यावर  महत्त्वपूर्ण भर देण्यात आला होता. म्हणूनच ही दोन्ही वर्षे आणि त्या दरम्यानचा काळ अतिशय महत्वाचा आहे.डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले की, सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने ” आझादी का अमृत महोत्सव ” साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत आणि या मालिकेचा एक भाग म्हणून ‘आझाद की शौर्यगाथा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भरत नाट्य संशोधन मंदिराच्या संगीत पद्माराणी नाटकास ११ पारितोषिके

पुणे : ६४व्या महाराष्ट्र राज्य संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत...

कलाकार कट्टा उध्वस्त कराल तर … रोहित पवारांनी दिला इशारा

कलाकार कट्ट्याचा त्रास , व त्याबाबत तक्रारी पोलिसांकडेही नाहीत...

कर्नाटक सरकारची 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरास बंदी घालण्याची घोषणा

बेंगलोर - कर्नाटक सरकारने शुक्रवारी 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल...

सोने 3 दिवसांत 8,000 ने स्वस्त, चांदी 26,000 ने घसरली

आज म्हणजेच 6 मार्च (शुक्रवार) रोजी सोने आणि चांदीच्या...