केंद्रीय कामगार मंत्र्यांची कामगार राज्य विमा महामंडळ रुग्णालयाला भेट

Date:

पुणे, ता. २१ : बिबवेवाडीच्या ईएसआयसी रुग्णालयाच्या विस्तारीकरणाच्या कामाचा केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज आढावा घेतला.

स्थानिक आमदार माधुरी मिसाळ यांच्या मागणीवरून यादव यांनी रुग्णालयाला भेट देऊन पाहाणी केली. या वेळी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

बिबवेवाडीत ईएसआयसीच्या साडेसोळा एकर जागेवर ५०० खाटांचे रुग्णालय उभारण्याचे काम सुरू आहे. यादव यांनी आज या कामाचा आढावा घेतला.

या वर्षअखेरीपर्यंत आवश्यक परवानग्या आणि निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. जानेवारी महिन्यापासून प्रत्यक्ष बांधकाम सुरू होणार असून, जून २०२५ पर्यंत टप्प्याटप्याने काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. सर्व वैद्यकीय सोयींनीयुक्त सात मजल्याच्या इमारतीत सुमारे साठ हजार चौरस फूट बांधकाम होणार आहे. तळमजल्यावर अतिदक्षता विभाग, पहिल्या मजल्यावर बाह्य रुग्ण कक्ष, दुसर्या मजल्यावर बाह्य आणि आंतर रुग्ण सुपरस्पेशालिटी सुविधांसाठी स्वतंत्र कक्ष, तीन ते सातव्या मजल्यापर्यंत साधारण ते अतिदक्षता विभागाचे वॉर्ड असणार आहेत. रेडिओलॉजी, बायोकेमेस्ट्रि, मायक्रोबायोलॉजी अशा विविध प्रयोगशाळांचा समावेश असणार आहे. अशी माहिती केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे उदयकुमार चोगले आणि ईएसआयसीचे बिनय काकडे यांनी दिली.

आमदार मिसाळ म्हणाल्या, पर्वती विधानसभा मतदारसंघात एकही शासकीय रुग्णालय नाही. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची मोठी गैरसोय होते. बिबवेवाडी येथील ईएसआयसीच्या नऊ एकर जागेवर ससूनच्या धर्तीवर रुग्णालय व्हावे यासाठी गेली दहा वर्षे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. 500 खाटांचे रुग्णालय नियोजित वेळेत पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींना धमकी देणाऱ्या राज आमेरावर कारवाईची मागणी: काँग्रेसचे निषेध आंदोलन

पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौकात निषेध...

आता २२ राज्यांमध्ये नागरिकत्व सिद्ध करावे लागणार,एसआयआर,बोगस मतदारांना वगळणार

पुणे (prab)- तब्बल २१ वर्षांनंतर नव्याने मतदार यादी तयार होणाऱ्...

पुण्यात एकाच वेळी मुळा, मुठा, खडकवासला धरणासह एकूण ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम

संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा...

भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई:भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची घोषणा

भिवंडी: भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात...