पुणे- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारपासून पुणे दौऱ्यावर आहेत आणि त्यांची राहण्याची सोय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूट मध्ये करण्यात आली आहे.आज शनिवारी रात्री शहा पुण्यात मुक्कामी आहेत.महापालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी पुण्यात असल्याने भाजपने शक्तीप्रदर्शन करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे.महापालिकेतील कार्यक्रमासह गणेश कला क्रीडा मंच येथी मेळाव्यात अमित शहा काय बोलणार याकडे लक्ष लागलेले आहे.नोव्हेंबर महिन्यात अमित शहा यांचा दौरा होणार होता, पण तो अचानक पुढे ढकलण्यात त्यानंतर हा दौरा रविवारी होत आहे. रविवारी सकाळी १० वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन, त्यानंतर चाकण येथील एनडीआरएफचा कार्यक्रमाला शहा उपस्थित राहणार आहेत. दुपारी वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार संस्थेच्या कार्यक्रम झाल्यानंतर पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमीपुजन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळण्याच्या लोकर्पण शहा यांच्या हस्ते होणार आहे.भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित केला असून, त्यात शहा हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे पक्षाकडून तसेच नगरसेवक व इच्छुक उमेदवरांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरू केली आहे. हा कार्यक्रम संपल्यानंतर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी शहा पर्वती पायथा येथील घरी जाणार आहेत.दरम्यान, महापालिकेची निवडणूक जवळ येत असताना भाजपने संघटनात्मक बांधनी सुरू केली आहे. तसेच नुकतेच पक्षाच्या नव्या कार्यालयच्या उद्घाटनप्रसंगी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला लक्ष करत पराभव करून दाखवा असे आव्हान दिलेले आहे. त्यानंतर आता अमित शहा हे भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याने यानिमित्ताने निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
अजित पवारांच्या नावावर बुक होता सूट…
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. आज ते पुण्यात मुक्कामी आहे. पुण्यातील क्विन्स गार्डन येथे व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊस आहे. या गेस्ट हाऊसमध्ये अमित शहा यांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाने चाचपणी केली.पण, कोणताही व्हीव्हीआयपी सूट उपलब्ध नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. या व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊसमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासाठी सूट राखीव असतो. तसंच प्रीमिअम सूट हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासाठी असतो. अजितदादा शनिवारी आणि रविवारी पुण्यात मुक्कामी असल्यामुळे त्यांच्या नावावर सूट बूक होता.प्रशासनाने अमित शहा यांच्या सूट उपलब्ध नसल्याची माहिती अजित पवार यांच्या कानी घातली. अजित पवार यांनी क्षणाचा विलंब न करता अमित शहा यांच्यासाठी आपला व्हीव्हीआयपी सूट उपलब्ध करून दिला. अजित पवार यांनी तातडीने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रशासनानेही सुटकेचा श्वास सोडला. कारण, केंद्रीय मंत्र्यांसाठी पुण्यातील खासगी हॉटेलमध्ये व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. पण, सुरक्षेच्या मुद्दा उपस्थितीत झाल्यामुळे खासगी हॉटेल्समध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था ऐनवेळी करता आली नाही.

