ऑनलाईन जीबीचे नाटक थांबवा आता… … मागणीनुसार घेतली स्पष्ट भूमिका …
पुणे- योग्य ती दक्षता घेऊन पुणे महापालिकेची मुख्य सभा २०० लोकांच्या सहभाग ठेऊन घेण्यात यावी असे निर्देश आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी आज दिल्याचे महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी सांगितले.
आपल्यासह शहरातील अनेक मान्यवर नगरसेवकांनी मुख्य सभेच्या कारभाराबाबत पारदर्शकता नसल्याचे सांगून ऑन लाईन दाखविल्या जाणाऱ्या मुख्य सभा या सपशेल बनवाबनवी ,आणि लपवाछपवी असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या आबा बागुलांनी देखील काल केला होता . या पार्श्वभूमीवर महापालिकेची मुख्य सभा आणि या सभेत होणारे कामकाज पारदर्शक असलेच पाहिजे असे सांगत उपमुख्यमंत्री यांनी २०० लोकाच्या सहभागा समवेत पूर्ववत मुख्यसभा घेण्यास हरकत नाही आणि आता ऑन लाईन मुख्य सभेची आवश्यक्यता नसल्याचे स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले.

