Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

एकाच दिवशी २२३७ ठिकाणी अनधिकृत वीजवापर उघड

Date:

३ कोटी ४२ लाख रुपयांच्या बिलांची वसुली सुरु

महावितरणकडून वीजचोरांना पुन्हा मोठा दणका

पुणे, दि. १६ सप्टेंबर २०२१गेल्या ऑगस्टनंतर पुन्हा या महिन्यात एकाच दिवशी पुणे प्रादेशिक विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत महावितरणने पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये २२३७ ठिकाणी वीजचोऱ्या व विजेचा अनधिकृत वापर उघडकीस आणला आहे. तसेच नियमाप्रमाणे दंड व चोरीच्या वीजवापरासह सुमारे ३ कोटी ४२ लाख रुपयांच्या वीजबिलांची वसुली सुरु करण्यात आली आहे. या बिलांचा भरणा न करणाऱ्या वीजचोरांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याचे कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

पुणे प्रादेशिक विभागात वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीजचोरीविरुद्ध नियमित कारवाई सुरु आहे. सोबतच वीजचोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांच्या निर्देशानुसार एक दिवसीय विशेष मोहीम घेण्यात येत आहे. गेल्या ऑगस्टमध्ये ही विशेष मोहीम घेण्यात आली. त्यानंतर पुन्हा ११ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता या मोहिमेला सुरवात करण्यात आली. पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी शेकडो अभियंता व कर्मचाऱ्यांनी विविध पथकांद्वारे वीजचोरीविरोधात कारवाई सुरु केली.

यामध्ये दिवसभरात पाचही जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदींच्या १८ हजार ३७ वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २२३७ ठिकाणी वीजचोऱ्या व अनधिकृत वीजवापर आढळून आला. या मोहिमेत सुमारे २० लाख ६६ हजार युनिटची वीजचोरी झाल्याचे प्राथमिक तपासणी दिसून आल्याने त्याची वसुली करण्यासाठी सुमारे ३ कोटी १८ लाख २५ हजार रुपयांचे वीजबिल संबंधीत ग्राहकांना देण्यात येत आहेत. नियमाप्रमाणे दंड व वीजचोरीचे बिल न भरल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

या विशेष मोहिमेत पुणे जिल्ह्यात १०६६ ठिकाणी १ कोटी ९५ लाख ५७ हजार, सातारा जिल्हा- १४१ ठिकाणी ११ लाख ५३ हजार, सोलापूर जिल्हा- ६४७ ठिकाणी ६२ लाख ६० हजार, कोल्हापूर जिल्हा- १८२ ठिकाणी ४१ लाख ११ हजार आणि सांगली जिल्ह्यामध्ये २०१ ठिकाणी ७ लाख ४३ हजार रुपयांच्या वीजचोऱ्या व अनधिकृत वीजवापर आढळून आला आहे. या विशेष मोहिमेत प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांच्यासह प्रादेशिक विभागातील वरिष्ठ अधिकारी, अभियंते व जनमित्र मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सोबतच महावितरणमधील विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील वीजचोऱ्या उघड करण्यास विशेष सहकार्य केले. उघडकीस आलेल्या वीजचोऱ्या विशेषतः सधन व सुशिक्षित घरगुती, व्यावसायिकांसह कृषीग्राहकांकडील आहेत. वीजबिलांच्या थकबाकीमुळे खंडित आलेला वीजपुरवठा परस्पर जोडून घेत किंवा अन्य ठिकाणाहून वीजवापर करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध सुद्धा या मोहिमेत फौजदारी कारवाई करण्यात आली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुढील 48 तासांत महाराष्ट्रातील गारठ्यात आणखी वाढ होणार; हवामान विभागाचा यलो अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत महाराष्ट्रातील गारठ्यात...

बिबट्या अखेर पुणे विमानतळावर पकडला….

पुणे-पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात गेल्या आठ महिन्यांपासून वावर असलेला...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन:वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लातूर-देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज...